पहिल्या पावसानंतर एक विशिष्ट प्रकारचा मृद्गंध येतो. स्ट्रॅप्टोमायसीस नावाचे जीवाणू जमिनीमध्ये असतात. उष्ण हवामानात गरम जमिनीमध्ये हे जीवाणू वाढत नाहीत, पण ते एक कठीण कवचधारी पेशी (Spore) च्या स्वरूपात जमिनीत राहतात. यास स्पोअर्स असे म्हणतात. पहिला पाऊस पडताच हे स्पोअर्स जमिनीवर होणाऱ्या पाण्याच्या माऱ्यामुळे हवेत विखुरतात. या स्पोअरमध्ये जिओस्मीन नावाचे जैवरसायन असते. आपण हे स्पोअर नाकावाटे घेतो व त्याचा वास आपणास येतो. जिओस्मीनचे रासायनिक नाव डायमिथाईन डिकेलॉल असे आहे. पहिल्या पावसाच्या वेळी तप्त कोरडय़ा जमिनीतून हे स्पोअर्स हवेत येण्याचे प्रमाण फारच जास्त असते. पुढे पुढे जमीन ओली होते. त्यामुळे स्पोअर्स हवेत विखुरण्याचे प्रमाण कमी होते. तसेच जमिनीतील वाढलेल्या पाण्याच्या प्रमाणामुळे हे स्पोअर्स रुजतात व स्ट्रेप्टोमायसीसची वाढ होते.

मनात धरलेली संख्या कशी ओळखतात?
ही एक सहज करता येण्याजोगी, लक्षात ठेवायला सोपी पण गमतीची गणिती ती जादू आहे. तुमच्या मित्राला १ ते १०० यातील कोणतीही संख्या मनात धरायला सांगा. ती दुप्पट करायला लावा. त्या उत्तरात ९ मिळवायला सांगून मग तीन उणे करायला सांगा. आता येणारे उत्तर त्याला विचारा. त्याने उत्तर सांगितलेल्या संख्येला तुम्ही दोनाने भागा (निमपट करा) आणि त्यातून ३ उणे करा. जे उत्तर येईल तीच संख्या मित्राने धरली होती. प्रत्यक्ष उदाहरणाने पाहू. मित्राने मनात धरलेली संख्या ८७. तिची दुप्पट केल्यानंतर १७४ झाले. त्यात नऊ मिळवून १८३ झाले. त्यातून ३ उणे केल्यानंतर १८० आले. मित्र ही संख्या तुम्हाला सांगेल. तुम्ही १८० ची निमपट केल्यानंतर ९० येतात. त्यातून ३ उणे करून ८७ येतात. हीच संख्या मित्राने मनात धरली होती. याच प्रकारच्या जादूने मित्राचे वयही तुम्हाला ओळखता येईल.    

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Loksatta vasturang Exemption in stamp duty and fine
मुद्रांक शुल्क व दंडात सवलत

आपणाला पृथ्वी फिरताना का जाणवत नाही?
या प्रश्नाचे उत्तर देताना आपले काही इतर अनुभव पाहू या! आपण आणि आपला मित्र रेल्वेच्या डब्यात बसतो, त्यावेळी आपला मित्र वेगाने पुढे जात असतो, पण आपणास तसे जाणवत नाही. कारण आपणही त्याच्या वेगाने पुढे जात असतो. धावणाऱ्या रेल्वेमध्ये बसलेले दोघे जण एकमेकांच्या दृष्टीने स्थिर असतात. दुसरा अनुभव : रेल्वेगाडी स्टेशनवर उभी असते. आपण रेल्वेत बसलेलो असतो. अचानक शेजारची रेल्वे चालू होते आणि आपणास आपली गाडी चालू झाल्यासारखे वाटते.
विमान प्रवास करताना बाहेर ‘मागे जाणारी’ झाडे नसल्यामुळे विमानाचे पुढे जाणे जाणवत नाही. पृथ्वीवरच आपण आहोत आणि ती फिरत आहे व त्यावरील सर्वच वस्तू फिरत आहेत. भोवताली तुलनेसाठी वस्तू नाही म्हणून फिरणे जाणवत नाही. पण आकाशातील चंद्र, म्हणजे ‘आमची गाडी स्थिर आहे आणि झाडेच मागे जात आहेत’ असं म्हणण्यासारखं होतं. सूर्य यांच्याकडे पाहिले असता पृथ्वी फिरते, हे लक्षात येते. अर्थातच पूर्वीचा मनुष्य सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे समजत होता. हा प्रकार म्हणजे ‘आमची गाडी स्थिर आहे आणि ही झाडेच मागे जात आहेत’ असं म्हणण्यासारखं होतं.