रॉकेटचा शोध

पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण तोडून रॉकेटच्या साहाय्याने अवकाशात जाण्याची कल्पना मांडली ती ज्यूल्स व्हर्न या लेखकाने!

पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण तोडून रॉकेटच्या साहाय्याने अवकाशात जाण्याची कल्पना मांडली ती ज्यूल्स व्हर्न या लेखकाने! ‘फ्रॉम द अर्थ टू द मून’ या पुस्तकात व्हर्न यांनी अवकाशात जाण्यासाठी रॉकेटचा उपयोग करण्याची कल्पना मांडली. कॅप्टन वॉल्टर डॉनबर्गर आणि बर्नर वॉन ब्राऊन या दोन जर्मन संशोधकांनी द्रव इंधनावर चालणाऱ्या रॉकेटचा शोध लावला. अतिशय गुप्तता राखून या दोघांनी ते रॉकेट तयार केलं. ते रॉकेट अर्थात युद्धात वापरण्यासाठी म्हणून त्यांनी तयार केलं होतं. युद्धात वापरल्या जाणाऱ्या रॉकेटला क्षेपणास्त्र असं म्हणतात. दुसऱ्या महायुद्धात सन १९४४ मध्ये एका मोठय़ा आकाराचं व्ही-२ हे क्षेपणास्त्र म्हणजे रॉकेट ब्रिटनवर सोडण्यात आलं होतं. त्याच्यात एक टन स्फोटके भरलेली होती आणि त्याचा वेग होता ताशी ५,८०० कि.मी. याच काळात रशियन शास्त्रज्ञही द्रव इंधनावर चालणारं रॉकेट बनविण्याच्या तयारीत होते. अखेर रशियन शास्त्रज्ञांना रॉकेट बनविण्यात यश मिळालं. रॉकेटच्या साहाय्याने मग रशियाने १९५७ साली स्फुटनिक-१ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला. अशा प्रकारे अवकाशात उपग्रह सोडण्यासाठी रॉकेटचा उपयोग होऊ लागला. रॉकेटचा शोध लावणाऱ्या त्या दोन जर्मन शास्त्रज्ञांपकी वर्नर वॉन ब्राऊन हे शास्त्रज्ञ नंतर अमेरिकेत गेले. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत ते काम करू लागले. अमेरिकेच्या चांद्रमोहिमांसाठी लागणारी रॉकेटस् त्यांनी तयार केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Invention of rocket

ताज्या बातम्या