scorecardresearch

डोकॅलिटी

नदी हे भारतीयांचे पवित्र श्रद्धास्थान आहे. हाच आजच्या कोडय़ाचा विषय आहे. एका गटात तुम्हाला काही नद्यांची नावे दिलेली आहेत. तसेच दुसऱ्या गटात काही प्रसिद्ध गाणी, अभंग, श्लोक देत आहोत.

डोकॅलिटी

नदी हे भारतीयांचे पवित्र श्रद्धास्थान आहे. हाच आजच्या कोडय़ाचा विषय आहे. एका गटात तुम्हाला काही नद्यांची नावे दिलेली आहेत. तसेच दुसऱ्या गटात काही प्रसिद्ध गाणी, अभंग, श्लोक देत आहोत. त्यातील रिकाम्या जागी योग्य त्या नदीचे नाव (व्याकरणदृष्टय़ा योग्य त्या रूपात) तुम्हाला भरायचे आहे. काही नद्यांची नावे एकापेक्षा जास्त वेळा आलेली असू शकतात.
नद्यांची नावे : इंद्रायणी, कऱ्हा, कालिंदी, कावेरी, कृष्णा, गंगा, गोदावरी, चंद्रभागा, नर्मदा, भीमा, मंदाकिनी, यमुना, शरयू, साबरमती, सिन्धु
१) गंगा — सरस्वती च यमुना, गोदावरी —।
 कावेरी — महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका।
 क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गण्डकी।
पूर्णा: पूर्णजलै: समुद्रसहिता: कुर्वन्तु मे मंगलम्॥
– मंगलाष्टक

२) गंगेच यमुने चैव —- सरस्वती।
  नर्मदे सिन्धु — जलेस्मिन् सन्निधिम कुरु।
 – स्नानाचा श्लोक

३) नकोस नौके, परत फिरूं गं, नकोस — ऊर भरूं
  श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं

४) रिमझिम पाऊस पडे सारखा
  — लाही पूर चढे
  पाणीच पाणी चहूकडे, गं बाई
  गेला मोहन कुणीकडे

५) कशि जांवू मी वृंदावना।
  मुरली वाजवी गं कान्हा॥ १॥
  पैलतिरीं हरि वाजवी मुरली।
  नदी भरलीं —॥ २॥

६) —- काठी, देवाची आळंदी।
  लागली समाधी, ज्ञानेशाची।

७) नामाचा गजर गर्जे — तीर।
  महिमा साजे थोर तुज एका

८) —– च्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
  दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी
  विठ्ठल विठ्ठल जय हरी॥    

९) देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला
  म्हणेन प्रभू रे माझे सारे जीवन देई मम बाळाला
  —  —  स्नान घालु दे, रखुमाबाई तीट लावु दे
  ज्ञानेशाची गाऊन ओवी मुक्ताई निजवु दे तुजला

१०) या इथें, लक्ष्मणा, बांध कुटी
    या —- च्या तटनिकटीं

११) दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल।
   —- के संत तूने कर दिया कमाल।

१२) घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
    —– च्या तटी श्रीहरी
    तशात घुमवी धुंद बासरी
    एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा

१३) सा रे ग म प
    म प ध नी सा॥
    —– नदीच्या तीरावरती
    घे गजमुख अवतार, दुमदुमे दाही दिशा ललकार
    जाहला विश्वंभर साकार, गोसावी सुत मोरयाला घडला साक्षात्कार
 
