रविवार असल्याने अक्षयला शाळेला सुट्टी होती. गृहपाठ पूर्ण झालेला असल्याने तो आता टंगळमंगळ करायला मोकळा होता. आईच्या कामाचे वेळापत्रक मात्र बिघडले होते. आणखीन दोन हात असते तर बरे झाले असते, असे आईला वाटत होते. अभ्यासाची भुणभुण नसल्याने अक्षय मन लावून चित्र रंगवत बसला होता. तेवढय़ात फोन वाजला. कामात असल्याने आईने अक्षयला ड्रॉवरमधून फोन देण्यास सांगितले. फोन काढताना त्याला तेथे नाण्यांचा डबा दिसला. त्याने त्यातून एक रुपयाचे नाणे घेऊन ते कंपास बॉक्समध्ये ठेवले. दुसऱ्या दिवशी त्याने त्याचे चॉकलेट घेऊन खाल्ले. घरी आल्यावर त्याने आई-बाबांना सांगितले नाही. कोणीही त्याला त्याबद्दल विचारले नाही. कोणाला काही कळलेले नाही असे वाटून त्याने अजून एक नाणे घेतले. सुट्टय़ा नाण्यांचा डबा घरातील सर्वच जण वापरत असल्याने कोणालाही शंका आलेली नव्हती. अक्षयची धिटाई वाढू लागली.

गणिताचा तास चालू होता. आकृती काढताना चतन्यच्या लक्षात आले की आपली आकृती चुकलीय. नेमका आज तो खोडरबर आणायचा विसरला होता. चतन्य, अक्षय जिवलग मित्र असल्याने चतन्यने न विचारता त्याच्या कंपासमधील खोडरबर घेतले. नंतर नादात स्वत:च्या कंपासमध्ये ठेवून दिले. अक्षयने ते पाहिले. अक्षयचे आज काहीतरी बिनसलेले असल्याने त्याने चतन्यबरोबर भांडण सुरू केले.

Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या

‘‘माझे रबर मला न विचारता का घेतलेस? घेतलेस तर घेतलेस शिवाय स्वत:च्या कंपासमध्ये ठेवून दिलेस.’’ अक्षय म्हणाला.

‘‘अरे रागावू नकोस. आज मी रबर घरी विसरलो. आकृती दुरुस्त करण्याच्या नादात मी तुझे रबर चुकून माझ्या कंपासमध्ये ठेवले.’’ चतन्य म्हणाला.

अक्षय काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हता. ‘‘तू खोटं बोलतो आहेस, तुला माझे रबर चोरायचेच होते. मी तुझे नाव बाईंना सांगतो.’’ अक्षय असे म्हणतच तरातरा उठून बाईंकडे गेला व चतन्यची तक्रार केली.

बाईंनी मधल्या सुट्टीत दोघांनाही बोलावून घेतले. ‘‘काय रे! एवढय़ा-तेवढय़ावरून भांडता. तुमची तर इतकी छान मत्री आहे. मी तर सर्वाजवळ तुमचे नेहमी कौतुक करत असते. चतन्य, अक्षय काय म्हणतोय की तू त्याचे रबर चोरलंस. खरं आहे का ते? काय ते नीट सांग बघू.’’ बाई म्हणाल्या.

‘‘आई, मी खरंच मुद्दामहून नाही ठेवले ते.’’ चतन्य म्हणाला. प्रिय मित्राने चोर ठरवल्याने तो रडवेला झाला होता.

बाईंनी दोघांची बाजू ऐकून घेतली. ‘‘चैतन्य, दुसऱ्याच्या वस्तूला हात लावताना त्याची परवानगी घ्यायची असते हे यापुढे तू लक्षात ठेव. दर वेळेला बाजू समजून घेणारे कोणी असेलच असे नाही. आत्ता गरसमजामुळे तुला शिक्षेलाही सामोरे जावे लागले असते.’’ बाईंनी चतन्यला प्रेमाने समजावले.

‘‘अक्षय, त्याने चुकून कंपासमध्ये ठेवले असं तो सांगतोय ना? त्याबद्दल त्याने तुझी माफीही मागितली खरे ना! मग विश्वास ठेव त्याच्यावर. याला चोरी म्हणत नाहीत.’’ बाईंनी अक्षयचीही समजूत काढली.

शाळेतून घरी येताना त्याने चॉकलेट विकत घेतले. चॉकलेट खात असताना त्याला बाईंचे बोलणे आठवले आणि त्याला एकदम भीती वाटू लागली. ‘‘गेले काही दिवस मी रोज आई-बाबांच्या नकळत म्हणजेच त्यांची परवानगी न घेता नाणे उचलून चॉकलेट विकत घेत आहे. आई-बाबा आपले इतके लाड करतात. त्यांचे आपल्यावर किती प्रेम आहे. मी त्यांना विश्वासात घेऊन सांगितले नाही म्हणजे ही चोरीच झाली की! बाप रे! हे मी काय करत होतो.’’ अक्षय स्वत:शीच विचार करत होता.

लहानपणी छोटय़ा चोऱ्या करणारा मुलगा त्याला वेळच्या वेळी शिक्षा न झाल्याने

मोठा दरोडेखोर कसा बनला आणि तुरुंगात गेला, ही आजीने सांगितलेली गोष्ट त्याला आठवू लागली. त्याला खूप रडू येऊ लागले.

घरी येताच त्याने आईला घट्ट मिठी मारली. आता मोठी शिक्षा भोगावी लागणार या कल्पनेने त्याच्या छातीत धडधडू लागले. त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. आईने

प्रेमाने जवळ घेताच तो हमसून हमसून रडू लागला.

‘‘अक्षु बाळा, अरे काय झालंय? काही दुखतंय का? शाळेत काही झालं का? तू सांगितल्याशिवाय मला कसं कळेल?’’ आई विचारत राहिली.

अक्षयने शाळेत काय घडले ते सांगितले. ‘‘आई, मी चतन्यला चोर म्हटले. पण मी सुद्धा चोरच आहे का गं?’’ अक्षयने विचारले.

‘‘आता, हे काय नवीन?’’ आईने आश्चर्याने विचारले. मग अक्षयने गेले काही दिवस डब्यातून नाणे घेऊन चॉकलेट कसे खाल्ले ते सांगितले. ‘‘आई, माझे चुकले. मी असे करायला नको होते.’’ अक्षय म्हणाला. आईच्या डोळ्यात पाणी आले. तिने अक्षयला जवळ घेतले.

‘‘तुझ्या बाईंचे आभारच मानायला हवे. त्यांच्यामुळे तुला तुझी चूक कळली ना? यापुढे असे घडणार नाही याची काळजी घे. मी तुझ्यावर विश्वास ठेवते आहे आणि

तो तू सार्थ ठरवशील याची मला खात्री आहे.’’

सारखे सारखे चॉकलेट खाल्ले की दात खराब होतात असे म्हणणाऱ्या आईने अक्षयला चूक कबूल केल्याबद्दल स्वत:हून दोन नाणी काढून दिली. उद्या शाळेत

गेल्यावर चतन्यला सॉरी म्हण आणि दोघे मिळून चॉकलेट खा. अक्षयने आनंदाने टुणकन् उडी मारली आणि खेळायला धूम ठोकली.