निसर्गात वेगवेगळ्या रंगांची तसेच वेगवेगळा आकार आणि सुवास असणारी फुले आढळतात. काहींचा आकार आणि रंग आपले लक्ष वेधून घेतो. असेच एक सुंदर, नाजूक फूल म्हणजे गोकर्ण. गोकर्ण ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित वनस्पती. Clitoria ternatea (क्लायटोरिया टरनेशिया) हे गोकर्णाचे शास्त्रीय नाव. फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणून याला ‘गोकर्ण’ हे नाव पडले असावे. गोकर्णाच्या फुलांचा रंग गडद निळा असतो. तसेच फिकट निळा, फिकट गुलाबी, सफेद या रंगांची फुले असलेली गोकर्णदेखील आढळते. रंग कोणताही असो; गर्द हिरव्या पानांत ही फुले अगदी उठून दिसतात.

गोकर्णाच्या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो. पाच पाकळ्यांनी बनलेल्या या फुलात एक पाकळी मोठी असते. तिचाच आकार गायीच्या कानासारखा असतो. गोकर्णाच्या वेलीला पावसाळ्यात फुले येतात. फुले काय- अक्षरश: बहर येतो. ही फुले सुकून गेली की शेंगा येतात. शेंगा साधारण फरसबीच्या शेंगेच्या आकाराच्या; परंतु चपटय़ा असतात. कोवळ्या शेंगांची भाजी केली जाते.

Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
simple watermelon doddak pancake recipe
Recipe : कलिंगडाच्या सालींपासून बनवा ‘हा’ स्वादिष्ट पदार्थ! मुलांच्या नाश्त्यासाठी एकदम मस्त

गोकर्णाच्या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक रोग, व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. निळ्या गोकर्णाच्या फुलांपासून नैसर्गिक रंगदेखील तयार केला जातो. गोकर्णाची फुले सावलीत वाळवून त्याची पावडर करतात. या पावडरचा चहा केला जातो. गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून, तो मध किंवा गूळ घालून घेतात.

गोकर्णाची वेल आधार घेत वर वर चढते. बाल्कनीमधील ग्रिलवर सहज आपला जम बसवते.

गोकर्णाची पाने गर्द हिरव्या रंगाची असून ती संयुक्त प्रकारची असतात. सदाहरित वेल असल्याने बारा महिने तेरा काळ वेलीवर पाने असतात. पानांची विशिष्ट रचना आणि आकार यामुळे शोभेची वेल म्हणून उद्यानात हिची लागवड केली जाते. गोकर्णाची वेल बहुवर्षांयू आहे. पानांचा वापर औषधात केला जातो. पंचकर्मात या वेलीचा वापर शरीरातील त्रिदोषांना संतुलित करण्यासाठी, तसेच शरीरातील नको असणारे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी केला जातो.

गोकर्णाची फुले, शेंगा, पाने, साल, मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे. तसेच त्वचा- विकार आणि रक्तशुद्धीकरणासाठीदेखील गोकर्णाचा वापर केला जातो. थोडक्यात काय, तुम्ही कोणताही रोग म्हणा- गोकर्णाचा औषधी म्हणून वापर करायचा विचार करा; गोकर्ण कधीच पराजित होणार नाही- म्हणजे हरणार नाही. म्हणूनच की काय, गोकर्णाला ‘अपराजिता’ असेही सुंदर नाव आहे.

गोकर्णाची लागवड बियांपासून केली जाते. शेंगा पक्व झाल्या की त्यांचा रंग बदलतो आणि त्या तडकतात. त्यातून साधारण आठ-दहा बिया मिळतात. याच बिया रुजवून आपण गोकर्णाची नवीन रोपे तयार करू शकतो. पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही मातीत या बिया अगदी सहज रुजतात. फार मेहनत करावी लागत नाही.

घराची गॅलरी, कमान, शाळेच्या गेटची कमान, मंदिराचे प्रवेशद्वार.. अगदी कुठेही तुम्ही गोकर्णाच्या वेलीची लागवड करून तो परिसर सुशोभित करू शकता.  मग चला तर.. लागा तयारीला. गोकर्णाच्या वेलीला आपल्या हरित- धनात सहभागी करून घेण्यासाठी..

भरत गोडांबे -bharatgodambe@gmail.com