डॉ. प्रदीप आवटे

आई आणि बबलू बागेत आले होते. बाग छोटी, पण सुंदर होती. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ आणि खूप झाडे होती बागेत. छोटी झाडे, मोठी झाडे. सरळ झाडे, वाकडी झाडे. हिरवळीवर काही जण बसले होते आणि जोरजोरात श्वास घेत होते, सोडत होते. कुणी हातपाय वेडेवाकडे हलवत होते, कुणी पोटावर, तर कुणी पाठीवर झोपून हालचाली करत होते.

Viral video when Father saw daughter in bridal look his emotional reaction capture in video goes viral on social media
वडिलांचे प्रेम! लाडक्या लेकीला नवरीच्या रुपात पाहून भावूक झाले वडील, मुलीवर केला कौतुकाचा वर्षाव; नेटकरी म्हणाले, “एवढं कौतुक फक्त वडिलच…”
kolhapur ambabai temple marathi news, ambabai temple devotees kolhapur marathi news,
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरासमोर खरमाती, मलब्याचे ढीग; भाविकांची कसरत
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
The dog acted like a dead and saved from kidnapper
VIDEO : चक्क मरणाचे नाटक करून कुत्र्याने वाचवला चिमुकलीचा जीव, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल

आई म्हणाली, ‘‘ बबलू, हे लोक व्यायाम करत आहेत. ते बघ ते योगासने करत आहेत. यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपण आजारी पडत नाही.’’
‘आपणही व्यायाम केला पाहिजे..’ बबलू मनातल्या मनात म्हणाला. कारण त्याला दवाखान्याची खूप भीती वाटायची.
दोन मुली बागेत चेंडूने खेळत होत्या. आणि काही माणसे तर नुसतीच मोठमोठय़ाने हसत होती.
बबलूला एकूण मजाच वाटली. त्याला खूप हसू आले. तेवढय़ात त्याचे लक्ष फुलांकडे गेले. बागेमध्ये खूप फुले उमलली होती. लाल, पिवळी, पांढरी, गुलाबी.. त्या फुलांवर फुलपाखरे खेळत होती.

बबलू म्हणाला, ‘‘आई, बघ किती फुलपाखरे!’’
आई म्हणाली, ‘‘बबलू, तीसुद्धा तुझ्यासारखीच बागेत खेळायला आली आहेत.’’
बबलू फुलपाखरांमागे धावू लागला. त्यांना हातात पकडण्याचा प्रयत्न करू लागला.
‘‘ बबलू, नको, नको..’’ आई म्हणाली. पण तरीही बबलू फुलपाखरांमागे धावतच होता.
तेवढय़ात एक फुलपाखरू बबलूच्या हातात आले, पण ते निसटले. बबलूच्या हाताला फुलपाखराचे रंग लागले. फुलपाखरू थोडा वेळ गवतात पडले आणि कसेबसे धडपडत उठले आणि उडू लागले.

‘‘ बबलू, फुलपाखरांना असे धरू नये. त्यांच्या पंखांना इजा होते.’’ आई म्हणाली.
बबलूला वाईट वाटले.
‘‘अरे, उडणाऱ्या, खेळणाऱ्या, पळणाऱ्या प्रत्येकाला हवे तसे उडू द्यावे, खेळू द्यावे, पळू द्यावे. तू खेळताना तुला कुणी पकडून धरले तर आवडेल का तुला?’’ – आई म्हणाली.
बबलूने ‘नाही’ म्हणून जोरात मान हलवली आणि तो फुलपाखरांना त्रास न देता त्यांचा खेळ पाहू लागला.
आणि थोडय़ा वेळाने गंमतच झाली.

एक इवलेसे फुलपाखरू अलगद बबलूच्या हातावर येऊन बसले. त्याचे पंख पांढुरके होते आणि त्यावर किती मस्त रंगीत रंगीत ठिपके होते.
बबलू हळूच आईला म्हणाला, ‘‘आई.. बघ ना!’’
आई बबलूच्या कानात म्हणाली, ‘‘तू फुलपाखरांना त्रास देत नाहीस, त्यांना हवे तसे खेळू देतोस, म्हणून ते फुलपाखरू तुझे मित्र झाले आहे.’’
बबलूला एकदम भारी वाटले. त्याने आनंदाने उडीच मारली.

dr.pradip.awate@gmail.com