|| राधा राहुल शलाका वारंगे

ऑझी आमची खूप लाडकी आहे. तपकिरी, पांढरा, काळा अशा तीन रंगांची ऑझी जेव्हा आमच्या घरी आली तेव्हा खूपच लहान होती, त्यामुळे आम्ही तिची चांगली काळजी घेतली. एका वर्षांनी तिला पिल्लं झाली. पिल्लं खूप लहान होती आणि गोडही होती. आम्ही त्या पिल्लांना लहान बाळासारखं मांडीवर घ्यायचो. तरीही ऑझी आम्हाला काहीच करायची नाही. थोडय़ा दिवसांनंतर तिला आम्ही पट्टा बांधला, पण ती तो सारखा चावत बसायची. मग आम्ही तिच्या गळ्यातला पट्टा काढला. तिला एकूण ७ पिल्लं झाली, पण त्यातलं एक पिल्लू मरून गेलं. मग आमच्याकडे ६ पिल्लं उरली. त्यातलं एक पिल्लू एका मॅडमला दिलं आणि दुसरं मावशींना.

जेव्हा मी आणि मुक्ताताई घरी जायला निघायचो, तेव्हा ऑझी आमच्या मागेमागे, पूर्ण लिफ्टपर्यंत यायची. एकदा तर ऑझीने व्हरांडय़ात मेलेली कोंबडी आणली होती. कधी तरी ती ‘चौधरी चायनीज’मधून काय काय काय खाऊन येत असते. ती चावायला नको म्हणून आम्ही तिला इंजेक्शन पण दिले. आमच्यासमोर टायगर नावाचा कुत्रा राहतो. त्याचं आणि ऑझीचं रोज भांडण होतं. पण तरी ते दोघं खेळतात. आम्ही तिला एका वाटीत दुधात अंड घालून देतो, ते ती चाटून पुसून खाते. डॉक्टरकाका म्हणाले, तिला कच्चं अंड देऊ नका. मग आम्ही तिला दुधात ऑम्लेट टाकून देतो.

मल्हार तिला खूपच घाबरतो. ती जरा जरी जवळ आली तरी तो धूम ठोकतो. एक दिवस एक मुलगा ऑझीच्या तोंडात काही काठी घालत होता आणि परत जोरात ओढून काढत होता. त्यामुळे मला व मुक्ताताईला अतिशय राग आला. मी चांदे ग्राउंडवर सायकल चालवत असताना ऑझी आली. माझ्या सायकलच्या मागे धावू लागली आणि टायरवर पाय मारायला लागली.  एकदा तर आजी भाजी चिरता चिरता टीव्ही बघत बसली होती. इकडे ऑझी आली आणि जिन्याच्या मध्य भागी येऊन बसली. एकदा ऑझीने आजीची साडी दोन वेळा फाडली. तरीही आमची ही ऑझुली आम्हाला खूप आवडते.

इयत्ता- दुसरी

को. ए. सो. वा. गो. गाडगीळ

प्राथमिक शाळा, महाड