भारतातील अनेक दुर्गम खेडय़ापाडय़ांमध्ये आजही वीज पोहोचलेली नाही. तेथील विद्यार्थ्यांना रात्री कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करावा लागतो. यावर उपाय म्हणून मुंबई आयआयटीच्या रडवछ (सौरऊर्जा दिवे) प्रकल्पाखाली चार राज्यांतील दहा लक्ष गरजू विद्यार्थ्यांना सौरशक्तीवर चालणारे दिवे प्रत्येकी एकशे वीस रुपये या सवलतीच्या किमतीत देण्याचा संकल्प सोडला आहे. या दिव्यांची देखभाल, दुरुस्ती करण्याचे प्रशिक्षण स्थानिक पातळीवर देण्यात आले आहे. सौरशक्ती विनामूल्य मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या कुटुंबाच्या खर्चात बचत होणार आहे. यापैकी आठ लाखांहून अधिक दिवे आज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत.