प्राची मोकाशी mokashiprachi@gmail.com

सभा नुकतीच संपली होती. महाराज दरबारात त्यांच्या सिंहासनावर विराजमान होऊन मोबाइल ‘ब्राऊझ’ करत होते. आज सभेला उपस्थित बारा-तेरा वर्षांचे राजकुमारही त्यांच्या मोबाइलमध्ये व्यग्र होते.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

‘‘कुमार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल माहिती देणाऱ्या आमच्या व्हिडीओला भरपूर ‘लाइक्स’ मिळताहेत. प्रजेला त्यांचे कितीतरी अधिकार माहितीच नसतात. म्हणूनच आम्ही असे माहितीप्रद व्हिडीओ सध्या पोस्ट करतोय.’’

‘‘‘अभी’ नावाची कुणी ‘व्यक्ती’ आहे का, पिताश्री?’’

या राजकुमाराच्या प्रश्नावर महाराज जोरात हसले.

‘‘कुमार..’’ दरबारात येताना प्रधानजींनी दोघांचं संभाषण ऐकलं आणि मुजरा करत ते दबक्या आवाजात म्हणाले, ‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे ‘फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन’! राजकुमार असून ही संकल्पना तुम्हाला माहिती नाही हे कुणाला समजलं तर अजून एक विषय मिळेल प्रजेला चघळायला.’’

‘‘प्रधानजी, इतकं हळू का बोलताय? आम्ही मस्करी करत होतो.’’ राजकुमारही हसले.

प्रधानजींनी खजीलपणे त्यांचा मुकूट सावरला.

‘‘या प्रधानजी.. आज सभेला उपस्थित नव्हता तुम्ही! आपल्या ई-लर्निग विद्यापीठाचा उपक्रम सुरळीत सुरू आहे ना?’’ महाराजांचा प्रश्न.

‘‘तिथे सगळं आलबेल आहे, महाराज. एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय. हा फोटो तुम्ही पोस्ट केलाय नं सोशल मीडियावर..?’’ प्रधानजींनी त्यांच्या मोबाइलवर आलेला फोटो महाराजांना दाखवला.

‘‘होय, आमच्या लहानपणीचा! आमच्या मावसबहीण चित्रलेखादेवींबरोबर खेळतोय आम्ही! कुमारांना फोटो खूप आवडला म्हणून ‘आठवणींचे क्षण’ अशी कॅप्शन देऊन आम्ही तो पोस्ट केला.’’

‘‘हा प्रचंड ‘ट्रोल’ होतोय.’’

‘‘यात काय आहे ट्रोल होण्यासारखं?’’ महाराज अचंबित झाले.

‘‘त्याकाळी चित्रलेखादेवींचा विवाह आपल्या शत्रराजाशी झाला होता. तुम्ही म्हणे तेव्हा त्यांना आर्थिक मदत केली होती.’’

‘‘पण त्याला कित्येक वर्ष लोटली. त्याचं आता काय?’’

‘‘ट्रोलर्सना कुठलंही निमित्त पुरतं महाराज. ते कुणाचाही इतिहास, भूगोल उकरून काढतात. ही माहिती व्हायरल झाल्यामुळे प्रजेमध्ये नाराजी पसरलीये.’’

प्रधानजी पुढे काही म्हणणार इतक्यात राजकुमारांचा फोन वाजला. महाराजांची आज्ञा घेऊन ते दरबाराबाहेर गेले.

‘‘प्रधानजी, प्रजेमध्ये ज्या कुणाला शंका आहे, त्याने थेट आम्हाला येऊन विचारावं. आपल्या राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आम्हीही त्याचा आदर करतो, हे प्रजेला ठाऊक आहे. ट्रोल करून काय मिळणार त्यांना?’’

‘‘तरीही तुमच्याविरोधात जोक्स आणि मीम्स व्हायरल होताहेत.’’

‘‘हे भयंकर आहे! आमच्यावर काढलेल्या एखाद्या निरुपद्रवी व्यंगचित्राचा किंवा केलेल्या उपरोधिक विनोदाचा आनंद आम्हीही मोकळेपणाने घेतो, किंबहुना त्या कलाकाराला प्रोत्साहनच देतो. राज्यकर्त्यांच्या चुका दाखवून द्यायला ही प्रभावी माध्यमं आहेत. हे स्वातंत्र्य असायलाच हवं. पण अशा प्रकारे खोटी माहिती व्हायरल करणं, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे! मेसेज फॉरवर्ड करताना, ट्रोलिंग करताना आपण कुठल्या विचारांचं समर्थन करतोय हे भान प्रजेला हवंच!’’

