सिंध प्रांताचे महाराज जगजोत सिंग राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करून आपल्या दरबारी असलेल्या कारभाऱ्यांबरोबर पत्त्यांचा जुगार खेळण्यात मग्न असत. त्यांच्याकडे असलेले भारी किमतीचे पत्ते ते जुगार खेळण्यासाठी वापरीत. त्यांच्या जुगार खेळण्याच्या सवयीमुळे त्यांना प्रत्यक्षात राज्यकारभारात लक्ष देण्यास bal02वेळ मिळत नसे. अनेक प्रकारचे खटले कित्येक महिने न्यायाअभावी प्रलंबित होते. प्रधान आणि त्यांचे काही दरबारी अधिकारी महाराजांच्या गैरहजेरीचा फायदा घेत मनमानी कारभार करीत असत.
महाराज स्वभावानं ऐदी व स्वच्छंदी होते. जुगारात जिंकणाऱ्या व्यक्तींना ते उदार हस्ते त्यांनी मागितलेली धनसंपत्ती देत. कधी कधी शेतजमिनींची मागणीही पुरवीत. जिंकणाऱ्याला थोडीशी दौलत दिली तर आपल्या संपत्तीनं भरलेल्या खजिन्यावर फारसा भार पडणार नाही, या विचारानं ते बिनधास्त असतं.
राजाच्या पदरी रामधन नावाचा एक प्रामाणिक व विश्वासू सरदार त्यांचा खास सल्लागार म्हणून कार्यरत होता. महाराज जुगारात घालवीत असलेली दौलतीची खैरात त्याला मुळीच आवडत नसे. पण महाराजांच्या हट्टी स्वभावामुळे होणाऱ्या उधळपट्टीला आळा कसा घालावा, या विचारानं त्याची झोप उडाली होती. हळूहळू महाराजांचा खजिना रिता होऊ लागला. जनतेला मिळणाऱ्या सोयी-सवलतीत कमतरता भासू लागल्यावर रामधननं महाराजांच्या जुगाराच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी एक नामी योजना तयार केली व ती अमलात आणली.
रामधननं बुद्धिबळ खेळण्याच्या पटासारखा एक मोठा सारीपाट तयार केला. सोबत लागणाऱ्या सोंगटय़ाही तयार केल्या. आणि एके दिवशी हिंमत करून तो महाराजांना भेटण्यास त्यांच्या महालात गेला. महाराज नेहमीप्रमाणे जुगार खेळण्यासाठी त्यांच्या  दिवाणखान्यात जाण्यास निघाले होते. त्यांना खास विनंती करून थांबवीत रामधन म्हणाला, ‘‘महाराज, क्षमा करा माझ्या आगंतुक बोलण्याची! महाराज, आपणास तोच तोच पत्त्यांचा जुगार खेळून कदाचित कंटाळा आला असणार. तेव्हा मी एक कौरव-पांडवांच्या काळात जुगारासाठी खेळला जाणारा चौसष्ट चौकोन असणारा सारीपाट आपणासाठी बनविला आहे. आपण जर परवानगी दिलीत तर आपण दोघं मिळून हा जुगार खेळू.’’
रामधन महाराजांची प्रतिक्रिया आजमावत थोडा वेळ थांबला.
रामधनच्या या नव्या सारीपाटाकडे कुतूहलानं बघत महाराज म्हणाले, ‘‘हा पट कसा खेळावयाचा याची आधी माहिती देशील का?’’
वेळ न दवडता रामधन म्हणाला, ‘‘महाराज, हा खेळ सोपा आहे. सोंगटीच्या चारी बाजूंवर १, २, ३, ४ असे आकडे लिहिले आहेत. आपणास अपेक्षित असणारा आकडा सोंगटीवर पडला की आपण जिंकणार. नाही आला तर समोरची व्यक्ती जिंकेल. हळूहळू खेळात रंगत येऊन आपली करमणूक होईल, तसेच हरणाऱ्या व्यक्तीकडून आपल्याला भरपूर कमाई करता येईल. बघायचं का या प्रयोगाचं प्रात्यक्षिक करून?’’
महाराज क्षणभर विचारात पडले. पण मानेनं होकार देत म्हणाले, ‘‘हा खेळ खेळताना आपण माझ्या जुगारी मित्रांना या खेळाचं स्वरूप, महत्त्व, त्यातील धोके आणि प्राप्त होणारी मिळकत समजावून देऊ, मगच आपण डाव मांडू.’’
महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून रामधननं उपस्थितांना खेळाचं एकूण स्वरूप समजावून देण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, ‘‘आपण सर्व सुशिक्षित आहात. गणितातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची कल्पना आपल्याला असणार यात मुळीच शंका नाही. आपण खेळाची सुरुवात सारीपाटातील पहिल्या चौकोनात फक्त एक रुपयाचं नाणं ठेवून करू. पुढच्या चौकात प्रत्येक दुप्पट संख्येने वाढ करावयाची आहे. म्हणजेच दुसऱ्या चौकोनात एक रुपयाची दुप्पट म्हणजे दोन रुपयांनी वाढ होईल. चार रुपये तिसऱ्या चौकोनात, आठ चौथ्या चौकोनात. पुढे दुपटीच्या संख्येने वाढवीत गेल्यास, १० व्या चौकोनात ५१२ रुपये ठेवावे लागतील. विसाव्या चौकोनात रुपयांची संख्या ५,२४,२८८ या संख्येवर जाऊन पोहोचेल. जेव्हा अध्र्यापर्यंत म्हणजे ३२ व्या चौकोनात येऊ तेव्हा रुपयांची संख्या १४,७४,८३,६४८ येऊन पोहोचेल. पुढील प्रत्येक चौकोनात ही संख्या कित्येक कोटींच्या घरात जाईल. कळलं?’’ रामधन सर्वाची प्रतिक्रिया आजमावीत म्हणाला.
रामधननं ऐकविलेल्या कोटींच्या आकडय़ांनी महाराजांचं डोकं भणाणून गेलं. आपण जुगारात आजतागायत कितीतरी धनसंपत्ती आणि जमीन गमावली, या विचाराने ते बेचैन झाले. निव्वळ एक रुपया लावलेल्या जुगाराने कोटय़वधीत रूपांतर होते आणि माणूस बरबाद होतो, ही कल्पना महाराजांच्या मनावर ठसविण्यात रामधन यशस्वी झाला होता. महाराजांनी भविष्यात जुगार न खेळण्याची शपथ वाहिली आणि राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जुगार खेळता
कामा नये, अशी राजाज्ञा केली. रामधननं आपले डोळे उघडल्याबद्दल त्याचा गौरव करून
बक्षीस दिलं.
बालमित्रांनो, संचयशक्तीचा विसर पडू देऊ नका. दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवली तर भविष्यात ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीनुसार आपली आार्थिक टंचाई दूर होईल. आपण ३२ चौकोनातील रकमेनंतर ३३ ते ६४ चौकोनांपर्यंत एकूण किती रक्कम होईल याचा पडताळा घ्या.
पु. ग. वनमाळी

sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष
dispute over agricultural land
कोल्हापूर: शेतजमीनीच्या वादातुन झालेल्या मारहाण आणी गोळीबार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल