मी सांगलीतल्या पलूस नावाच्या एका छोटयाशा गावात राहते. श्रीनिवास बाळकृष्ण यांचा ‘कागदी ड्रोन’ हा लेख वाचून मला करोनातले दिवस (वाईट नाहीत) आठवले. तेव्हा करोनाची नुकतीच सुरुवात झाली होती. मी तेव्हा ११ वर्षांची होते. करोनामुळे पलूस या माझ्या छोटया गावतही खूप बदल झाले. शाळा बंद होती. शाळा नसल्याने जणूकाही मी चंद्रावरच विहार करत होते. त्या वेळी आम्ही- मी आणि माझी नऊ वर्षांची लहान चुलत बहीण- आमच्या शेजाऱ्यांसोबत खेळायचो. शेजारीही मोजकेच होते. आमच्या घराभोवती बहुतेक शेतं होती! तेथे मोजकीच घरं होती. आम्ही दिवसभर लगोरी खेळायचो. लगोरी खेळण्याचा आमचा सर्वोच्च रेकॉर्ड होता दहा तासांचा! दरम्यान फक्त एक लंच ब्रेक. कधी कधी दिवसभर पतंग बनविण्यात घालवत असू. आमच्या चिमुकल्या हातांनी एक पतंग बनिवण्यास संपूर्ण दिवस जाई. गोंद आणि वर्तमानपत्राचे आयताकृती तुकडे एवढयाच सामानात आमचा पतंग तयार होत असे. पतंग तयार करताना घरात गोंद आणि कागदांचा पसारा असे. दिवसभर बसून पाठ भरून येई. कात्रीने हात दुखत. पाय सुन्न पडत. पण त्याची आम्हाला परवा नसायची. आईला कळू नये म्हणून आमची खोली आम्हीच साफ करत असू.

खरी गंमत येई ती दुसऱ्या दिवशी- जेव्हा आम्ही आमचे पतंग आकाशाच्या अथांग समुद्रात उडवत असू! मी मोठी असल्याने धाकटीला ती जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत तिला मी फिरकी देत नसे. कधी कधी योग्य वेळी मांजा खेचणे, वाऱ्याची दिशा ओळखणे किंवा झाडे यांच्यापासून पतंग सांभाळणे कठीण होऊन जाई. आम्ही आमच्या कुत्र्यासह शेतात धावत फिरत असू आणि खूप वेळा पडतही असू. पतंगाच्या कापाकापीत तर खूप मज्जा येई. या लेखामुळे माझ्या या सगळया आठवणी जाग्या झाल्या. माझ्या या धाकटया बहिणीच्या आठवणीनं मन हळवं झालं. करोनाच्या या वाईट आठवणींमध्ये पतंगासोबतच्या सुखद आठवणीच काय त्या लक्षात आहेत. – सतलज अनुपमा अनंत – लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर, पलूस, सांगली.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
CSK vs LSG सामन्यानंतर IPL कडून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई, ऋतुराज-राहुलला १२ लाखांचा दंड
Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
IPL 2024 KKR vs RR and GT vs DC Games rescheduled
IPL 2024: आयपीएलच्या वेळापत्रकात दोन बदल, कोणत्या सामन्यांच्या तारखेत अदलाबदली; जाणून घ्या
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”