वेळोवेळी तुम्ही मला बघता
मगच आपला दिनक्रम ठरवता
lok04महत्त्वाचे काही विसरू नये म्हणून
सहजपणे माझ्यावरच नोंद ठेवता
माझे दिवस संपले की, मला काढून टाकता
दरवर्षी माझं नवं रूप आवडीने भिंतीवर टांगता
(कॅलेंडर)

विरोधकांचा विरोध सहन करत
जोतिरावांना सक्रिय साथ देत
काळ्यावर पांढरे करण्याचा निश्चय केला  
स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून
परिवर्तनाचा पायंडा पाडला
आधुनिक भारतीय शिक्षणाची नायिका
असा स्वकर्तृत्वाचा पाया रचला.
 (सावित्रीबाई फुले)

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
how to find out job as a fresher
Job For Fresher : फ्रेशर म्हणून नोकरी कशी शोधायची? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

थोरामोठय़ांच्या कथा सांगून
मुलाला उत्तम संस्कारधन दिलं
दादोजी कोंडदेवांच्या मदतीनं त्याला
स्वराज्यस्थापनेसाठी प्रवृत्त केलं
अशी माँसाहेब जगी परत होणे नाही.
( जिजामाता)
 
लहानपणीच्या कोचमन होण्याच्या इच्छेला
त्याच्या आईने खतपाणी घातलं
कृष्णाचा दाखला देऊन तिने
देशाचं सारथ्य करायला सांगितलं
त्यांनीही आईच्या संस्कारांचा आदर राखला
‘बंधू आणि भगिनींनो’ अशी साद घालून
 देशाला सन्मान मिळवून दिला.
(स्वामी विवेकानंद) 

lr21