नवीन वर्ष, नवा सूर्य

एका भव्य रथाचं जमिनीत रुतलेलं चाक आणि कर्ण ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे..

प्राची मोकाशी mokashiprachi@gmail.com

तुलिका तिने रेखाटलेल्या तिच्या एका पेंटिंगकडे एकटक पाहत होती. महाभारतातील प्रसंग. एका भव्य रथाचं जमिनीत रुतलेलं चाक आणि कर्ण ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे..

पेंटिंगच्या खालच्या उजव्या टोकाला तुलिकाने पेंटिंगला शीर्षक दिलं होतं- ‘सूर्यपुत्र’! तुलिका सातवीत शिकत होती. वॉटर कलर पेंटिंग अगदी सुरेख आणि लीलया करायची ती. एवढय़ात तिची आई खोलीत आली.

‘‘मस्त जमलं आहे हे पेंटिंग. हे साकारणं सोपं नाहीये!’’ आई पेंटिंग हातात घेत म्हणाली.

‘‘टीव्हीवर महाभारत बघताना सुचलं होतं एकदम. पण त्यानंतर इतके दिवस झाले.. एकही पेंटिंग सुचलं नाहीये. या कर्णाच्या चाकासारखी माझ्या विचारांची चाकंही कुठेतरी रुतली आहेत असं वाटतंय. उद्या आपल्या आजोबांचा वाढदिवस! दरवर्षी मी त्यांना पेंटिंग गिफ्ट करते. यंदा तर त्यांची पंचाहत्तरी आहे आणि अजूनही चित्र काढायला विषयच मिळत नाहीये मला.’’ तुलिका हताशपणे म्हणाली.

‘‘आधी काढलेलं कुठलं चित्र आहे का गिफ्ट करायला?’’

‘‘आजोबांनी ती सगळी पाहिलीत. आणि नवीन चित्र देण्यात तर मजा आहे ना!’’

‘‘तेही खरंय! डोंट वरी! नक्की सुचेल विषय. कधी कधी आपल्याला नं ‘पुनश्च हरी ओम’ करावं लागतं.’’

‘‘‘पुनश्च हरी ओम’? म्हणजे..?’’

‘‘म्हणजे ‘रिस्टार्ट’ करणे.. मुळापर्यंत जाणे. विचारांची चाकं जर योग्य दिशेने फिरत नसतील तर पुन्हा मुळापासून सुरुवात करायची. मग बघ- रुतलेलं चाक पुढे जाणारच.’’ आई सकारात्मकतेने म्हणाली.

तेव्हाच नेमकी कुकरची शिट्टी झाली म्हणून आई लगबगीने स्वयंपाकघरात गेली.. पण तिने उच्चारलेले ‘पुनश्च हरी ओम’ हे शब्द तुलिकाच्या मनात रेंगाळत राहिले. तिला आठवलं, ती लहानपणी नेहमी काढायची ते तिचं आवडीचं चित्र : डोंगराच्या आडून उगवणारा सूर्य, आकाशात उडणारे पक्षी, वाहणारा झरा.. विचार करता करता तिची नजर खोलीतल्या िभतीवर सजवलेल्या फोटोंच्या कोलाजकडे गेली. त्यात होता समुद्रकिनाऱ्यावर वाळूचा किल्ला बनवताना तिचा, तिच्या धाकटय़ा बहिणीचा- कलिकाचा आणि तिच्या आजोबांचा फोटो! आणि त्यावरून तिला एकदम पेंटिंगसाठी विषय सुचला : सूर्योदय. पण डोंगराआडचा नाही, तर समुद्रकिनाऱ्यावरचा. खरं तर रोज तिच्या डोळ्यांसमोर असणारे हे फोटो! मात्र, विषय तिला आज मिळाला.. पण योग्य वेळी!

तुलिकाने ड्रॉवरमधून एक नवीकोरी ड्रॉइंग शीट काढली. शीटवर पेन्सिलने सूर्योदयाचं ढोबळ चित्र रेखाटलं. समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूत सूर्याकडे हात हवेत उंचावून उभं असलेलं एक लहान बाळ तिने काढलं. त्या बाळाने जणू खेळण्यासाठी उगवत्या सूर्याला चेंडूसारखं दोन्ही हातात धरलंय. वाळूत खाली बसलेल्या आजोबांनी बाळाला कमरेवर धरलंय आणि शेजारी एक लहान मुलगी वाळूचा किल्ला बनवतेय. एवढं ड्रॉइंग काढून तिला हुरूप आला.

आता तिने चित्रात रंग भरायला सुरुवात केली. सूर्य रंगवला. पिवळा. त्याला केशरी शेड्स दिल्या. निळं आकाश रंगवलं. लाल, केशरी, पिवळ्या रंगांनी आकाशाला रंगांच्या छटा काढल्या. सूर्याच्या किरणांनी उजळून निघालेल्या पांढऱ्या ढगांनाही तिने विविधरंगी छटा दिल्या. समुद्र आणि आकाशाचं मेळ घालणारं क्षितीज रंगवलं. समुद्राच्या लाटांवर सूर्यप्रकाशाची पखरण दाखवली. किनाऱ्यावरच्या वाळूला सूर्यकिरणांची सोनेरी झाक दिली. तिन्ही आकृत्या रंगवल्या..

