इथे एकूण १३ षटकोन दिले आहेत. त्यात १ ते १३ अंक अशा रीतीने भरा, की एका सरळ रेषेतील पाच षटकोनांतील अंकांची बेरीज ३५ येईल. rekhakane@gmail.com माय कॉर्नर.. बालमित्रांनो, शाळा सुरू झालीय. तुमचं दिवसभराचं वेळापत्रक अगदी पॅक झालंय हे खरंय; पण त्यातूनही वेळ काढून तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींना प्राधान्य द्या. रोज नाही तरी दोन-तीन दिवसांनी एकदा काहीतरी लिहा. तुमचे अनुभव, गमती जमती लिहून काढा. आणि त्यातले काही निवडक आमच्याकडे पाठवा. ‘बालमैफल’च्या ‘माय कॉर्नर’ या खास तुमच्यासाठीच्या सदरात आम्ही ते प्रसिद्ध करू. तुमचं लिखाण balmaifal.lok@gmail.com या ई-मेलवर पाठवा.