फारूक एस. काझी

चौथीचा वर्ग. बाई वर्गात आल्या तेव्हा मुलं खिडकीतून बाहेर पाहत होती. बाई आल्या तरी त्यांचं लक्ष नव्हतं. चोंबडी मयूरी ओरडली.  ‘‘अरे येडय़ांनो, या जागेवर. बाई आल्या.’’ हे ऐकताच पोरं गडबडली आणि पटापट आपापल्या जागी जाऊन बसली. एक-दोन तर दुसऱ्यांच्या जागेवर जाऊन बसली. तिथं पुन्हा भांडणं!

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

‘‘अरे गोंधळ कशासाठी?’’

‘‘अहो बाईऽऽऽ, बाहेर बघा कीऽऽऽ. आभाळ कसं भरभरून आलंय. काळं कुट्टं!’’

बाई हसल्या. जोयाची बोलायची स्टाईलच एकदम वेगळी होती. हसूच यायचं.

आभाळ भरून आलेलं आणि सगळीकडे दिवसाच अंधार पडलेला. पावसाला कधीही सुरुवात होईल असं वाटत होतं.

‘‘पाऊस येतोय आता. बघा कसा अंधार पडलाय.’’ गंभीर होत रोहित बोलला.

‘‘दिसला आम्हाला. आता तुझा उजेड पाड.’’ मयूरी पुन्हा ठिस्सकली.

पोरं मोठय़ाने हसली. बाई हसल्या. रोहित डोळे भोपळय़ाएवढे करून तिच्याकडे बघत होता. इतक्यात पावसाला सुरुवात झाली. खिडकी आणि दारातून पाणी आत येऊ लागलं.

मुलांनी पटापट खिडकी आणि दरवाजे लावून घेतले. वर्गातला अंधार अजून घट्ट झाला.

हेही वाचा >>>बालमैफल : ‘सूर’मयी दिवाळी

‘‘बाई, असा एक जादूचा दरवाजा असला पाहिजे होता. उजेड येईल, पण पाऊस आत येणार नाही.’’ धीरज त्याच्या स्टाईलने बोलू लागला. बाकी सगळे कान देऊन ऐकत होते. असला एक जादूचा दरवाजा असला पाहिजे होता- सगळय़ांचं एकमत झालं.

‘‘होय, होय.. चोर आल्यावर कुठून पळशील मग?’’ मयूरी पुन्हा ठिस्सकली. सगळी पोरं पुन्हा हसली.

‘‘का रे, असतात का असले जादूई दरवाजे? पाहिलेत का कुणी?’’ बाईनी विचारलं.

पोरं थोडं शांत झाली. कुजबुजली. फुसफुसली.

‘‘बाई असतो की- मित्र-मैत्रिणींचा!’’ शांत रेणुका म्हणाली.

‘‘काय, मित्रांचा?’’ बाईंना नवल वाटलं.

‘‘हो. आपण कधी रडतो, चिडतो, रुसतो. आपले मित्र आपल्याला हसवतात. लागलं तर काळजी घेतात. बाई, मित्र जादूचा दरवाजा असतात.’’

बाई विचारात पडल्या. पोरांनी माना डोलावल्या.

‘‘बाई, पुस्तकपण असतं की जादूचा दरवाजा.’’ बाईंनी कौतुकानं पाहिलं. तृप्ती सांगत होती. छोटीशी. हळूहळू बोलणारी. मधल्या सुट्टीत सगळी पुस्तकं धुंडाळून हवं ते पुस्तक शोधणारी. कोपरा गाठून वाचत बसणारी.

‘‘बाई, पुस्तक आपले मित्र असतात. त्यात काय काय जादू असते. वाचताना जादू कळते.’’ तृप्ती हळूच बोलली.

बाईंना आणखी एक नवीन दरवाजा सापडला.

अर्णव उठून उभा राहिला. थोडं हलून डुलून बोलू लागला.

हेही वाचा >>>बालमैफल : ‘हात’-भार

‘‘अभ्यास.’’

पोरं भयंकर मोठय़ाने हसू लागली.

‘‘अभ्यास जादू असती होय?’’ मयूरीला खूप मोठा प्रश्न पडला होता.

बाहेर असती तर तिने अर्णवच्या पाठीत जोराचा धपाटा घातला असता.

‘‘तो रे कसा?’’ बाईंना उत्सुकता वाटू लागली.

‘‘बघा, आपण अभ्यास करतो. मोठे होतो. सुखी होतो. आहे का नाही जादू?’’

पोरं अचंब्याने बघू लागली. बाई हसल्या.

‘‘खरंय अभ्यासपण जादूई दरवाजा आहे.’’ बाईंनी दुजोरा दिला.

‘‘बाई, आपले आईबाबापण जादूई दरवाजा असतात.’’ शांत रेवा बोलू लागली.

‘‘आईबाबा आपली काळजी घेतात. आपल्याला खूश ठेवतात.’’ बाईंना कौतुक वाटलं.

‘‘अजून एखादा दरवाजा सांगा बरं?’’ बाईंनी विचारलं.

‘‘बाई, आता तुम्ही सांगा की.’’ पोरं ओरडली.

बाईंनी थोडा विचार केला.

‘‘सांगा की बाई.’’ सगळय़ांनी आग्रह सुरू केला.

‘‘जादूचे दरवाजे आहेत माझे. खूप सारे.’’

‘‘किती?’’

‘‘खूप.. खूप. तुम्ही सगळेजण आहात ना, तेवढे!’’

‘‘म्हणजे?’’

‘‘तुम्ही सगळेजण आहात माझे जादूई दरवाजे. तुमच्यामुळे जादू घडते. सगळा अंधार दूर होतो. कधी कधी खूप ताप देता, पण तुमच्याशिवाय करमतही नाही.’’

बाई बोलता बोलता शांत झाल्या. पोरं पळतच आली आणि बाईंच्या पायाला मिठीच मारली. बाई सगळय़ांच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.

 बाहेर पाऊस पडून गेला होता.

मुलांनी दरवाजा आणि खिडक्या उघडल्या. वर्ग उजेडाच्या जादूने भरून गेला. बाईंच्या डोळय़ातल्या पाण्यातपण जादू चमकत होती. farukskazi82@gmail.com