उत्तरे :
१. सिन्धु, नर्मदा, शरयू २. गोदावरी, कावेरी ३. गंगे ४. यमुने ५. यमुना ६. इंद्रायणी ७. भीमा ८. चंद्रभागे ९. कृष्णा, गोदा १०. मंदाकिनि ११. साबरमती
१२. कालिंदी १३. कऱ्हा
SCI  फन : पर्जन्यमापक
नंदिनी थत्ते -nandinithattey@gmail.com
पावसाळ्यात कधी पाऊस कमी पडतो, तर कधी जास्त. नेमका किती पाऊस पडला, ते मोजण्यासाठी बनवू या पर्जन्यमापक.
साहित्य : पारदर्शक बाटली, मार्कर पेन, मोजायची पट्टी.
कृती : आकृतीत दाखवल्याप्रमाणे पारदर्शक बाटलीचा वरचा अरुंद भाग कापून तिचा दंडगोल तयार करा. (काचेची बाटली फ्रेममेकरकडून कापून मिळेल.) मोजायची पट्टी घेऊन बाटलीच्या तळापासून मार्कर पेनने समान अंतरावर खुणा करा. एक-एक मिलीमीटर अंतरावर टिंबं द्या. तसेच पाच मिलीमीटर अंतरावर बारीक आणि दहा मिलीमीटर अंतरावर मोठय़ा खुणा करा. झाला आपला पर्जन्यमापक तयार!
पाऊस पडायला लागला की फक्त पावसाचेच पाणी थेट पर्जन्यमापकात पडेल अशा मोकळ्या जागी तो ठेवा. पाऊस थांबला की पाऊस किती पडला ते खुणांवरून मोजा. रोज पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवा. या नोंदींची वेधशाळेच्या नोंदींशी तुलना करा. रोज पडलेल्या पावसाच्या नोंदींवरून पावसाचा आलेख तयार करा. तुमच्या मित्रांनाही असे पर्जन्यमापक बनवायला सांगा. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांनुसार त्या त्या ठिकाणी किती पाऊस पडला, याचा नकाशा काढा.
जास्त पाऊस झाल्यास पर्जन्यमापक भरून वाहू शकतो. अशा वेळी पावसाची अचूक नोंद ठेवण्यासाठी काय करता येईल?
पर्जन्यमापकाशेजारी एक मोठय़ा व्यासाची दंडगोलाकृती बादली ठेवा. पर्जन्यमापकात गोळा झालेल्या पाण्याची उंची आणि बादलीतल्या पाण्याची उंची यात काही फरक आढळतो का?
वैज्ञानिक तत्त्व : सपाट प्रतलावर जमा झालेल्या पावसाच्या पाण्याच्या थराच्या उंचीवरून किती पाऊस पडला, ते मोजता येते.
घ्यायची काळजी : बाटलीच्या कापलेल्या कडांनी हात कापणार नाही, याची काळजी घ्या.
आर्ट कॉर्नर : शोभिवंत बूट
अर्चना जोशी muktakalanubhuti@gmail.com
साहित्य : दोन रंगांचा कागद, टिकल्या, बटणं, गम इ.
कृती : साधारण ८ सें.मी. ७ ८ सें.मी.चा दोनरंगांचा कागद घ्या. आकृतीत ११ नं.च्या दुमडींवर डोंगरासारखे ((mountain fold) त्रिकोण दुमडायचे व आकृती क्र. १२ मध्ये ते वरपासून खाली ओढून बाहेर आणले की उंच टाचेची रचना तयार होते. वरील बाजूच्या दोन समांतर दुमडी उघडून बुटाची आतील बाजू (होडीप्रमाणे) तयार होते. बुटाच्या टोकावर टिकल्या व बटनांनी सुशोभन करा.              
 एकदा एका बेटावरच्या काही मांजरांना, डुकरांना आणि पेंग्विन पक्ष्यांना स्वत:चे वजन करण्याची हुक्की आली. तिथे एकच वजनकाटा होता. हे सर्वजण वेगवेगळ्या संख्येने वजनकाटय़ांवर जाऊन बसू लागले. त्यांना दिसणारे वजन हे काटय़ावर चढलेल्यांचे वजन असल्यामुळे त्यांना स्वत:चे वजन किती आहे, ते काही समजेना. मग तुम्ही करणार ना त्यांना मदत त्यांचे वजन ओळखायला? शिवाय मांजर, डुक्कर आणि पेंग्विन यांची एकेक जोडी एकाच वेळी काटय़ावर चढल्यास त्यांचे वजन किती होईल हेसुद्धा तुम्ही सांगायचे आहे.
टीप : सर्व पेंग्विन पक्ष्यांचे वजन सारखे आहे. तसेच मांजरांचे आणि डुकरांचे वजन सारखेच आहे असे माना.
मनाली रानडे
manaliranade@84gmail.com

उत्तर :
आपल्याला प्राणी आणि पक्षी मिळून तीन बैजिक राशींच्या किमती काढायच्या आहेत. त्यासाठी तीन समीकरणे दिलेली आहेत. यावरून खालीलप्रमाणे उत्तरे मिळतील. तसेच तीन जोडय़ांचे एकूण वजन ४० येईल.
आर्ट गॅलरी :


गार्गी देशपांडे, ए. के. जोशी इंग्लिश मीडियम स्कूल, ठाणे.

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या