मुलांनो, तुम्हाला प्राणी-पक्षी जवळचे वाटतात. या सृष्टीतील जलचर, उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी यांचे अनोखे विश्व हा तुमच्या कुतूहलाचा विषय असतो. परंतु या प्रत्येक प्रकारच्या प्राणी-पक्ष्यांची तपशीलवार माहिती आपल्याला नसते. किंवा काही ठळक नावेच माहीत असतात. मुलांच्या या जिज्ञासेला प्रतिसाद देणारी ‘आपली सृष्टी’ ही दहा पुस्तकांची मालिका वाचायलाच हवी. त्यात मुलांना समजेल अशा रोचक भाषेत प्राणीविश्वाचा परिचय करून दिला आहे डॉ. किशोर पवार व नलिनी पवार यांनी.
या दहा पुस्तकांमध्ये ‘जलसम्राट मासे’, ‘अनोखी मस्त्यसृष्टी’, ‘पाणथळीतले पक्षी’, ‘आकाशसम्राट पक्षी’, ‘अजब सर्पसृष्टी’, ‘सरपटणाऱ्या प्राण्यांचे जग’, ‘डायनोसॉरचे अद्भुत विश्व’, ‘मनोरंजक सस्तन प्राणी’, ‘अनोखे सस्तन प्राणी’, ‘उभयचरांचे अनोखे विश्व’ अशी पुस्तके आहेत.  या पुस्तकांची पृष्ठसंख्या ६० ते १४० च्या दरम्यान आहे. प्रत्येक पुस्तकात त्या-त्या गटातील पक्षी-प्राण्यांची चित्रे व छायाचित्र आहेत. त्यामुळे ही पुस्तके रंजक झाली आहेत. प्रत्येक पक्षी व प्राण्याचे बोलीभाषेतील नाव, शास्त्रीय नाव, त्याची लांबी, उत्पत्ती, जगात कुठे आढळतात, घरटय़ाची किंवा निवासाची रचना, खाद्य, आयुर्मान, सवयी, नर-मादी फरक, त्यांच्याविषयीच्या पारंपरिक समजुती, परदेशातील याच प्रजातींचे वैशिष्टय़, वजन, पिलांची वाढ अशी वैविध्यपूर्ण माहिती दिली आहे. इतकी शास्त्रीय व विविधांगी माहिती असूनही ती किचकट, बोजड वाटत नाही, हे विशेष. पुन्हा प्रत्येक प्राणी-पक्ष्यांच्या जातींचे उपप्रकारही दिले आहेत.
‘मनोरंजक सस्तन प्राणी’ या भागात मनोरंजक माहिती मिळते. पिशवीधारी कांगारू, स्लॉथसारखा फांदीला उलटे टांगून चालणारा प्राणी, तीक्ष्ण काटे, खवले अंगावर असणारे प्राणी, निशाचर प्राणी, उडणाऱ्या खारी, केवळ १०० ग्रॅम वजनाचे, पण जुळय़ांना जन्म देणारे मार्मोसेट माकड अशी अविश्वसनीय वाटणारी वास्तव माहिती मुलांना गुंतवून टाकते.
मुलांना सर्पसृष्टीविषयी भयचकित उत्कंठा असते. ती उत्कंठा ‘सर्पसृष्टी’ पुस्तकात पूर्ण होते. सापांविषयीचे गैरसमज दूर होतात. भारतातील सपरेद्यानांविषयीही माहिती आहे. डायनोसॉरविषयी मुलांना आकर्षण असते. त्याविषयी या मालिकेत स्वतंत्र पुस्तकच आहे. त्यात डायनोसॉरच्या शोधाचा इतिहास, त्याचे वर्गीकरण, जलचर व आकाशात उडणारे डायनोसॉर, त्यांचे निवासस्थान, पर्यावरण, डायनोसॉर नष्ट का झाले, अशी विविधांगी माहिती दिली आहे.
जलचरांविषयी फारशी माहिती नसते.  या पुस्तकांत रोचक माहिती मिळते. नदीकडून सागराकडे हजारो किलोमीटर प्रवास करणारे हिल्सा ईल, सामनसारखे स्थलांतर करणारे मासे, शार्कसारखे भयावह मासे, प्रकाशनिर्मिती करणारे मासे, यांसारख्या माहितीबरोबरच मत्स्यशेती, मत्स्यालये यांचीही माहिती आहे. पाणथळीतले पक्षी याविषयीही आपल्याला फारशी माहिती नसते. त्यावरही स्वतंत्र पुस्तक आहे. उभयचरांच्या पुस्तकात जगातल्या विविध बेडकांविषयी माहिती मिळते, तर सस्तन प्राण्यांमध्ये झेब्रा, कस्तुरीमृग, चौशिंगा, ऑरिक्स इंपाला, नीलगाय याविषयी माहिती दिली आहे.
अशा प्रकारे या दहा पुस्तकांच्या संचात निसर्गातील सर्वच प्रकारच्या पक्षी-प्राण्यांची तपशीलवार माहिती मिळते. त्यातून मुलांमध्ये एक प्रकारची या सृष्टीविषयीची कायमची अपार जिज्ञासा निर्माण होते. त्याचवेळी आपल्या परिसरातील पक्षी-प्राण्यांकडे जिज्ञासेने मुले बघू लागतील, अशी नजर ही पुस्तके देतात. पर्यावरणाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी ही पुस्तकमालिका नक्कीच महत्त्वाची आहे.      
आपली सृष्टी (दहा पुस्तकांचा संच)
डॉ. किशोर पवार, नलिनी पवार
मेहता पब्लिशिंग हाऊस
 किंमत- ११०० रु. (प्रत्येकी – ११० रु.)

Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती
korean skincare, K-beautyUnlock the secrets
तुम्हालाही हवीये Glass skin? कोरियन लोकांच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य? तज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स