बालमित्रांनो, ‘जसे पेरावे तसे उगवते’ किंवा ‘बीज तसा अंकुर’ या म्हणी तुम्हाला माहीत असतीलच. अर्थात, आज आपण म्हणींचा खेळ खेळणार नाही. आपल्या कोडय़ाचा विषय मात्र त्यात दडलेला आहे. बरोबर ओळखलेत! खाली तुम्हाला काही बियांची चित्रे दिलेली आहेत. त्या बिया कशाच्या आहेत ते ओळखून, योग्य त्या चित्रासमोर तुम्ही लिहायचे आहे. पालक आणि शिक्षक यांच्या साहाय्याने बियांची माहिती जरूर गोळा करा. झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेऊन तो तडीस न्या.