News Flash

वेश असे बावळा, परि अंतरी नाना कळा!

गजाली विज्ञानाच्या

तंतूकी ग्रंथी- तीन जोडय़ा

डॉ. नंदा हरम nandaharam2012@gmail.com

कोणाच्या बा रूपावर जाऊ नये, तर त्याच्या अंगी असलेले गुण बघावेत.

कोळी बघितला की अगदी त्याच्याकडे बघतच राहावं, असं वाटत नाही. पण त्याने विणलेलं जाळं पाहिलं की आश्चर्य वाटतं. या जाळ्याचे जे धागे असतात ते सिल्कचे असतात. सिल्क तयार करणारी तंतूकी ही ग्रंथी कोळ्याच्या शरीराच्या टोकाला असते. या ग्रंथीच्या १,३ किंवा ४ जोडय़ा असतात आणि प्रत्येकाचे कार्य भिन्न असते. या ग्रंथीपासून तयार झालेल्या सिल्कच्या धाग्याचा हेतू वेगवेगळा असतो. काही कोळी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ८ प्रकारचे सिल्कचे धागे तयार करतात.

सिल्कच्या धाग्यामध्ये असणारी विविधता जाळ्याच्या बांधणीमध्येही आढळते. काही जाळी भूपृष्ठाला समांतर असलेल्या प्रतलात, काही उभ्या प्रतलात तर काही या दोन प्रतलांच्या मध्ये विशिष्ट कोनात तयार केली जातात. जाळं विणायला कोळी स्वत:चं शरीर मोजमापाकरिता वापरतो. विशिष्ट तऱ्हेने आणि क्रमाने तो हे जाळे विणतो. साधारणपणे त्याच्या शरीराच्या आकाराच्या वीसपट जाळ्याचा आकार असतो.

भक्ष्य पकडण्याकरिता कोळी हे जाळं विणतो, पण ही कठीण प्रक्रिया आहे. लक्षात आलं ना, सिल्क म्हणजे प्रोटिन. ते त्याला मोठय़ा प्रमाणात बनवावं लागतं. पण मित्रांनो, हा कोळी हुशार आहे बरं का! या जाळ्यात भक्ष्य अडकण्याचं प्रमाण कमी झालं, म्हणजेच जाळ्याचा चिकटपणा कमी झाला की तो ते जाळं खाऊन टाकतो. बरोबर ओळखलंत- सिल्कचा पुनर्वापर म्हणजे ऊर्जेची बचत!

कोळी जाळं विणतो भक्ष्य पकडण्याकरिता, पण सोळाव्या शतकात माणसाने या जाळ्यांवर पेंटिंग्ज तयार केली. तसेच अनेक शतकं रक्तस्राव थांबण्याकरिता या जाळ्याचा उपयोग गॉझपॅड सारखा करण्यात आला. हे कसं शक्य आहे? रक्ताची गुठळी करण्याकरिता परिणामकारक असलेलं ‘व्हिटॅमिन के’ या जाळ्यात भरपूर प्रमाणात असतं. मग पटलं ना, कोळ्याचं कर्तृत्व!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 1:03 am

Web Title: spiders create 8 types of silk thread
Next Stories
1 माझे चिकू-पिकू
2 मिले सूर मेरा तुम्हारा..
3 फेलिक्स- द बोका!
Just Now!
X