नववर्षांचे स्वागत करण्याच्या निमित्ताने निखिल, अखिलेश आणि अनिकेत एका रेस्टॉरंटमध्ये भेटले. प्रत्येकाने आपल्या आवडीचे सूप, भाजी आणि गोडाचा पदार्थ मागवला. तिघांनी मागवलेले पदार्थ पूर्णपणे वेगळे होते. या आणि पुढे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणी काय पदार्थ मागवले, ते शोधा.
सूप : १) टोमॅटो २) स्वीट कॉर्न
३) व्हेज क्लियर
जेवणातील मुख्य डिश (भाजी) :
१) मशरूम मसाला २) बटर चिकन
३) फिश करी
गोड पदार्थ (डेझर्ट) : १) आइस्क्रीम
२) फ्रुट पंच ३) फुट्र केक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूचक माहिती (क्लू)

१) निखिलने सूप आणि गोड पदार्थातील पहिला पर्याय निवडला नाही.
२) अखिलेशने बटर चिकन घेतले होते. परंतु गोड पदार्थाचा दुसरा पर्याय निवडला नव्हता.
३) ज्या मित्राने पहिला गोडाचा पदार्थ घेतला होता त्याने भाजीचा तिसरा पर्याय निवडला.
४) निखिल आणि अखिलेशने दुसऱ्या प्रकारचे सूप घेतले नव्हते. ल्ल

कसे सोडवाल?
१) दुसऱ्या क्लूनुसार अखिलेशने बटर चिकन घेतले होते.
२) पहिल्या आणि तिसऱ्या क्लूनुसार अनिकेतने फिश करी घेतली आणि आइस्क्रिम घेतले होते.
३) चौथ्या क्लूनुसार अनिकेतने स्वीटकॉर्न सूप घेतले. त्यामुळे पहिल्या क्लूनुसार निखिलने व्हेज क्लियर आणि अखिलेशने टोमॅटो सूप घेतले.
४) अनिकेतने आइस्क्रीम निवडलेले असल्यामुळे दुसऱ्या क्लूनुसार अखिलेशने फ्रुट केक आणि निखिलने फ्रुट पंच मागवले होते.

मनाली रानडे

More Stories onगेम्सGames
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Games for the brain
First published on: 20-12-2015 at 00:53 IST