श्रीनिवास बाळकृष्ण shriba29@gmail.com

रंगपंचमी ‘पंचमी’ला न होता द्वितीयेलाच केली तरी हा पोटलीबाबा घराला बाहेरून कडीकुलूप लावून आत लपून राहतो. पण २० वर्षांपूर्वी लहान असताना मी रंगपंचमी खेळलो तेव्हा वेगवेगळे रंग लावले तरी शेवटी चेहरा एकाच रंगाचा व्हायचा. मग सोडून दिला नाद! आता घरात बसून केवळ कागदावर खूप सारे रंग फासतो. पण इथेही बऱ्याचदा कागद एकाच रंगाचा होतो. रंगांनी माझ्याशी पंगाच घेतलाय. कुणीतरी सांगितलं म्हणून मग मी एरिक कार्लेला फोन लावला. त्याला रंगांतलं बरोब्बर कळतं म्हणे! त्याने मला फोनवरच रंग फासण्याच्या चार युक्त्या सांगितल्या, ज्या मी तुला अजिबात सांगणार नाही; पण एरिक कार्लेबद्दल सांगणार आहे. हा अमेरिकन ‘चित्रपुस्तक’कार प्राणी-पक्ष्यांच्या गोष्टी शब्दांनी नाही तर रंगांनी सांगतो.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!

तो रंग नुसता लावत नाही, तर रंग नाचतो, फेकतो, खाजवतो, फासतो, ओरबाडतो, दाबतो, आपटतो.. असं सर्व काही करतो. नक्कीच घरभर राडा करत असणार. आता त्याला हे करताना कुणी थेट बघायला जात नाही, की तो इन्स्टा रीळही बनवत नाही. तर त्याच्या गोष्टींची पुस्तकं पाहून त्याने केलेल्या रंगांची उधळण आपल्याला अनुभवता येते.

एरिकच्या कथा या अत्यंत साध्या-सोप्या, सरळ, कमी शब्दांच्या असतात. या पुस्तकांत अनेक प्राणी, पक्षी, किडे, मासे असतात. कुठलाही जीव पेन्सिलने काढलेला नसतो. एकाच ब्रश, रंगाने रंगवलेला नसतो. एरिक चित्र काढण्यासाठी कात्रीच वापरतो. जसं की- चित्रातला हा कोंबडा पाहा. खऱ्या कोंबडय़ाला कुठले रंग असतात? त्या त्या रंगांच्या टय़ूब्स, बाटल्या बाहेर काढतो. मग एकेका कागदावर त्या रंगांच्या सर्व शेड्स जाडसर फासतो.. लावतो. प्राण्याची त्वचा असेल त्यानुसार कंगवा, सुई, काथ्या, नखं, काडी अशा कुठल्याही वस्तूंच्या साहाय्याने पोत (टेक्श्चर) तयार करतो. कागद वाळवतो. मग असे अनेक कागद हव्या त्या आकारांत कापून, एकमेकांवर चिकटवून त्याच्या कल्पनेतला प्राणी तयार होतो. हे कोलाजसारखंच.. पण कोलाज नव्हे!

एरिकला प्राणी, पक्षी, किडे इतक्या रंगांत का दिसत असतील? सरळ रेषेने चित्र काढायचं सोडून तो वेगवेगळ्या अवयवांचे आकार का कापत असेल? तू प्राण्यांना निरखून पाहतोस ना? उदाहरणार्थ, ज्याला आपण काळा कावळा म्हणतो त्या साध्या काळ्या रंगासोबत आणखी कुठले रंग कावळ्यात असतात? कावळ्यावर पिवळं ऊन पडलं तर तो रंग कुठला असेल? पाण्याने भिजल्या भागातला रंग कोणता असेल? हिरव्या फांदीवरल्या पानांची हिरवी सावली पंखावर कशी दिसेल? असं बरंच काही एरिकच्या मनात रंगत असेल. अशा पद्धतीनं थोडे प्राणी तूही बघ.

आता उदाहरण म्हणून हे छोटं चित्रपुस्तक पाहा. एक स्पायडर (मॅन नाही, वुमन!) आपली गपगुमान जाळं विणत असते. इतर रिकामटेकडे प्राणी-पक्षी ‘काय करतेस? फिरायला येतेस का?’ म्हणून विचारत असतात. पण ही कोळी आपली गप्पच. कामात व्यग्र! शेवटाला जाळं विणून त्यात किडा पकडते, खाते आणि झोपते. ‘नेहमी कष्ट करावेत, उगाच टाइमपास करू नये’ असा भंकस मेसेजबिसेज नाही बरं का यात! ही कोळी कदाचित बहिरीही असू शकेल. आपण फक्त पाहण्यातला आनंद घ्यायचा- म्हणून हे पुस्तक. अशी खूप पुस्तकं. खूप पारितोषिकं. खूप सारं करून, खूप खूप देऊन एरिक मागच्या वर्षीच गेला. पण त्याच्या वेबसाइटवर अजूनही खूप सारं पाहण्यासारखं आहे.

या पुस्तकात लेखक, चित्रकार, संपादक, डिझायनरसोबत आणखी एका नव्या नावाची भर पडली, ती म्हणजे पिंट्रर!

तू या पानांना स्पर्श केलास की कळेल- कोळी आणि तिचं धाग्याचं जाळं हे दोनच (ब्रेल लिपीसारखे एम्बॉस केलेले) हाताला जाणवतात. बाकी प्राणी नॉर्मल पिंट्रमध्ये आहेत. म्हणजे डोळे बंद करूनदेखील हाताला समजतं, की जाळं विणून कुठवर झालंय, कागदावर कोळी कुठं आहे ते. स्पर्शानं बघण्याच्या या खास छपाईसाठी ‘पिंट्रर’ने  जाडजूड पुठ्ठा वापरला आहे. त्यावर छपाईचं काम कसं काय केलं असेल बरं? मला माहीत नाही. गूगलनं नक्की कळव. कालच्या रंगांत तुझे कपडे रंगीत झाले असतील ना? ते फेकू नकोस. एरिकने कागद वापरले तसे कपडय़ाचे तुकडे वापरून कुठला प्राणी बनवशील?