आजी सिद्धार्थला नेहमी म्हणायची, ‘‘सुपीक डोक्याचा माझा नातू.’’ तो फक्त यावर गालातल्या गालात हसायचा.

एकदा सिद्धार्थने आजीला विचारलंच, ‘‘आजी ते सुपीक डोक्याचा म्हणजे गं काय?

Devon Conway Out Of IPL 2024
IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे IPL मधून बाहेर
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श

आजी हसून म्हणाली, ‘‘झालं! म्हणजे तुला त्याचा खरा अर्थ आजवर कळलाच नाही की काय?’’

सिद्धार्थची आई मधे पडून म्हणाली, ‘‘ज्या मुलाच्या डोक्यात नेहमी नवनवीन कल्पना येतात असा. कळलं?’’

‘‘हं, आत्ता कळलं. थँक्यू आजी!’’ म्हणत त्याने आजीला मिठीच मारली.

त्याच्या मनात आलं- ‘म्हणजे मी हुशार आहे, असाच त्याचा अर्थ होतो तर!’

सिद्धार्थ इंग्रजी माध्यमात शिकत होता. म्हणूनही त्याला असे काही शब्द आणि त्याचे अर्थही कळायचे नाहीत. पण त्याची आई त्याला अशा शब्दांचे अर्थ नीट समजावून सांगे. जसे की, जमीन सुपीक असली की, त्यात पेरलेले धान्याचे बी नुसते अंकुरतच नाही तर छान वाढते, फळते, आणि फुलतेही.

सिद्धार्थच्या डोक्यात अशा नवनवीन कल्पना यायच्या. पतंग चौकोनी आकाराऐवजी गोल बनविला तर? वाहन पेट्रोल, डिझेलवर चालतं पण ते डगमगत का नाही? बंदच का पडून जातं इंधन संपलं की? वगैरे. त्याच त्याच्या सुपीक डोक्यात चार महिन्यांपूर्वी त्याचा वाढदिवस झाला तेव्हा एक विचार आला की, आई माझा, बाबांचा वाढदिवस आमचे मित्र-मैत्रिणी बोलावून साजरे करते, पण तिचा वाढदिवस असला की आपण तिघे बाहेर का जेवायला जातो? घरी तिच्या मैत्रिणी शर्मिला मावशी, मीना मावशी, सोनाली मावशी यांना बोलावून का साजरा करीत नाही?

त्याने बाबांना हा प्रश्न विचारलाही होता. तर बाबा म्हणाले, ‘‘हे बघ तुझ्या व माझ्या वाढदिवसाला तुझी आई छान छान बेत स्वत: करते. त्यांना खिलवते. मग तिच्या वाढदिवसाला कोण पदार्थ बनविणार? मला सगळं येत नाही. तू लहान आहेस म्हणून आपण बाहेरच जेवायला जातो. आईला स्वयंपाकाची विश्रांतीही आणि आपण नाही का तिला साडी, गळ्यातलं काय काय घेऊन देतो प्रेझेंट.’’

‘‘तेही बरोबर आहे.’’ त्याने मान डोलावली.

पण त्याला वाटलं आईाा प्रेझेंट बाबाच आणतात. मी कुठे काय देतो तिला? काहीच नाही.

ती तर माझ्या वाढदिवसाला केक बनवते, मित्रांना बोलावते, छोले-पुऱ्या करते, पावभाजी करते. बाबा आइस्क्रीम आणतात. घरभर पताका, फुगे, माळा लावतात. ते सर्व त्याला आठवत राहायचं. त्याने मग मनाशी विचार केला. आई कामात आहे बघून त्याने दार लोटून त्याची पिगी बँक उघडली. त्यातले पैसे मोजले.  आजी, आजोबा, मामा, बाबाचे मित्र, कुणी ओळखीचे आले की त्याच्या हातात पैसे ठेवत. म्हणत, ‘‘तुला काय हवे ते आण. पुस्तक, बॅट बॉल, जे हवं ते.’’ पाचशेची नोट असेल तर तो ती आईकडे देई. पन्नास, वीस रुपये असले तर आई म्हणे, ‘‘हे ठेव तुझ्या बँकेत. आपण तुझ्यासाठी बाजारात गेलो की हवं ते आणू काय? चॉकलेटस् सोडून’’ आई  बजावून सांगे.

सिद्धार्थने दोनदा-तीनदा पैसे मोजले. १५० रु. भरले.  मग त्याने विचार केला, ‘आईला विचारूनच  काही १०० रु. ची वस्तू आणायची का? ती परवानगी देईल  का?’ पण ते त्याच्या मनाला पटलंच नाही. विचारून आणलं तर ते कसलं वाढदिवसाचं प्रेझेंट? तो स्वत:शी हसला.

ते गुलाबी, लाल, पिवळे चमचमते रॅपर्स टर्र्र्र करून टरकवून आतलं मित्रांनी दिलेलं प्रेझेंट बघण्यातही खूप आनंद होतो.

