दिवाळीची सुट्टी संपून शाळा सुरू झाली. किशोर, रोहन तब्बल वीस दिवसांनी भेटले. पण किशोरला सुट्टीच्या आधीचा रोहन आणि सुट्टी संपून परतलेला रोहन यामध्ये खूप फरक जाणवत होता. अगदी जमीन-अस्मानाचा नाही, पण पटकन् नजरेत भरण्यासारखा फरक नक्की होता. तो कोणता हे किशोरला पहिल्यांदा समजलंच नाही. पण रोहनचं रोज व्यवस्थित निरीक्षण केल्यावर त्याच्या लक्षात आलं की रोहनमध्ये एकचएक विशिष्ट असा फरक पडला नाहीये, तर त्याच्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत. या सगळ्या बदलांमुळे त्याच्या आसपास वावरणाऱ्या माणसांमध्येही एक वेगळीच सकारात्मकता येते आणि ती सुखी होतात, आनंदी होतात तसंच रोहनकडे आकर्षित होतात असं किशोरच्या लक्षात आलं. हे लक्षात आल्यावर त्याने रोहनशी बोलायचं ठरवलं.

एकदा त्याला हसत हसत विचारलं, ‘‘या सुट्टीत कोणती जादू झाली की तू एखादा चुंबक बसवून घेतलास शरीरात- ज्यामुळे सगळे तुझ्याकडे आकर्षित होतात? तुझ्या संगतीत खूश आणि आनंदीत होतात?’’ यावर जोरजोरात हसत आणि टाळी वाजवत रोहन म्हणाला, ‘‘अरे, तुझ्या हे लक्षात आलं म्हणजे आजीचा मंत्र फळाला आला. आजीने मला सांगितलं, ‘‘रोहन, दिवाळीत दिव्यांची अनेकरंगी माळ असते. त्यातील प्रत्येक दिवा पेटत असतो, आकर्षित करून घेत असतो त्याचप्रमाणे आपलं शरीर, बोलणं, वागणं, चालणं, खाणं-पिणं, बसणं-उठणं या सगळ्यांमध्ये एक चमक पाहिजे. ती चमक आपण मिळवली की आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रकाश आपल्या आसपासच्या व्यक्तींवर, परिसरावर पडतो आणि तो प्रकाश सर्वांना सुख आणि आनंद देतो. हे पटून त्यावर किशोर लगेचच म्हणाला, ‘‘चल, तुझ्यासारखीच मीही आजपासून माझी दिव्यांची माळ प्रज्वलित करायला घेतोच.’’

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

joshimeghana.23@gmail.com

अक्षर जत्रा

अक्षर जत्रा पुढ्यात माझ्या भरली आई गं

क का कि की ख खा खि खी अ आ इ ई गं

अक्षर सारे एकच गमती भेद कळेना काही

तयास पाहून मनात माझ्या जागे नवलाई

घोकंमपट्टी येता जाता गिरवून मी पाहतो

क ख ग घ सहज येते ‘क्ष’ वर अडखळतो

घरात आई शाळेत बाई नेहमीच मदतीला

हुशार काही जिवलग मित्र माझ्या दिमतीला

साह्य तयांचे घेऊन शिकतो अक्षर जत्रा ही

गुण गुण गुण मनात माझ्या चाले मात्रा ही

आई म्हणती अवघड नसते आई ओढते री

अक्षर जत्रा आयुष्याची पुढली शिदोरी

भानुदास धोत्रे

जंगलातली थंडी

जंगलात भरली एकदा थंडी

माकडांनं शिवली पानांची बंडी

कोकीळ रावांचा बसला घसा

म्हणतो, ‘सूर लावू मी कसा?’

इवलासा ससुल्या हलेचना

बिळाच्या बाहेर निघेचना

जिराफदादाची आखडली मान

खाता येईना झाडाचे पान

डोकेदुखीने हैराण उंट

म्हणे, ‘द्या हो जरासा सुंठ’

थंडीने गारठले हत्तीभाऊ

नदीवर स्नानाला म्हणे कसा जाऊ

राजे म्हणाले पेटवा शेकोटी

आणलीय बघा मी आगपेटी

उबदार शेकोटी झटक्यात पेटली

साऱ्या प्राण्यांना डुलकी लागली.

– पद्माकर भावे

Story img Loader