साहित्य : आइस्क्रीमचे साधे व रंगीत  चमचे, उभट तोंडाचे बूच, रद्दी (रंगीत गुळगुळीत) कागद, कुंदन, टिकल्या, अ‍ॅक्रॅलिक रंग, कलिंगडाच्या बिया, गम, ब्रश,  रंगीत कार्डपेपर इ.
कृती : रंगीत कार्डपेपरच्या मध्यापासून अर्धगोलाकारामध्ये रंगीत आइस्क्रीमचे चमचे पिसाऱ्यासारखे चिकटवनू घ्या. त्यावर कुंदन व टिकल्यांनी सुशोभित करा. एका रंगीत रद्दी कागदाची गुंडाळी करून लंबगोलाकार घट्ट गुंडाळी करून घ्या. या घट्ट लंबगोलाकाराला आइस्क्रीमच्या लाकडी चमच्यावर साधारण गोलाकारावर चिकटवा. वरील बाजूस टोकावर उभट तोंडाचे बूच आडवे चिकटवा. त्यावर कलिंगडाच्या बियांचे डोळे तसेच कागदी गुंडाळीचा तुरा लावून मोराचे तोंड बनवा. हे धड पिसाऱ्याच्या मध्यावर चिकटवा. गुंडाळीचे पाय बनवा आणि ते चिकटवा. हिरव्या रंगाने गवत काढा. चमचमता मोर फ्रेममध्ये बंद व्हायला तयार!