विनया साठे

आई मशीनवर शिवण शिवत होती. छोटी मिनू अवतीभोवती खेळत होती. मधेच ती आईचा शिवणाचा टेप घेऊन हाताला गुंडाळायची. गरागरा फिरणारे चाक खाली बसून बघायची.

Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
Summer Special Sabudana Batata Recipe
फक्त १ वाटी साबुदाणा-१ बटाटा आणि तोंडात घालताच विरघळणारे उपासाचे पापड, १५ मिनिटतात ५० पापडाची सोपी कृती
balmaifal story, kids, speak truth, taking care, things, plants, breaking is easy, making is hard, accept fault
बालमैफल: तोडणं सोपं, जोडणं अवघड
Upvasachi bhakari and batata rassa
उपवासाची भाकरी आणि बटाट्याची रस्सा भाजी; ही घ्या मस्त रेसिपी, फराळही होईल चमचमीत-चवदार

‘‘मिनू, तुझ्यासाठी शिवू का छानसा फ्रॉक- मस्त झालरींचा?’’ आईनं विचारलं.
‘‘नक्को, मला छान छान बाहुली हवी.’’ मिनूनं हट्ट धरला.
‘‘अगं, एक बाहुली आहे की तुझ्याकडे!’’
‘‘नको, मला मोठ्ठी बाहुली हवी!’’
‘‘बरं, करू या हं छानदार बाहुली.’’ आई तिचे गालगुच्चे घेत म्हणाली.

आईनं मग शिवणाची पोतडी काढली. त्यात कितीतरी चिंध्या भरून ठेवलेल्या होत्या. आईनं तो ढीग खाली ओतला. मग तिनं बाहुलीची खोळ तयार करून त्यात चिंध्या भरल्या. डोक्यावर एक छोटी टोपी घातली. मोठमोठे डोळे, नकटं नाक, इवलेसे ओठ भरतकाम करून काढले. तिला एक छोटासा फ्रॉक शिवून घातला. आता बाहुली एकदम झकास दिसायला लागली.

मिनूला बाहुली आवडली! ‘छकुली माझी ती,’ म्हणत तिनं तिला उचलून कडेवर घेतले. संध्याकाळी खेळायला आलेल्या मैत्रिणींना तिनं छकुली दाखवली.
मिनूकडे एक दुसरी बाहुलीही होती. तिचे केस सोनेरी होते. उभी असली की ती डोळे उघडायची. आडवं केलं की डोळे मिटवायची. मिनू तिला खोक्यात घालून ठेवायची. छकुली मात्र इतर खेळण्यांबरोबर ठेवलेली असायची.

एक दिवस छकुलीला वाटलं, जरा बाहेर फिरून यावं. अन् सगळय़ांचा डोळा चुकवून ती बाहेर निघाली.
मिनूचं घर गावाबाहेर होतं. आजूबाजूला शेत होतं. छकुली रस्त्यानं जाताना तिला कोणीतरी हाक मारली. हिरव्यागार शेतात एक बुजगावणं उभं होतं. आपले पसरलेले हात हलवत ते छकुलीला बोलावत होतं.
‘‘मी शेतात येऊन काय करू?’’ छकुली म्हणाली.
‘‘जरा वेळ तू इथे उभी राहा. मी येतो फिरून.’’ बुजगावणं म्हणालं.
‘‘नको रे बाबा, मी लांब फिरायला चाललेय,’’ असं म्हणून ती झपाटय़ानं पुढं निघाली.
वाटेतील चौकात शेतकरणीचा पुतळा होता. डोक्यावर टोपली घेऊन ती निघाली होती. छकुलीने तिला विचारलं, ‘‘तू कुठे निघालीस?’’
गेली काही वर्षे मी इथंच उभी आहे. मला अगदी कंटाळा आलाय. वाटतं, बाजूच्या शेतात फिरून यावं. पण इथून जाणार कसं?’’
मग तिचा निरोप घेऊन छकुली पुन्हा पुढे निघाली. पण आता शेतवळणाचा रस्ता संपला. हमरस्ता सुरू झाला. त्यावरून मोठमोठी वाहनं भरधाव वेगानं जात-येत होती.

छकुली घाबरून एका झाडाखाली उभी राहिली. बराच वेळ गेला. एव्हाना तिचे पाय दुखायला लागले होते. घराच्या आठवणीनं चिमण्या डोळय़ांत पाणी आलं. एवढय़ात तिच्या कानावर आवाज आला. ‘‘अगं, ती बघ छकुली!’’
अन् काय आश्चर्य, मिनू व तिची मैत्रीण तिला शोधत शोधत तिच्याच जवळ येत होत्या. शाळेतून त्या घरी चालल्या होत्या.
‘‘अगं, ही तुझी बाहुली इकडे कशी आली?’’ मैत्रीण मिनूला विचारत होती.
काही न बोलता मिनूने छकुलीला उचलून कडेवर घेतलं. ‘‘छकुले, अगदी दमलीस ना तू. चल आता घरी जाऊया.’’ अन् छकुलीनं खुशीत येऊन डोळे मिचकावले!!
lokrang@expressindia.com