आर्ट कॉर्नर : टेट्रापॅकचा फ्लॉवरपॉट

टेट्रापॅकचा वरचा भाग कटरच्या साहाय्याने कापून घ्या. टेट्रापॅक आतून स्वच्छ धुऊन घ्या.

साहित्य : मोठा टेट्रापॅक, कटर, कागदाचा लगदा आणि अ‍ॅक्रॅलिक कलर ब्रश

कृती :  टेट्रापॅकचा वरचा भाग कटरच्या साहाय्याने कापून घ्या. टेट्रापॅक आतून स्वच्छ धुऊन घ्या. टेट्रापॅकला बाहेरून चारही बाजूने व खालच्या बाजूने कागदाचा लगदा लावा. त्याचा आकार तसाच राहण्यासाठी टेट्रापॅकच्या आतमध्ये कागदाचे बोळे घाला व उन्हात वाळवत ठेवा. तो पूर्णपणे वाळल्यावर खर- कागदाने अलगद घासा व अ‍ॅक्रॅलिक रंगाने रंगवा. झाला तुमचा फ्लॉवरपॉट तयार. त्यात तुम्हाला आवडतील ती फुले ठेवा.

लगदा तयार करण्याची कृती : कागदाचे बारीक तुकडे करून एका बाऊलमध्ये पाण्यात भिजत ठेवा. लगदा करते- वेळी कागदातले पाणी काढून मिक्सरमध्ये फिरवून घ्या व त्यात फेविकॉल आणि व्हायटनीश पावडर घालून छान मळून घ्या.

गौरी केतकर ketkargauri@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Arts and crafts activities for kids

ताज्या बातम्या