17 November 2019

News Flash

वारा पाहून पाठ फिरवणे

परिस्थिती पाहून वर्तन करणे, हा या म्हणीचा अर्थ तंतोतंत पालन करतो कोण?

|| डॉ. नंदा हरम

परिस्थिती पाहून वर्तन करणे, हा या म्हणीचा अर्थ तंतोतंत पालन करतो कोण? कॅमेलिअन म्हणजे रंग बदलणारा सरडा. सरडय़ांच्या काही जाती त्वचेचा रंग बदलू शकतात. गुलाबी, निळा, लाल, केशरी, हिरवा, काळा, तपकिरी, पिवळा, फिकट निळा, जांभळा.. रंगांच्या मिश्रणातून वेगवेगळे सरडे त्यांचे रंग आणि नक्षी बदलू शकतात. याचं कारण काय, याची जिज्ञासा तुम्हाला असेलच.

त्याच्या आसपासच्या रंगाप्रमाणे तो स्वत:चा रंग धारण करतो. म्हणजेच तो उठून दिसत नाही आणि त्याचं रक्षण होतं. संदेशवहन, तापमानासाठी प्रतिक्रिया सरडय़ाची शारीरिक स्थिती.. हे सारं रंगबदलातून दर्शविले जाते. दुसऱ्या सरडय़ांपेक्षा आपली आक्रमकता दाखविण्याकरिता तो तेजस्वी रंग धारण करतो, तर गडद रंगातून शरणागती पत्करल्याचे सूचित करतो. पक्षी किंवा साप यांचा सरडय़ाला धोका असतो. त्यामुळे या भक्षकांच्या दृष्टीप्रमाणे सरडा स्वत:च्या रंगात बदल करून स्वरक्षण करतो.

वाळवंटात राहणारा नॅमाक्वा नावाचा सरडा तापमान नियंत्रणाकरिता रंग बदलतो. सकाळच्या थंड वेळी तो काळ्या रंगामुळे कार्यक्षमतेने उष्णता शोषून घेतो, तर दुपारच्या उन्हात फिकट राखाडी रंगामुळे प्रकाश परावíतत होऊन त्याच्या शरीराचं तापमान वाढत नाही.

परिस्थितीप्रमाणे रंग बदलण्याचं कसब त्याच्याकडे आहे. पण हे कसं घडतं? हा प्रश्न तुम्हाला छळत असेल नाही? त्याचं अचूक उत्तर २०१४ च्या संशोधनात मिळालं आहे. सरडय़ाच्या त्वचेत दोन अध्यारोपित थर असतात, जे रंग आणि तापमानाचं नियंत्रण करतात. वरच्या थरात ग्वानिनच्या (न्यूक्लिक आम्ल) नॅनो आकाराच्या स्फटिकांची विशिष्ट रचना असते. उद्दीपित अवस्थेत या नॅनो स्फटिकांमधील अंतर बदलते. याचा परिणाम कोणत्या तरंगलांबीचा प्रकाश शोषला जाईल आणि कोणता परावíतत होईल, यावर होतो. उद्दीपित अवस्थेत नॅनो स्फटिकांमधील अंतर वाढल्यामुळे जास्त तरंगलांबीचा प्रकाश परावíतत होतो; हा प्रकाश म्हणजे पिवळा, केशरी, हिरवा आणि लाल होय. विश्राम अवस्थेत निळा आणि हिरवा रंग दिसून येतो. हा हिरवा रंग सरडय़ाच्या त्वचेत असलेल्या पिवळ्या रंगद्रव्यामुळे जो परावíतत झालेल्या निळ्या रंगाच्या मिश्रणातून निर्माण होतो. सरडय़ाचं गुपित कळलं ना आता!

nandaharam2012@gmail.com

First Published on June 1, 2019 12:03 am

Web Title: story for kids 27