आर्ट कॉर्नर : कंदील

साहित्य : ८-१० आईस्क्रिमच्या काडय़ा, २ सेलोटेपच्या रिकाम्या रिंग्ज, लेस, टिकल्या, अ‍ॅक्रिलिक रंग, गम, ब्रश, जिलेटिन कागद, सॅटिनची रिबीन, कात्री, सेलोटेप इ.

साहित्य : ८-१० आईस्क्रिमच्या काडय़ा, २ सेलोटेपच्या रिकाम्या रिंग्ज, लेस, टिकल्या, अ‍ॅक्रिलिक रंग, गम, ब्रश, जिलेटिन कागद, सॅटिनची रिबीन, कात्री, सेलोटेप इ.
कृती : एका सेलोटेपच्या रिंगच्या आतील बाजूस सर्व आईस्क्रिमच्या काडय़ा अंतर ठेवून चिकटवा. मग उजव्या बाजूस दुसरी रिंग लावून घ्या. गम किंवा सेलोटेपचा वापर करता येईल. साधारण ५ ते २० मिनिटं वाळू द्या. मगच उचलून अ‍ॅक्रिलिक रंगाने काडय़ांना रंग द्या. टिकल्यांनी सुशोभ्न करा व वर-खाली लावलेल्या टेपच्या रिंगला लेस (उलट-सुलट बाजून) चिकटवा. आता एकदम हलक्या हाताने कंदिलाच्या आतील बाजूस गमचे छोटे-छोटे ठिपके द्या व जिलेटिन कागद एकदम सावकाशपणे आत चिकटवा. आता सॅटिनच्या पट्टीचे हूक बनवून छोटय़ा दिव्याच्या आधारे खिडकीत लावा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kandil making

ताज्या बातम्या