03 March 2021

News Flash

सुट्टीतलं ई-लिर्निंग

मला माहीत आहे, तुमच्यापकी अनेकांना आर्ट आणि क्राफ्टची आवड आहे.

मला माहीत आहे, तुमच्यापकी अनेकांना आर्ट आणि क्राफ्टची आवड आहे. आता सुट्टय़ा लागल्यावर चित्र काढायला, ग्रीटिंग्स बनवायला, घरातल्या टाकाऊ वस्तूंपासून छान छान सुंदर गोष्टी बनवायला तुम्हाला नक्की आवडत असणार! पण सुट्टय़ांमध्ये होतं काय की, आर्ट आणि क्राफ्टचा एखादा क्लास लावावा तर तेही शक्य होत नाही. आजोळी जायचं असतं, मामाचं गाव वाट बघत असतं, शिवाय आई-बाबांबरोबर देशात, परदेशात ट्रिपचा प्लॅन असतो. या सगळ्यात क्लास लावला तर शिक्षण कमी आणि सुट्टय़ाच जास्त होणार. उन्हाळी शिबिरं असतात, पण मला माहितीय वर्षभर शाळा आणि क्लासेस करून तुम्ही कंटाळलेले असता, परीक्षा झाल्यावर आणि सगळ्या क्लासेसना सुट्टी मिळाल्यावर पुन्हा कुठलं तरी शिबीर अनेकदा नको वाटतं.

मग अशा वेळी तुम्ही जिथे कुठे असाल, म्हणजे तुमच्या घरी, आजोळी, काका-आत्याच्या घरी, जिथे कुठे तिथे तुम्ही सहज इंटरनेटच्या मदतीने हस्तकला आणि चित्रकलेच्या वर्गाना जाऊन बसू शकता. तुम्ही आणि तुमची भावंडं मिळून एकत्र वेबसाइट्स आणि यूटय़ूबवरच्या छान छान चॅनेल्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी घरच्या घरी शिकू शकता. उदा. टिंकरलॅब म्हणून एक साइट आहे. रिशेल डूल्रे नावाच्या तरुणीने ही साइट सुरू केली आहे. ती स्वत: कलाकार आहे. लहानपणापासून चित्रकला आणि हस्तकलेची तिला आवड होती. तिच्या आई-बाबांनी तिच्या या आवडीला भरपूर खतपाणी घातलं. रिशेल लहान होती तेव्हा आजच्यासारखं लहान मुलांना इंटरनेट उपलब्ध नव्हतं. पण तिची आई तिला नियमित चित्र आणि हस्तकलेच्या क्लासेसना, प्रदर्शनांना घेऊन जायची. रिशेलने स्वत: तर काढून बघावंच, पण इतरांनी तयार केलेल्या कलाकृतीही बघाव्यात, त्यातून शिकावं असं तिला वाटायचं. रिशेल म्हणते, ‘माझ्या आईनं जे माझ्यासाठी केलं ते मी पुढच्या पिढीसाठी केलं पाहिजे असं मला वाटतं.’ तिनं थिएटर (कॉस्च्युम डिझाइन) मध्ये बी. ए. केल्यानंतर हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनमधून तिने आर्ट्स एज्युकेशनमध्ये मास्टर्स केलं आहे. टिंकरलॅबमध्ये सायन्स प्रोजेक्टसह निरनिराळ्या वयोगटांसाठी वेगळे विभाग आहेत. सेन्सरी म्हणून विभागात घरच्या घरी चिकणमाती बनवण्यापासून तुमच्या सगळ्यांचं आवडतं स्लाइम कसं घरीच बनावता येतं हेही सांगितलं आहे. आहे की नाही धमाल! साधं स्लाइम तर तुम्ही बनवू शकताच, पण ग्लिटरी स्लाइम कसं बनवायचं याची पद्धतही तिने दिलेली आहे. तुमच्या खोलीसाठी किंवा घरातल्या भिंतींवर लावायला सुंदर फ्रेम्स कशा बनवता येऊ शकतात हेही ती सांगते. इतकंच कशाला, पण घरच्या घरी हॅण्डमेड गिफ्ट रॅपिंग पेपरसुद्धा कसा बनवायचा हे तिने सांगितलं आहे. आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने. मग सुट्टीच्या दिवसांत आता काय करू अशी कुरकुर करत आईचं डोकं खाण्यापेक्षा टिंकर लॅबवर जा आणि धमाल करा!

