scorecardresearch

बालमैफल: पृथ्वीचं सरप्राइझ

‘‘तुझ्याभोवती फिरताना मला फार आनंद होतो. कारण कितीतरी माणसं, इमारती, गाडय़ा, कारखाने, झगमगाट..

balmaifal
बालमैफल: पृथ्वीचं सरप्राइझ

रेणू दांडेकर

‘‘तुझ्याभोवती फिरताना मला फार आनंद होतो. कारण कितीतरी माणसं, इमारती, गाडय़ा, कारखाने, झगमगाट.. हे सारं पाहायला मला खूप आवडतं.’’ चंद्र पृथ्वीशी फोनरून बोलत होता. चंद्राचा फोन आला की पृथ्वीलाही आनंद व्हायचा. भाऊच ना तो तिचा!

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

पृथ्वी चंद्राला म्हणाली, ‘‘एक वेगळं सरप्राइझ आहे माझ्याकडे तुझ्यासाठी.’’
चंद्रानं विचारलं, ‘‘काय गं?.. सांग ना! लवकर सांग.’’
‘‘अरे, तुला सांगितलं तर मग ते सरप्राइझ कसलं?’’ पृथ्वी हसत म्हणाली. तिला चंद्राच्या मनातली उत्सुकता फोनवरही जाणवत होती.
चंद्र म्हणाला, ‘‘ए, ऐक ना, मी एक छानसं फंक्शन करावं म्हणतो आणि तुझ्याकडील माणसांना इकडे बोलवावं, त्यांनी इथे मस्त फिरावं, मज्जा करावी..’’ पृथ्वीला हे ऐकून आनंदच झाला होता. इथला एक माणूस चंद्रावर जाऊनही बरीच वर्षे झाली होती.

पृथ्वीशी बोलून खूप दिवस झाले होते. पृथ्वीवरील भारत देशात एक वेगळीच लगबग सुरू झाली होती. तिथल्या माणसांच्या तोंडी आपल्याच नावाचा धोशा सुरू होता हे एकाएकी त्याच्या लक्षात आलं. त्यानं चटकन पृथ्वीचा फोन नंबर फिरवला. आता तो आय फोन नाही तर सन फोन वापरू लागला होता. या फोनमध्ये अशी रचना होती की त्या माणसाचं नाव घेतलं की त्याच्याशी बोलता येत होतं. तो फोन चार्जही करावा लागत नव्हता नि बिल सूर्याला भरावं लागत असे.

चंद्राने सुरुवातच केली- ‘‘पृथ्वी, तुला माहितेय, भारतातून अंतराळात आलेला माणूस म्हणजे राकेश शर्मा. आता वयस्क झाले आहेत ते. माझ्याशी ते रोज गप्पा मारतात. ते एका खेडय़ात राहतात. खूप आनंदात असतात. तेव्हा लोकांनी त्यांना अगदी डोक्यावर घेतलं आणि आज विसरूनही गेले..’’

पृथ्वी म्हणाली, ‘‘अरे, एवढी माणसं माझ्याकडे राहतात. रोज काय काय नवं घडत असतं. लोक जसं लक्षात ठेवतात तसंच विसरतातही, पण नाव अजून अमर आहेच.. आपण मात्र असं छान फिरत राहायचं! मजा येते दुरून एकमेकांना बघायला..’’ चंद्राला खरं तर अगदी गहिवरून आलं होतं. पृथ्वीवरल्या कुणाचा मी मामा होतो, भाऊ होतो, कधी कुणी लहानग्यांना घास भरवताना माझं नाव घेतो.. पृथ्वीवरचे लोक मला किती जवळचं मानतात. फोन कट झाला होता, पण चंद्र आठवणींत रमून गेला होता.

आज सकाळी सकाळी पृथ्वीनं चंद्राला पुन्हा फोन लावला, ‘‘आज संध्याकाळी तुझं सरप्राइझ तुला मिळेल. थेट मिळेल. पाठवलंय एका वल्र्ड पोस्टनं!’’
चंद्रानं विचारलं, ‘‘वल्र्ड पोस्ट ही काय भानगड आहे?’’
पृथ्वी म्हणाली, ‘‘अरे, म्हणजे आपल्या कोणत्याही मित्रग्रहावर आपण पत्रं पाठवू शकतो. आपला मेसेज पाठवू शकतो.’’
‘‘ऐकावं ते नवलच! तुझ्याकडची माणसं काय करतील काही नेम नाही गं!’’ चंद्र म्हणाला. आज पृथ्वीशी छान गप्पा माराव्यात असाच त्याचा मूड होता. त्यामुळे फोन ठेवावा असं चंद्राला वाटतच नव्हतं. आपल्या लहान मुलांचं कसं होतं की, वाढदिवसाला काय भेट मिळेल याची उत्सुकता असते तशीच आज चंद्राची अवस्था झाली होती.

आज पृथ्वीनं चंद्राला व्हिडीओ कॉलच लावला. आज एका इमारतीमधील अनेकांचं हृदय धडधडत होतं. सगळी माणसं अगदी प्राण कंठाशी आणून टीव्ही पाहात होती. व्हिडीओ पाहताना चंद्र म्हणाला, ‘‘अगं पृथ्वी! कसलं मशीन हे! आणि माझ्यासारखं कोण दिसतंय गं!’’ खरं तर पृथ्वीही थोडी टेन्शनमध्ये होती. तरी ती हसली आणि म्हणाली, ‘‘नाही रे! तुला तसं वाटतंय.. ही माणसं हा दिवस कधी येईल याची वाट पाहत होती. कारण पूर्वी असं झालं नि यश मळालं नाही, पण यश मिळालं नाही म्हणून खचून जाईल तो माणूस कसला! घडय़ाळाचे काटे फिरत होते, सगळय़ा जगभर लोकांचे टी.व्ही. ऑन होते. डोळय़ांत प्राण आणून लोक बघत होते. यात राकेश शर्मा होते. अनेक नेते होते. परदेशातले भारतीय होते, जगभरातले शास्त्रज्ञ होते.. आज शास्त्रज्ञांच्या एका गटानं वेगळीच तपस्या केली होती! तीन वाजले, चार वाजले, पाच वाजले आणि संध्याकाळी ६.१५ मिनिटांनी पृथ्वीनं चंद्राला पाठवलेलं सरप्राइझ गिफ्ट त्याच्याकडे येत होतं. चंद्र आज भरपूर आनंदात होता. आपल्याकडे पृथ्वीच येत आहे या भावनेनं त्याचं मन भरून आलं होतं. पृथ्वीच्या विक्रम लॅंडर या गिफ्टचं स्वागत कसं करावं हे त्याला कळेना! इथं ठेवू का तिथं? अरे अरे तिथं नको. तिथे एक खोल खड्डा आहे, असं चंद्र मनात म्हणत होता. आणि मग चंद्रानं या गिफ्टला एका योग्य जागी आपल्या जवळ घेतलं. बरेच वर्षे पृथ्वीकडून चंद्राच्या दक्षिण धृवावर कोणी येत नाही ते आज आलं याचा तर आनंद झालाच होता, पण त्याहीपेक्षा भारतच चंद्रावर आला याचा आनंद चंद्राला जास्त झाला होता. कारण त्याच्या लाडक्या बहिणी, भाचरं इथेच तर राहतात.’’

renudandekar@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-09-2023 at 00:03 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×