नंदा संतोष हरम

आरुषी एक बारा वर्षांची चुणचुणीत मुलगी. समयसूचकता हा तिचा विशेष गुण. म्हणूनच तिला तिच्या आई-बाबांनी आजीकडे पंधरा  दिवसांकरता पाठवलं होतं. आरुषीची आजी वयाने फार नव्हती, पण ती आजारामुळे अंथरुणावरून उठू शकत नव्हती. आरुषीचे मामा-मामी तिची काळजी घ्यायचे. पण त्यांना अत्यंत तातडीचं काम निघाल्यामुळे बाहेरगावी जावं लागलं होतं. आजीला सांभाळायला दोन मावश्या होत्या.. १२- १२ तासांकरिता. रात्रीचे आरुषीचे आई किंवा बाबा, नाहीतर आरुषीची दुसरी मावशी यायची. दिवसाचाच थोडा प्रश्न असायचा. दिवसाही कोणीतरी थोडय़ा वेळाकरता येऊन जायचं. आजीची खोली तसंच घराचं मुख्य दार सीसीटीव्हीच्या निगराणीखाली होतं. त्यामुळे आरुषीचे आई-बाबा निर्धास्त असायचे.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

आरुषीच्या आजीला खरं तर सगळं कळायचं, फक्त अंथरुणातून ती उठू शकायची नाही, एवढंच! चार-पाच दिवस झाल्यावर आरुषीच्या लक्षात यायला लागलं की दिवसाच्या मावशी लबाडी करताहेत. आजीला शक्ती यावी म्हणून रोज अंडं द्यावं लागायचं. उकडून किंवा ऑम्लेट करून. मावशी केव्हा केव्हा म्हणायच्या, ‘अंडं खराब निघालं.’ साधारण एक दिवसाआड त्यांची ही तक्रार असायचीच. आरुषीने त्यांच्यावर पाळत ठेवली. तिला शंका होती की त्या ते अंड बाजूला ठेवायच्या आणि स्वत:च फस्त करायच्या. एकदा तिने विचारलं तर म्हणाल्या, ‘‘बाळा, अंडं खराब निघालं म्हणून फेकून दिलं.’’

आरुषी म्हणाली, ‘‘दाखवा मला. कचऱ्याच्या पिशवीत असेल ना ते..’’ तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. ‘‘अगं, आत्ताच कचरावाली कचरा घेऊन गेली..’’ असं म्हणून त्या निघून गेल्या.

मग आरुषी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवू लागली. तिसऱ्या दिवशी तिला संधी मिळाली. त्या गुपचूप अंडं बाजूला ठेवत होत्या, तेव्हा आरुषीने हळूच मोबाईलवर त्यांचा फोटो काढला. पण ती काहीच बोलली नाही. संध्याकाळी आरुषीची आई आली तेव्हा मावशी आईला म्हणाल्या, ‘‘घरातली अंडी संपली आहेत. तुम्ही आणाल की मी आणू?’’

आरुषी या संधीचीच वाट पाहत होती. ती म्हणाली, ‘‘अहो मावशी, आई दमून आली आहे. थांबा, मीच आणते.’’ आईने कौतुकाने आरुषीकडे पाहिले. तिला पैसे आणि पिशवी दिली. ‘‘पाणी पिऊन आले..’’ म्हणत आरुषी आत गेली. तिने गुपचूप एक ग्लास आणि पाण्याची बाटली घेतली. जवळच दुकान होतं.

‘‘अंकल, सहा अंडी द्या.’’

दुकानदार अंडी देईपर्यंत आरुषीने ग्लास बाहेर काढला आणि त्यात पाणी भरलं. दुकानदार म्हणाला, ‘‘बेटा, काय करत्येस?’’

‘‘अंकल, अंडी ताजी आहेत की नाही, ते बघत्येय.’’

दुकानदार म्हणाला, ‘‘बेटा, इकडे नको. आत ये आणि काय ते कर. पण तुझ्या लक्षात येतंय का, आम्ही एवढय़ा शेकडो अंडय़ांची अशी परीक्षा घेऊ शकत नाही?’’

आरुषी म्हणाली, ‘‘सॉरी अंकल! फक्त आज एकदाच. नेहमी नाही करणार. आमच्या मावशींना धडा शिकवायचा आहे.’’ आरुषी  अंडी घेऊन घरी आली.

नंतरचा दिवस बरा गेला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मावशी परत नाटक करू लागल्या. आरुषी म्हणाली, ‘‘थांबा, आज संध्याकाळी मी आईला सगळं सांगणार आहे. मी अंडी तपासून आणली आहेत. एकही खराब नाही.’’

मावशी आरुषीच्या तोंडाकडे बघतच राहिल्या. त्या गयावया करायला लागल्या.

‘‘बाळा, मी आता असं नाही वागणार. आईला काही सांगू नकोस.’’

आरुषी तिथून निघून गेली.

संध्याकाळी आरुषीने घडला प्रकार आईला सांगितला. आरुषीला आई म्हणाली, ‘‘पण तू त्या दुकानदाराकडे अंडय़ांची कोणती परीक्षा घेतलीस? कशावरून ठरवलंस की तू आणलेली सगळी अंडी ताजी आहेत!’’

आरुषी म्हणाली, ‘‘आई, अगदी सोप्पं आहे. अंडं खराब झालं की आत वायू तयार होतो. त्यामुळे ते पाण्यात टाकलं की तरंगायला लागतं. चांगलं अंडं कधी तरंगत नाही. तळाला जाऊन बसतं.’’

आई म्हणाली, ‘‘छान, आरुषी! मला कारण माहीत होतं. पण तुला ते नीट कळलं आहे की नाही, ते बघायचं होतं. बरं.. आता सांग, मावशींना काय सांगू?’’

आरुषी म्हणाली, ‘‘आई, मावशींना सांग, तुम्हाला काही हवं असेल तर मागा. असं चोरून घेऊ नका. बरोबर ना?’’

‘‘वा.. आरुषी! अगदी योग्य बोललीस. मी हेच सांगणार आहे त्यांना!’’ – इति आई.

nandaharam2012@gmail.com