अदिती देवधर

‘कचरा मुळातच कमी कसा करता येईल?’ यशच्या डोक्यातून हा विचार जात नव्हता. आज तो आजीला मदत करायला गेला होता. आजीच्या माळय़ावरची पातेली, भांडी, ताटं काढायची होती. नवीन लग्न झालेल्या एका जोडप्याला त्या सगळय़ा गोष्टी ती देणार होती. माळय़ावरून या सगळय़ा गोष्टी काढताना यशला एक डबा मिळाला- एकावर एक असे तीन डबे असलेला. त्यावर काहीतरी कोरलेलं होतं. यशनं उजेडात बघितलं तर त्याच्या बाबाचंच नाव होतं.

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

‘‘अरे हो, बाबाचा डबा आहे. शाळा आणि नंतर कॉलेजलासुद्धा हाच डबा न्यायचा तो.’’ आजीने सांगितलं.

‘‘एवढी वर्षे वापरून डब्याला काहीच झालं नाहीये.’’ डबा निरखून बघत यश आश्चर्याने म्हणाला.

‘‘स्टीलच्या डब्याला काय होणार? तुझ्या आजोबांचा डबासुद्धा आहे. चाळीस वर्षे ऑफिसला हाच डबा नेत होते.’’ आजी एक मोठा डबा दाखवत म्हणाली.

सध्या फास्टर फेणेचा चाहता झालेल्या यशनं त्याच्यासारखंच ‘टॉक्क’ केलं.

‘‘कचरा कमी करण्याचा एक उपाय मिळाला.’’ संपदा, यतीन आणि नेहासमोर तो डबा ठेवत यश म्हणाला.

तिघेही गोंधळून त्याच्याकडे बघत होते.

‘‘माझा डबा प्लॅस्टिकचा आहे. मागच्या वर्षी आणला होता. झाकण घट्ट बसावं म्हणून चार बाजूला प्लॅस्टिकचे खटके आहेत. दोन एव्हाना तुटले आहेत. आणखी एक तुटला की मग झाकण बसणारच नाही. आतल्या भाजीच्या डब्यालाही चीर गेली आहे. म्हणजे लवकरच नवीन डबा आणावा लागेल.’’ एकादमात तो म्हणाला.

‘‘हो, मलाही दर दोन वर्षांनी नवीन डबा आणावाच लागतो.’’ नेहानेही आपली  कैफियत मांडली.

‘‘मला तर दरवर्षीच. कितीही नीट वापरला तरी डब्याच्या झाकणाला चीर पडतेच.’’ यतीन जरा हरमुसला होऊन म्हणाला.  

‘‘पण हाच बाबाचा डबा बघा. त्यानं शाळा आणि कॉलेज मिळून चांगली सोळा वर्षे वापरला तरी त्याला काही झालेलं नाही. मी उद्यापासून हा वापरणार आहे.’’ यशनं जाहीर केलं.

‘‘खरंच की. आपले तिघांचे सोळा वर्षांत आठ डबे होणार तर यतीनचे सोळा वर्षांत सोळा डबे. जे डबे आपण वापरणार तेच नंतर कचरा म्हणून जाणार.’’ संपदा चमकून म्हणाली.

‘‘हो, त्याऐवजी एकदा स्टीलचा डबा आणला तर परत डबा आणावाच लागणार नाही.’’ नेहाने कल्पना मांडली.

‘‘शिवाय जसा मी बाबाचा डबा वापरणार आहे, तसा पुढे आणखी कोणी वापरू शकेल.’’ यश म्हणाला.

‘‘आपल्याला तोच तोच वापरून कंटाळा आलाच तर आपण एकमेकांत अदलाबदल करू शकतो.’’ इति नेहा.

‘‘अरे हो, भारी आहे हे. ठरलं तर मग. नवीन डबा जेव्हा आणू तेव्हा स्टीलचाच आणायचा.’’ संपदा म्हणाली. सगळय़ांनी हात मिळवून या कल्पनेला संमती दिली.

‘‘आणखी कुठले बदल केले तर कचराच कमी निर्माण होईल?’’ संपदा कागद आणि पेन घेऊन आली.

कचरा कमी करायचा या विचाराने झपाटलेली आपली चौकडी विचार करू लागली आणि त्यांची यादी तयार होऊ लागली.

aditideodhar2017@gmail.com