आर्ट कॉर्नर :  करवंटीचा डबा

प्रथम दोन्ही करवंटय़ा खरकागदाच्या साहायाने आतून व बाहेरून घासून स्वच्छ करून घ्या.

bal05साहित्य – दोन करवंटय़ा, फेविबॉन्ड खरकागद, कार्डबोर्डची पट्टी, गोल डबीचे झाकण, गोल बूच.

कृती- प्रथम दोन्ही करवंटय़ा खरकागदाच्या साहायाने आतून  व बाहेरून घासून स्वच्छ करून घ्या. करवंटीचा घेर मोजून त्या आकाराची २ सेमी जाडीची कार्डबोर्डची पट्टी कापून घ्या. ती पट्टी करवंटीला अशा प्रकारे आतून चिकटवा की त्या पट्टीची निम्मी बाजू वर येईल. खालच्या बाजूने गोल डबीचे झाकण उलटे करून चिकटवा म्हणजे करवंटीचा बेस तयार होईल. दुसऱ्या करवंटीला सेंटच्या बाटलीचे किंवा तत्सम गोल आकाराचे बूच फेविबॉन्डच्या साहायाने चिकटवा. दोन्ही करवंटय़ा आकर्षक रंगाने आतून व बाहेरून रंगवा. तुमचा डबा तयार होईल.

गौरी केतकर ketkargauri@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Arts and crafts activities for kids

Next Story
राजेंद्र धवन
ताज्या बातम्या