‘‘महाराज, सोशल मीडियावरचे ग्रुप्स आणि नेटवर्किंग साईट्स म्हणजे इंटरनेटवरची जमाव मानसिकता! एकदा का त्यात आपण अडकलो की स्वत:च्या विचारांचे तारतम्य आपण गहाण ठेवतो, हेच खरं.’’

‘‘या प्रकरणाचा छडा त्वरित लावायला हवा प्रधानजी..’’

इतक्यात दरबाराबाहेर गोंधळ ऐकू आला. राजकुमार आणि महाराजांच्या विश्वासातले तीन-चार पहारेकरी सेनापतींना बंदिस्त करून दरबारात घेऊन आले. सोबत ‘सायबर गुन्हा विश्लेषक’ सत्येंद्रनाथदेखील होते.

‘‘कुमार, हे काय आहे?’’ महाराजांना समजेना.

‘‘पिताश्री, हा सेनापतीच गुन्हेगार आहे. याने तुमच्या फोटोवर ट्रोिलग सुरू केलं. फोन आल्यावर बाहेर गेलो असताना आम्ही स्वत: याला एका सैनिकाशी बोलताना ऐकलं. म्हणून आम्ही थेट सत्येंद्रनाथांशी संपर्क साधला.’’

‘‘महाराज, सेनापती आणि त्यांचे काही विश्वासातले सैनिक मिळून अनेक ‘फेक’ नावांनी सोशल मीडियावर तुमची मानहानी करण्याच्या इराद्याने मोहीम राबवताहेत. प्रजेमध्ये असंतोष निर्माण करून तुमची सत्ता उलथवून लावण्याचा त्यांचा मानस होता.’’

 सत्येंद्रनाथांनी पुरावे प्रस्तुत केले. महाराजांना धक्काच बसला.

‘‘प्रधानजी, हे एक प्रकारचं शाब्दिक युद्धच म्हणायला हवं. राज्याचा सेनापतीच जर याचा पुढारी असेल तर प्रजेची काय बात? घेऊन जा याला.. याची चौकशी होईल.’’ महाराज पहारेकऱ्यांना म्हणाले.

‘‘सत्येंद्रनाथ, याला काही तोडगा?’’ हताशपणे सिंहासनावर बसत महाराजांनी पुढे विचारलं.

‘‘चुटकीसरशी तरी नाही महाराज. मात्र, हे होऊ नये याची पहिली पायरी आपण स्वत: आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड आपण काहीही लिहू शकतो, हा विचारच मुळी चुकीचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण खरं तर एकजूट होऊ शकतो; पण आज जात, धर्म, राजकारणाच्या नावाखाली आपल्यात फूट पडताना दिसते. सायबर बुिलगसारख्या प्रकारांतून राजकुमारांच्या वयाच्या मुलांना प्रचंड धोका आहे. त्यांच्या हातात आज मोबाइल आहे. तो कसा जबाबदारीने वापरावा, हे त्यांना समजावण्याआधी आपल्याला समजायला हवंय. सोशल मीडियावर सक्रिय असताना आपण काय लिहितोय, कुणाला लाइक किंवा ट्रोल करतोय हे नि:पक्षपाती भान आपणच ठेवायला हवं.’’ सत्येंद्रनाथांनी विस्तृतपणे समजावलं.

‘‘खरंय! प्रजेमध्ये ही जागरूकता निर्माण करायला आपल्या ई-लर्निग विद्यापीठामार्फत आपण ऑनलाइन उपक्रम सुरू करून तिथे सोशल मीडिया वापरण्याचे नियम, शिष्टाचार शिकवले जातील. आजमितीला हे अत्यावश्यक आहे.’’

महाराजांनी सत्येंद्रनाथांचे आभार मानले.

 एवढय़ात महाराजांचा मोबाइल वाजला. त्यांच्या फोटोला चित्रलेखादेवींनी ‘रीस्पॉन्स’ दिल्याचं ‘नोटिफिकेशन’ आलं होतं.

‘‘प्रधानजी, आम्ही इतकी युद्धं लढलो, पण शस्त्रास्त्रांपेक्षाही शब्दांचं सामर्थ्य परिस्थिती घडवू किंवा बिघडवू शकतं हे आता जाणवतंय.’’ हे वाचून महाराज मंद हसले.

‘‘पिताश्री, म्हणतात नं, ‘वुईथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रीस्पॉन्सिबिलिटी.’’’ राजकुमार उद्गारले. ‘‘वाह कुमार, काय बोललात! लगेच ही ‘कोट’ सोशल मीडियावर पोस्ट करतो..’’ म्हणत प्रधानजींनी डोळे मिचकावले. महाराज बऱ्याच वेळाने दिलखुलास हसले.