दिवाळीच्या सुट्टीत इंग्लिश बोलण्याचा सराव करायचा असं निवेदिता आणि तिच्या आई-बाबांनी ठरवलं होतं. ‘मला भूक लागली आहे’ किंवा ‘मी खेळायला जाऊ   का?’ अशी छोटी छोटी, पण रोजच्या उपयोगाची वाक्यं इंग्लिशमध्ये बोलत त्यांनी या उपक्रमाला सुरुवातही केली. बोलण्याच्या जोडीला इंग्लिश व्याकरणाची ओळख करून देणारा एखादा खेळ मिळाला तर बरं होईल, असं आई-बाबांना वाटत होतं. असं काही शोधायचं काम निवेदिताची आत्या उत्साहाने करते! आईने तिला फोन करून सांगितल्यावर आत्याने इंटरनेट, खेळांची दुकानं, मित्र-मैत्रिणी अशी सगळी सूत्रं वापरून ‘सेन्टेन्स मास्टर’ नावाचा एक खेळ शोधून काढला आणि रविवारी भल्या सकाळी ती तो खेळ घेऊन निवेदिताच्या घरी हजर झाली. सध्या सुट्टी सुरू असल्यामुळे निवेदिता आईने दहा हाका मारल्याशिवाय उठतच नाही. पण आत्या आलीय आणि तिने नवा खेळ आणलाय म्हटल्यावर निवेदिता पहिल्या हाकेलाच अंथरुणातून उठली. आत्याचा चहा होईपर्यंत स्वत:हून पांघरुणाची घडी करून, दात घासून दुधाचा कप घेऊन आत्याजवळ येऊन बसली.

आत्याने सेन्टेन्स मास्टर निवेदिताला दिला. त्याचा लांब आणि जड बॉक्स पेलताना तिला जरा कसरतच करावी लागली. पॅकिंग उघडून निवेदिताने आत बघितलं तर त्या लांबुळक्या बॉक्समध्ये सहा छोटे छोटे कप्पे होते. त्या कप्प्यांमध्ये छोटी कार्ड्स ठेवलेली होती. निवेदिताने एक कार्ड उचलून बघितलं तर ते चांगलं जाडजूड होतं. त्याचा टिकाऊपणा बघून आई पण खूश झाली. त्यातल्या काही कार्ड्सवर चित्रं आणि त्याखाली त्या चित्राचं नाव- असं होतं. काही कार्ड्सवर मोठय़ा आणि खाली छोटय़ा अक्षरांमध्ये काही शब्द लिहिलेले होते. आत्या म्हणाली, ‘‘ही एकूण ९० कार्ड्स असतात. त्यात नाऊन्स, प्रोनाऊन्स, व्हर्ब्स असतात. काही कार्ड्सवर चित्रंसुद्धा असतात. या कार्ड्सचा वापर करून आपण वाक्यं तयार करू शकतो. ४ ते १४ वयोगटासाठी हा खेळ एकदम छान आहे. अगदी छोटय़ा ४-५ वर्षांच्या मुलांना ही चित्रांची कार्ड्स दाखवून त्यांच्यावर लिहिलेला शब्द मोठय़ाने वाचून दाखवायचा. म्हणजे मुलं चित्रं आणि शब्द एकत्र ओळखायला शिकतात. यातल्या काही कार्ड्सवर ‘सिस्टर’, ‘ब्रदर’, ‘फादर’, ‘मदर’ अशी नातीही लिहिलेली आहेत. आधी छोटय़ा मुलांना ही चित्रांची कार्ड्स शिकवायची, त्यांनी कार्ड बरोबर ओळखलं तर प्रत्येक कार्डसाठी त्यांना एकेक पॉइंट द्यायचा. थोडय़ा मोठय़ा- वाचता येणाऱ्या मुलांना कार्डचा चित्राचा भाग झाकून ठेवून शब्द वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं, त्यापेक्षा मोठय़ा मुलांना ‘kI am a girl’ वगैरे छोटी वाक्यं बनवून देऊन वाचायला लावायची. प्रथमपुरुषी ‘can I have breakfas’सारखी वाक्यं मुलांची संवादक्षमता वाढवण्यासाठी मदत करतील. मग मुलांना स्वत:लाच ही कार्डस वापरून वाक्यं तयार करायला सांगायची. कधी आपण चुकीची वाक्यरचना करून मुलांना ती सुधारायला सांगायची. अशा अनेक गोष्टी आपण स्वत:च्या स्वत:सुद्धा विकसित करू शकतो!’’

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
Swiggy delivery boy was caught on cctv camera stealing shoes kept outside flat in Gurugram video goes viral
VIDEO : डिलीव्हरी बॉयने चोरले घराबाहेरील शूज, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद, पाहा व्हिडीओ
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

आत्याला सेन्टेन्स मास्टर फारच आवडलेला असल्यामुळे ती त्या खेळाबद्दल नॉन-स्टॉप बोलत होती. ते ऐकता ऐकताच बाबाने बॉक्समधलं एकेक कार्ड निवडून जमिनीवर ठेवत एक वाक्य तयार केलं! ते वाचून आत्या एकदम बोलायची थांबली आणि हसायलाच लागली. आईसुद्धा हसायला लागली. त्या का हसतायत ते निवेदिताला आधी काही कळलंच नाही. मग तिने हळूहळू एकेक अक्षर लावत बाबाने तयार केलेलं ‘I want tea’ हे वाक्य वाचलं आणि इतकं सलग बोलल्यामुळे आत्याला आता पुन्हा चहाची गरज आहे हे जाणवून तिलाही हसू आलं! निवेदिताला वाक्य वाचता आलं, त्याचा अर्थही समजला, हे बघून आपण आणलेला खेळ अगदी योग्य आहे याचं समाधान आत्याच्या चेहऱ्यावर उमटलं!

अंजली कुलकर्णी-शेवडे

anjalicoolkarni@gmail.com