|| श्रीनिवास बाळकृष्ण

सुट्टीत गावाला दुपारी रिकाम्या वेळेत मोठय़ांना झोपेची गुंगी आलेली असताना माझ्यातल्या अचाट कल्पनेला, साहसाला, कुतूहलाला जोरदार भरती आलेली असते. माझे पाय स्वत:हून मला अशा ठिकाणी घेऊन जातात, की जिथे काहीतरी गडबड होते. सकाळी स्वच्छ कपडय़ात गेलेलो मी संध्याकाळी कोळशाच्या खाणीतून आल्यासारखा काळा होऊन येतो. कधी कधी मी आणि माझ्याविषयीच्या तक्रारी एकत्रच येतात. तुलाही रविवारच्या सुट्टीत अशीच भरती येतेय का?

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Candidates Chess Tournament Alireza Firuza defeats D Gukesh sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: फिरुझाकडून गुकेश पराभूत
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार
How To Make Kharvas At Home With 1 Cup Milk Without Chikacha Dudh
१ वाटी दुधात बनवा विना चिकाचा खरवस; ‘ही’ सिक्रेट पेस्ट वाचवेल वेळ, मास्टरशेफचा स्पर्धक सॅमची रेसिपी, पाहा Video

येत असेल तर मित्रा पुढची गोष्ट तुझीच आहे.   Querido  (क्युरीडो) प्रकाशनाचे स्क्रम्पल क्लीन आणि स्क्रम्पल डर्टी नावाचं पुस्तक. यातले दोन छोटे किस्से लिहिलेत अ‍ॅनी एम. जी. श्मित (annie M. G.  Schmidt) यांनी! ही स्क्रम्पल सतत कशात तरी बरबटून घेते आणि त्यामुळे सतत अंघोळ एन्जॉय करते. म्हणजे ती दरवेळी मुद्दाम हे करत नाही, तर तिच्याकडून तसं होतं. यात तिचा पाळीव कुत्राही साक्षीदाराप्रमाणे सोबत असतो. मन:स्ताप फक्त आईला! पण आईला न वैतागण्याचा, न ओरडण्याचा जणू आशीर्वाद मिळाला आहे.

हे मूळ डच भाषेतून सोप्या इंग्रजीत केलेलं भाषांतर आहे. यातली चित्रं पुस्तकाला आणखी सोपं करतात. स्क्रम्पल आणि तिचे किस्से रंगवलेत ते जगप्रसिद्ध फिप वेस्टनडोर्प यांनी. यातली ठिकाणं, देश, माणसं, व्यवस्था भारतातील नाही याची जाणीव आपल्याला चित्रांमुळे होते. त्यांची माणसं, प्राणी, वस्तू, सभोवतालचा परिसर काढायची तऱ्हा वेगवेगळी. प्रत्येकाच्या रेषा वेगवेगळ्या पद्धतीने काढलेल्या असल्या तरी त्या खटकत नाहीत. आता हेच बघा ना.. माणसं, प्राणी यांची डोकी गरजेपेक्षा मोठी! कपडे चौकोनी. हात-पाय काडीसारखे. स्क्रॅम्पल सोडल्यास सर्वाचे पाय हातापेक्षा छोटे. बॅकग्राउंडमधल्या काही वस्तू, फर्निचर, पाणी यांच्या रेषा सहज वळणदार अशा.. तर घर, शिडी, गाडी मात्र पट्टीने काढल्यासारखी.

हे सगळं एकत्रित बघताना मजा येते. जुनी कार्टून फिल्म पाहतानाचा फील येतो. असं वाटतं, गोष्टीतली पात्रं चालत होती आणि आपण पानं उघडल्या उघडल्या ती थांबलीत. पान पलटलं की ती पुन्हा चालू, हलू लागतील.

त्याहून धमाल आहे ती रंगकामात. गरज नसेल तर उगीचच कागद भरून रंग फासलेला नाही. त्या सोडलेल्या पांढऱ्या भागामुळे रंगांची मजा अधिक उठून दिसते. रंग प्लेन दिलाय. शेडिंगफेडिंग नाही. त्यावर असलाच तर पॅटर्न किंवा रंगाचे डाग! मीडियम नक्की सांगता नाही येणार; पण हा परिणाम तुम्हाला पोस्टर किंवा गॉश रंगाने मिळवता येईल.. जे आपल्याकडे मिळतात. ब्लॅक जेल पेनने गरजेपुरती आउटलाइन करता येईल.

या पुस्तकाची भन्नाट गंमत म्हणजे याला शेवटचे पानच नाही. ही गंमत साधलीय पुस्तक डिझाइनर इर्मा हॉर्नमन यांनी. दोन्ही बाजूने उलटपुलट उघडलं की नवी गोष्ट सुरू होते. दोन्ही गोष्टी मध्यभागी आत कुठंतरी संपतात. तिथंच पुस्तक उलट करण्याची सूचना येते. मग तसं करायचं.. गोष्ट चालू!

एका कथेत फिप यांना आडव्या पुस्तकात एक उभी, उंच शिडी दाखवायची होती. मग गोष्ट सांगता सांगताच ‘आता पुस्तक उभं पाहा’ अशी पुणेरी पाटी येते आणि पुस्तकासोबत शिडीही उभी होते.. इतकी सहजता!

मला वाटतं, तुमच्याकडे स्वत:च्या उपद्व्यापांचे असे अनेक किस्से असतील.. किंवा मित्र, काका, मामांचे किस्से ऐकले तरी असतील. फिपच्या पद्धतीने, पण भारतीय माणसं काढून पाहू यात का? इथं मी स्क्रम्पलच्या आईला पाहून भारतीय आई काढण्याचा प्रयत्न केलाय. ओळखा बरं काय काय बदललं आहे!

shriba29@gmail.com