|| रूपाली ठोंबरे

ही गोष्ट आहे निळ्याभोर आकाशात राहणाऱ्या एका गोड परीराणीची. परीराणी… खूप सुंदर आणि हुशार. सर्वांना खूप जीव लावणारी. निळ्या आभाळात सोनेरी उन्हानंतर रोज सायंकाळी मावळत्या सूर्यराजाच्या लालसर प्रकाशाने खुललेल्या त्या अबोली मेघपुंजक्यांमध्ये लपाछपी खेळायला तिला फार आवडत असे. तिच्या  स्वर्गातल्या महालात ऐश्वर्य आणि सर्व सुखसोयी होत्या. त्यामुळे खरं तर ती आनंदी असायला हवी. पण तरी ती मनातून थोडीशी दु:खी असायची. कारण बऱ्याचदा ती एकटीच असायची. इतके सारे छान असूनही काहीतरी होते- जे तिच्या मनासारखे नव्हते. हवेहवेसे, पण तिथे न मिळणारे असे काहीतरी ती शोधत असे. एकदा तिची ही समस्या घेऊन ती देवबाप्पाकडे गेली. म्हणाली, ‘‘इथे माझ्यासाठी छान छान कपडे आहेत. महालासारखे मोठे ढगांचे घर आहे. खायच्या प्यायच्या गोष्टींबद्दल तर विचारायलाच नको. खेळायला खूप काही आहे. पाण्याच्या थेंबांच्या रूपात चमचमणारे हिरे, ताऱ्यांचे शुभ्र मोती, सुवर्णकमळे, इंद्रधनूच्या रंगीत माळा असे खूप खूप दागिने आहेत. आसमंती विहरण्यासाठी चंद्राचा रथसुद्धा आहे. पण का कुणास ठाऊक, मला इथे काहीतरी कमी आहे असे नेहमी वाटते. काय असेल ते, त्याचाही पत्ता लागत नाही. तुला माहीत आहे का असे काय आहे, जे इथे नाही, ज्यामुळे मी इतकी अस्वस्थ आहे? आणि कुठे मिळेल मला ते? त्या एका गोष्टीसाठी मी हे सारे ऐश्वर्य त्यागण्यास तयार आहे. फक्त ती एक अनमोल गोष्ट मला मिळू दे.’’

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

बाप्पाने परीराणीचे हे बोल ऐकले आणि गोड हसून फक्त म्हणाला, ‘‘तथास्तु!’’

आणि काय आश्चर्य! परीराणी आभाळातून थेट खालच्या दिशेने कोसळू लागली. त्या प्रवासात तिला स्वत:मध्ये बरेच बदल होत असलेले दिसले. तिचे पंख गायब झाले. तिचा आकार लहान होऊ लागला. ती अधिकाधिक गोड आणि गोंडस होत गेली. आकाशातल्या जगाचा जणू आता तिला विसर पडला होता. तिने खाली वळून पाहिले… आयुष्यात प्रथमच तिने हिरवळ पाहिली. नाहीतर आकाशात झाडीदेखील सोन्या-रूप्याची होती. आपल्या परीदेशातला आणखी एक हिरवा-निळा असलेला हाच तर स्वर्ग नाही ना? हो… हो, हाच असेल. काय बरे नाव त्याचे? पृथ्वी, धरणी, वसुंधरा… या नव्या स्वर्गात प्रवेश मिळणार हे समजताच ती उत्साहित झाली आणि तिने आणखी वेगाने झेप घेतली. जसजसा नवा ग्रह जवळ येऊ लागला, तसतसे तिला काही क्षणांपूर्वी लुप्त झालेले आपले सप्तरंगी पंख आठवले. आता आपण खाली आदळणार की काय, या भीतीने तिने आपले डोळे गच्च मिटले.

आता आपली पाठ दाणकन् भुईवर आपटणार, या भयभीत अवस्थेत असलेल्या परीराणीला हळूहळू सर्व काही स्थिर झाल्याचे जाणवले. रेशमी दुपट्ट्याच्या मऊ स्पर्शासोबत आणखी एक उबदार स्पर्श तिला जाणवला. कोण असेल बरे ही? आकाशातल्या गावी ऐकलेल्या गोष्टीतली आई असेल का? परीच्या आनंदाला भरतं आलं होतं. ती खुद्कन हसली तशी तिच्या कानावर शब्द पडले, ‘‘हसली रे हसली. माझी परी हसली. बघ बघ, कशी माझ्याकडे बघून हसते आहे ती.’’

…आणि परीराणी एका उबदार, मायेच्या स्पर्शात विसावली. त्या स्पर्शाने परीराणी फार फार सुखावली. म्हणाली, ‘‘बाप्पा, मला आई मिळाली म्हणजे सर्व मिळाले असे वाटते आहे बघ. पण या नव्या देवदूताचे नाव काय ते तरी सांगशील?’’

 इतक्यात बऱ्याच जणांचा गलका ऐकू आला. परीराणीचे कान टवकारले.

‘‘बघा बघा, बाबाची परी. कशी छान हसते आहे. इवल्याशा हातात घेतलेले बाबाचे बोट सोडवतच नाही तिला.’’

‘‘बाबा…’’ तर या देवदूताचे नाव ‘बाबा’ आहे तर! गोष्टीत ऐकले तसे या पृथ्वीच्या स्वर्गात प्रत्येक चिमुकलीच्या जीवनातला पहिला हिरो किंवा सुपरमॅन असतो तो हाच. हा मला हवे ते सर्व आणून देईल. आई मला प्रेमाची अंगाई ऐकवेल. प्रेमाने घास . कधी कधी रागवेल, पण तेही प्रेमाने. योग्य मार्ग दाखवेल. आणि बाबा म्हणजे माझ्या प्रत्येक स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी मदत करणारे हात. कधीतरी चूक झाल्यावर हेच हात उगारले जातील. पण तेही खोटे खोटे. कारण त्यातही प्रेमच असेल! आणि या दोघांच्या मदतीने, स्वत:ची शक्ती आणि बुद्धीने मी या जगातदेखील माझे हरवलेले पंख पुन्हा मिळवेन आणि इथेही उंच भरारी मारेन. बाप्पा, इथेदेखील थोडे कष्ट घेतले की सर्व काही मिळेल मला. आणि सोबत मिळेल एक अनमोल देणगी… जी फक्त इथे जन्म घेणाऱ्यांनाच मिळते : प्रेम. प्रेमच तर शोधत होते मी! इथे आई-बाबांच्या रूपात तर ते मिळेलच, पण क्षणाक्षणाला नवी ओळख होणाऱ्या आजी-आजोबा, आत्या, मामा, दादा, ताई या सर्वांच्या रूपातदेखील इथे प्रेमाचा वाहता झरा माझ्या जीवनात सतत वाहत राहील…’’ असे मनातल्या मनात म्हणत परीराणीने बाप्पाचे आभार मानले.

rupali.d21@gmail.com