साहित्य : हँडमेड पेपर, टिकल्या, बटणं, गम, इ.कृती : ४ ते ५ लाडू मावण्याइतकी वाटी बनवायची असल्यास साधारण १५ सेमी ७ १५ सेमी आकारात चौकोन कापून घ्या. आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक-एक दुमड घालून सावकाश चारही कोपरे उघडा. व्हॅली फोल्डप्रमाणे बाहेरील त्रिकोणांना रंगीत बटणं व टिकल्यांनी सुशोभित करा. या संक्रांतीला पर्यावरणप्रेमी कागदी वाटय़ांमधून तीळगूळ द्या आणि गोड-गोड बोला.