साहित्य : रंगीत कार्डपेपर, स्केचपेन, काळा कार्डपेपर, कात्री, गम, इ.
कृती : आकृतीत दाखविल्याप्रमाणे उभा आयताकृती कागद घ्यावा. दोन्ही बाजू उभ्या मध्यापर्यंत दुमडा व आकृतीत दाखविल्याप्रमाणे वरील बाजूच्या कोनांना त्रिकोणात दुमडा म्हणजे उलटय़ा बाजूने दुमडून सोंडेचा आकार तयार हाईल. त्या त्रिकोणाला डावीकडे दुमडून सोंडेचा आकार बनवा. असा ओरिगामी इको-फ्रेंडली बाप्पा आपल्या शोकेसमध्येसुद्धा विराजमान होऊ शकतो, किंवा तुमच्या घरच्या गणपतीच्या शेजारीही! आवश्यकतेप्रमाणे मोठा कागद घेतल्यास मोठा बाप्पा बनवता येईल.
कागदी कंठी
साहित्य : लाल, हिरवा कार्डपेपर, कात्री, सुई-दोरा, झिगझ्ॉग कात्री, गम, इ.
कृती : लाल रंगाच्या दोन सारख्या आकाराच्या मापाच्या पट्टय़ा घ्या व दोन्ही बाजू एकत्र धरून कात्रीने जवळजवळ कापून घ्या. (दोन्ही तुकडे न करता) फक्त छाट मारत जा. आता पुन्हा ती दुमड उघडा व मध्यावर सुई-दोऱ्याने धावदोरा घाला. तो हळूहळू पट्टीच्या टोकापर्यंत न्या व कापा. हळूवारपणे दोरा जवळजवळ सरकवा. अशा पद्धतीने दोन बाजू बनवा व मध्यावर एखाद्या मोठय़ा पट्टीने फूल बनवा व ते मधोमध बांधून घ्या. झिगझ्ॉग कात्रीने हिरव्या रंगाच्या कार्डपेपरची पाने कापून घ्या. ती कंठीच्या मध्यावर जोडा. झाली तयार आपली इको-फ्रेंडली कंठी! ल्ल
muktakalanubhuti@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art corner
First published on: 14-09-2015 at 01:02 IST