मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा

नवीन वर्षांचं स्वागत झालं आणि सगळय़ांना वेध लागले मकर संक्रांतीचे. पियु आणि उमा आता आपल्याला छान छान तिळगूळ खायला मिळतील म्हणून खूश होत्या. उमाच्या लहान भावाचं- पिंटय़ाचं बोरन्हाणपण करायचं असं आईबाबा बोलताना तिनं ऐकलं होतं. त्यामुळे या संक्रांतीला खूप मजा येणार होती. त्याच्यासाठी सर्व दागिने बनवायला घेतले होते आईनं.

Shadashtak Yog 2024 and Impact on Rashi in Marathi
Shadashtak Yog: १८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
sudha murty net worth rs 775 crore but hasnt bought new saree in 30 years read behind story
…म्हणून सुधा मूर्तींनी ३० वर्षांत एकही साडी घेतली नाही विकत; कारण एकदा वाचाच

‘‘आई बोरन्हाण कशासाठी करतात गं?’’ उमाला प्रश्न पडला होता.
‘‘अगं तुम्ही लहान मुलं जी फळं, काही गोष्टी खायला पाहिजेत ती खात नाहीत ना! म्हणून हे सर्व करावे लागते.’’ आई हसत हसत म्हणाली.
‘‘ म्हणजे काय काकू?’’ पियुलाही समजलं नाही.
‘‘ अगं या वेळेस सूर्य मकरवृत्तात प्रवेश करतो. मग आपल्याकडे थंडी पडते. या काळात तिळगूळ बनवतात. दोन्ही पदार्थ उष्ण असतात. आपल्या शरीराला लागते ती उष्णता त्यापासून आपल्याला मिळते. आपलं थंडीपासून रक्षण होतं.’’ आई सगळं सविस्तर सांगत होती.
‘‘पण मग बोरन्हाण कशासाठी?’’ उमाला उत्तर मिळालं नव्हतं.
‘‘ सांगत, सांगते.. या सीझनमध्ये बोराची फळे येतात, त्यामध्ये बरीच पोषक तत्त्वे असतात. मग ऊस असतो. उसाच्या रसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे सगळं असंच दिलं तर तुम्ही मुलं खात नाहीत. म्हणून गमतीजमती करून बोरन्हाण करतात.’’ आई म्हणाली.
‘‘मग हे दागिने?’’ पियुनं विचारलं.
‘‘हो, अगं लहान मुलांना या दागिन्यांनी सजवतात. तुम्हाला माहीत आहे ना बाळकृष्ण कसा खोडकर होता. त्याच्याच सारखे हलव्याचे दागिने घालून मुलांना सजवतात. खूप गोड दिसतात ती. मुकुट, कमरपट्टा, बाजुबंद आणि बासरी असा सगळा साज असतो.’’ आई सगळं समजावून सांगत होती.
‘‘त्यानंतर डोक्यावरून बोरं टाकायची. असंच ना?’’ उमा म्हणाली.
‘‘फक्त बोरंच नाही तर उसाचे तुकडे, तिळाच्या रेवडय़ा, शेंगदाणे असे सगळे पौष्टिक पदार्थ बाळाच्या डोक्यावरून हळुवारपणे ओततात. मग बाकीची वानरसेना ते उचलतात आणि खातात. आहे की नाही मज्जा!’’ आई म्हणाली. आई बोलत असतानाच पियुचा दादा आणि त्याचे सगळे मित्र तिथे पोहोचले.
‘‘काय चाललंय दोन्ही मैत्रिणींचं.’’ दादानं विचारलं.
‘‘आम्ही आमच्या पिंटूच्या बोरन्हाणात खूप मज्जा करणार आहोत.’’ उमानं सांगितलं.
‘‘ करा.. करा.. आम्ही मात्र खूप पतंग उडवणार ऽऽऽ.’’ दादा चिडवत म्हणाला.
‘‘अरे व्वा! आणले का पतंग तुम्ही?’’ आईनं विचारलं.
‘‘नाही काकू, अजून नाही आणले.’’ दादा उत्तरला.
‘‘हे बघा मुलांनो, पतंग जरूर उडवा. त्यामुळे तुम्हाला आनंदही होईल आणि तुमचा व्यायामही होईल. पण मोठी माणसं बरोबर असल्याशिवाय गच्चीत जायचं नाही.’’ काकूंनी सांगितलं.
‘‘हो काकू.’’ लगेच मुलांनी होकार भरला.‘‘आणखी एक, पतंगामुळे, त्याच्या मांजामुळे अनेक पक्ष्यांना त्रास होतो. तेव्हा मांजा साधाच वापरायचा. कळलं का?’’
‘‘हो काकू, दुसऱ्यांच्या मांजानं जखमी झालेल्या पक्ष्यांनासुद्धा आम्ही मदत करतो.’’ बच्चेकंपनी म्हणाली.
‘‘मग काय होऊन जाऊ दे मकर संक्रांत. लागा तयारीला..’’ काकूंनी सांगितलं.
‘‘ हुर्रे..’’ सगळय़ा मुलांनी एकच गिल्ला केला.

पतंग गेला आकाशी
पतंग गेला आकाशी
हो पतंग गेला आकाशी
मला म्हणाला,
येतो भटकून
जात नाही मी
तुजला सोडून
दोर राहू दे हाताशी
पतंग गेला आकाशी
देव भेटे जर
तुला नभातील
सांग रे त्याला
माझ्या मनातील
खाऊ दे रोज उशाशी
पतंग गेला आकाशी
यावे मलाही
असेच उडता
गंमत वरूनी
येईल बघता
इच्छा माझी ही जराशी
पतंग गेला आकाशी

नरेश महाजन

माझे आजोबा..
आजोबा माझे भलतेच भारी
चहात बुडवून खातात पुरी
आजोबांच्या तोंडात नाहीत दात
तरीपण काहीतरी बसतात खात
भल्या पहाटे आजोबा उठतात
दहा पंधरा उठबश्या काढतात
अंघोळ करून मंदिरी जातात
येताना चपला विसरून येतात
आजोबाना ऐकायला येते कमी
तरी ऐकायला येण्याची देतात हमी
जेव्हा मी सांगतो, ‘बोलावते आजी’
म्हणतात, ‘सकाळीच आणलीय भाजी’

पद्माकर भावे

matildadsilva50 @yahoo.co.in