रेड अलर्ट

ज्यावेळी तुम्ही सातत्याने ऑनलाइन सìफग सुरू करता तेव्हा या आभासी म्हणजेच व्हर्चुअल जगात वावरण्याचा एक आत्मविश्वास आपल्याला येतो. आपल्याला आई-बाबांपेक्षा जरा जास्त माहीत आहे, या भावनेनं मस्तही वाटत असतं. अशा वेळी सोशल नेटवìकग साइट्सवर किंवा ऑनलाइन चॅट रूममध्ये अनोळखी व्यक्ती भेटतात. त्यातले काही खरंच खूप चांगले असतात, पण काही चांगले नसतात. म्हणजे ते सुरुवातीला तुमच्याशी गोड बोलतात. तुम्हाला समजून घेतायेत असं दाखवतात, तुमच्या मनातल्या भावना मोकळेपणाने बोलून दाखवायला तुम्हाला मदत करतात. त्यामुळे तुमचाही त्यांच्यावर विश्वास बसतो. पण जी माणसं काहीतरी वाईट उद्देश ठेवून तुमच्याशी मत्री करत असतात त्यांना ओळखता आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, ‘ते कसं ओळखायचं?’ तर अगदी साध्यासुध्या गोष्टी लक्षात घ्या. त्या व्यक्तीने खालील गोष्टी करायला सांगितल्यास समजा की धोका आहे.

  • त्या व्यक्तीने तुमच्याकडे तुमच्या आई-बाबांचं रुटीन विचारायला सुरुवात केली, त्यांचे मोबाइल नंबर, तुमचा मोबाइल नंबर, तुमच्या घराचं वर्णन करायला सांगितलं.
  • त्या व्यक्तीने तुम्हाला स्वत:च्या किंवा इतर कुणाच्याशी शरीराचे, विशेषत: खासगी अवयवांचे फोटो काढून पाठवायला सांगितले.
  • त्या व्यक्तीने तुम्हाला भेटायला बोलावलं आणि आई-बाबांना सांगू नकोस, असं सांगितलं.
  • त्या व्यक्तीने तुम्हाला तुमच्या आई-बाबांच्या नकळत त्यांचे बँक डिटेल्स द्यायला सांगितले.
  • त्या व्यक्तीने तुम्हाला एखाद्या गेमची लिंक दिली आणि त्या गेमवर विचित्र टाग्रेट्स पूर्ण करण्याची चॅलेंजेस दिली असतील. अशा वेळी, त्या व्यक्तीने सांगितलेलं काहीही ऐकू नका. त्यांच्याशी पुन्हा बोलण्याआधी सगळा प्रकार लगेच आई-बाबांच्या कानावर घाला. म्हणजे आई-बाबा सायबर सेल (हे एकप्रकारचं पोलीस खातं आहे, जे सायबर सेल्समधल्या चोरांना पकडतात.) ची मदत घेऊ शकतील.

टिंकरलॅबसाठी : https://tinkerlab.com या लिंकचा वापर करा. ५ मिनिट्स क्राफ्ट या सुप्रसिद्ध साइटचं मुलांसाठीचं वेगळं सेक्शन आहे. यूटय़ूबवर त्यांचे अगणित व्हिडीओज् उपलब्ध आहेत. त्यांच्या यूटय़ूब चॅनेलसाठी https://www.youtube.com/channel/UC57XAjJ04TY8gNxOWf-Sy0Q ही लिंक वापरा.

 

– मुक्ता चैतन्य

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 1:37 am

Web Title: what is e learning
Next Stories
1 ‘कूल’ आइस्क्रीम
2 शर्यत
3 विज्ञानवेध : नवा चॅम्पियन
Just Now!
X