बराच वेळ तिचं हे पेंटिंग काढणं सुरू होतं. हातात ब्रश धरून ती आपलं पेंटिंग न्याहाळत असताना आई तिला जेवणासाठी बोलवायला पुन्हा खोलीत आली.

‘‘छान जमलंय की!’’ आई पेंटिंग पाहून म्हणाली.

‘‘खरंच? आवडेल आजोबांना?’’

‘‘एकशे एक टक्के! सूर्योदय अगदी आकर्षक दिसतोय. नवीन वर्ष, नवा सूर्य, नवी आशा, नवे धैर्य.’’

‘‘अरे वा! पेंटिंगला हे शीर्षक छान आहे..’’ तुलिकाने लगेचच पेंटिंगच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात शीर्षक लिहिलं- ‘नवीन वर्ष, नवा सूर्य’!

‘‘आपल्या कलिकाला एकदम हनुमान करून टाकलंय! उगवत्या सूर्याकडे झेप घेणारी कलिका.. आवडली आयडिया!’’

‘‘पण आहेत कुठे बाईसाहेब? मघाशी खोलीत येऊन कुठलातरी कागद घेऊन पळालीये.’’

‘‘तिचंपण ड्रॉइंग सुरू आहे. आजोबांना ती ते ड्रॉइंग ताईसारखंच गिफ्ट करणारे म्हणे!’’

‘‘मस्त! आई, खरं तर नवीन वर्ष आलं तरी सूर्य कुठे नवीन असतो गं? तो तोच असतो. कॅलेंडरवर फक्त नव्या वर्षांचा आकडा तेवढा बदलतो.’’

‘‘पण एखादी नवीन गोष्ट सुरू करायला किंवा एखादं रखडलेलं काम ‘पुनश्च हरी ओम’ करायला नवीन वर्ष पुन्हा नव्या संधी घेऊन येईल, ही आशाच मनाला किती सकारात्मक भावना देते..’’

‘‘..आणि विचारांची चाकं गतिमान होतात.’’ तुलिका उत्स्फूर्तपणे म्हणाली.

तेवढय़ात कलिका तिने काढलेलं ड्रॉइंग घेऊन खोलीत आली. तिने सूर्य म्हणून एक मोठा गोल ‘स्मायिलग फेस’ काढला होता आणि त्याच्या तोंडाशी आईस्क्रीमचा कोन होता. क्रेयॉन्सने रंग भरले होते.

‘‘हे काय आहे?’’ आईने कलिकाला हसत विचारलं.

‘‘सूर्यबाप्पा ‘न्यू ईयर’ सेलिब्रेट करायला आईस्क्रीम खातोय. तो ‘हॉट’ असतो नं! आईस्क्रीम खाल्ल्यावर तो ‘कोल्ड’ होईल. आणि मग आजोबांना आणि मला ग्राउंडवर जास्त वेळ सायकल चालवायला जाता येईल. आपण हे ड्रॉइंग आजोबांना गिफ्ट देऊ या.’’ कलिका निरागसपणे म्हणाली.

तिची ती भन्नाट कल्पनाशक्ती पाहून तुलिकाला हसू आवरेना. तिने कलिकाच्या डोक्यावर हलकासा टप्पू दिला.

‘‘मुलींनो, तुमच्या दोघींची ड्रॉइंग्ज बघून मला नवीन वर्षांसाठी चार ओळी सुचल्या आहेत..’’ आई टिचकी मारत म्हणाली.

‘‘वॉव! शीघ्रकवी..’’ तुलिकाचे प्रोत्साहन.

‘साठवत अनेक ‘फ्लेवर’

सरली गतवर्षीची रात

नवीन वर्षांचा नवा सूर्य

उगवला आईस्क्रीम खात..’

आपणही व्हावे..

बहरलेले झाड पाहून वाटे

आपणही व्हावे झाड

अंगाखांद्यावर बागडणाऱ्या

पाखरांचे करावे लाड

उंच पर्वत पाहून वाटे

आपणही व्हावे पर्वत

भक्कम उभी भिंत होऊनी

वाईटाला राहू अडवत

खळाळणारा झरा पाहून वाटे

आपणही व्हावे झरा

अडचणीतून वाट काढीत जाणे

हाच मार्ग खरा!

उगवणारा सूर्य पाहून वाटे

आपणही व्हावे सूर्य

अंधारावर मात करून

प्रकाशाचे आणू या राज्य

विशाल आभाळ पाहून वाटे

आपणही व्हावे आभाळ

सोबत यावे घेऊन पाऊस

फुलवू या ओसाड माळ

रोजच नवीन व्हावे काही

सतत येते मनात

आई म्हणते, ‘आधी माणूस हो,

शोभून दिसशील जनात!’       – एकनाथ आव्हाड

बालमैफल

story for children interesting story for kids moral stories for kids zws 70

शोभून दिसशील जनात!’      

– एकनाथ आव्हाड

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Story for children interesting story for kids moral stories for kids zws

Next Story
आणि टेडी सापडला…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी