बालमित्रांनो, आजच्या शब्दभांडार वाढवण्याच्या खेळात नीस/णीस ही अक्षरे शेवटी घेऊन बनलेले शब्द तुम्हाला ओळखायचे आहेत. हे शब्द पूर्वी मराठी राज्यव्यवस्थेतील हुद्दय़ांशी निगडित होते. शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहे. बघा तुम्हाला ओळखता येतात का?
१) सरकारी धान्याच्या कोठारावरील अधिकारी
२) घोडय़ाच्या पागेवरील अधिकारी
३) फारशीतून पत्रव्यवहार करणारा, मुन्शी
४) पत्रव्यवहार सांभाळणारा, सेक्रेटरी
५) महसूल अधिकारी, फरासखान्यावरील एक अधिकारी
६) गावांची, लष्कराची वगैरे मोजदाद ठेवणारा अधिकारी
७) खजिनदार
८) सैन्याची हजेरी- उपस्थिती घेणारा आणि त्यासारखी कामे करणारा.
९) दप्तर सांभाळणारा, मामलेदार
१०) मोठय़ा घराण्यांतील खासगीकडील हिशेब लिहून ठेवणारा, तैनात आणि भोजन वगैरेची व्यवस्था पाहणारा कारभारी.
११) सैन्य व सरकारी नोकर यांना दिलेल्या पगाराचा हिशेब लिहिणारा.

lr16

 

 

 

lr17

का घडते असे

का येते साय दुधावर
दूध तापल्यावर

कसे होते दही तयार
दूध विरजल्यावर

का लोणी तरंगते वर
ताक घुसळल्यावर

होते तयार तूप, बेरी
लोणी कढवल्यावर

का घडते असे सारे
कसे हे कळेल

करता अभ्यास विज्ञानाचा
उत्तर सापडेल तुम्हाला
– रश्मी गुजराथी

मामाचा गाव
मामाचा गाव
खूप खूप दूर
जाण्याची तिथे
लागे हुरहुर
गावाच्या कडेला
मळ्याची वाट
मळ्याच्या वाटेला
झाडी घनदाट
झाडावर पक्ष्यांची
चाले किलबिल
कोकिळा दुरून
घाली गोड शीळ
मामाच्या मुलांशी
खेळायला जाऊ
मामीच्या हातची
पुरणपोळी खाऊ
मामाही देईल
संत्र्याची फोड
आंबट बोरेपण
लागतील गोड
-उद्धव भयवाळ