तस प्रेझेंट कैलासने त्याला परवाच्या वाढदिवसाला दिलं होतं.  पाण्यावर चालणारी फुटभर बोट. अनेकदा तो टबातल्या पाण्यात ती सोडून चालू करीत असे. त्यात सेल होता. त्यावर ती चाले.

म्हणता म्हणता आईचा वाढदिवस जवळ आला. त्याला आज फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जायचं नव्हतं. पण आईने  ऐकलं नसतंच. तो प्रॅक्टिससाठी गेला. रिक्षातून उतरल्या उतरल्या तो रस्ता क्रॉस करून त्या दुकानात जाऊन आईसाठी प्रेझेंट आणायचं होतं. पण आईच उतरवून घ्यायाला आली. त्याला घरीच यावं लागलं. बिच्चारा सिद्धार्थ!

आई आत येताच म्हणाली, ‘‘आज तुझे तूच कपडे बदल. काढून ठेवलेत कॉटवर. हात-पाय धुऊन ये. मी गरमागरम पुऱ्या तळून वाढते तुला.  छोले, पुऱ्या, आम्रखंड – तुझ्या आणि बाबांच्या आवडीचा मेनू आहे आज.’’

तो खोलीपर्यंत गेला. थांबला. आईचं लक्ष नाहीए, तिची आपल्याकडे पाठ आहे हे बघून तो मांजर पावलाने तसाच बाहेरच्या खोलीत आला. चप्पल पायांत सारली. दार लोटलं अणि समोरच असलेल्या लिफ्टने तो खाली आला. मोठय़ा फाटकांतून इमारतीच्या बाहेर आला. समोर वाहता रस्ता होता. थांबला. ट्रॅफिकचा अंदाज घेतला आणि भरभर.. न पळता त्याने रस्ता क्रॉस केला. समोरच तर ते दुकान होतं. मुठीत पैसे घट्टपणे पकडून ठेवले होते.

काउंटरवर गर्दी नव्हती. त्याने दुकानदाराला सांगितलं, ‘‘आईला वाढदिवसाचं प्रेझेंट द्यायचं आहे. गिफ्ट दाखवा. दीडशे रुपयांचं!’’ तो गंभीर झाला होता.

त्याच्याकडे फार वेळ नव्हता. आई इथवर यायच्या आत त्याला गिफ्ट घेऊन  परत घरी जायचं होतं.

दुकानदाराने दोन-तीन वस्तू दाखवल्या, पण त्याला त्या आवडल्या नाहीत. चार अनब्रेकेबल बरण्या, मोठा सवर्ि्हग काचेचा बाऊल आणि मोठा ट्रे.

‘‘आइस्क्रीम बाउल्स आहेत?’’ त्यालाच सुचलं.

‘‘हो. आहेत ना.’’ म्हणत त्याने ते दाखवलं. छोटा सेट ट्रे व आइस्क्रीम  बाऊल्स आणि चमचेही सहा.’’ त्याचा पिंक कलर त्यालाही आवडला. छान छोटी छोटी गुलाबी फुलं होती त्यावर. थोडी नक्षीही. ‘‘गिफ्ट पॅक.’’ त्याने बाबांच्याच आवाजात ऑर्डर सोडली.

‘‘किंमत?’’ सिद्धार्थने विचारलं.

‘‘वन् फिफ्टी!’’ त्याने सांगितले.

‘‘म्हणजे जमविलेल्या पैशात छान खरेदी झाली,’’ म्हणत तो हळूहळू मोठय़ा रस्त्यापर्यंत आला. एका मोठय़ा दादाच्या सोबतीने रस्ता क्रॉस केला.

सिद्धार्थ खूश होता. जमविलेल्या पैशांतून त्याने आईसाठी वाढदिवसाचं प्रेझेंट आणलेलं होतं.

तो घरात आला तर त्याची आई कुणाला तरी फोनवर सांगत होती- ‘‘अगं, मी आणला त्याला रिक्षामधून उतरवून घरी. कपडे बदलायला सांगितलं त्याला. गरमागरम पुऱ्या तळत होते मी त्याच्यासाठी. त्याला छोटय़ा पुऱ्या खूप आवडतात. खोलीत पाहते तर हा मुलगा गायब! कुठे गेला असावा?’’

आईचा स्वर घाबरा व रडवेला झाला होता.

सिद्धार्थने गिफ्ट पॅक समोर करून ‘‘आई, हे तुझ्यासाठी.’’ त्याच्या आईने  वळून पाहिलं.

‘‘हे काय? आणि कुठे गेला होतास तू? तेही मला न सांगता.’’  तिची नजर बघून तो घाबरला होता.

‘‘सॉरी आई, हे तुझं बर्थ-डे गिफ्ट आणायलाच.’’

‘‘मला का नाही सांगितलंस?’’ आई रागाच्या स्वरातच म्हणाली.

‘‘काय ब्रह्मांड आठवलं रे मला त्या दहा-पंधराच मिनिटांत.’’ म्हणत आईने त्याला जवळ घेतलं.

‘‘आई, बर्थ-डेचं गिफ्ट सांगून का आणतं कुणी? त्यात काय गंमत आहे मग?’’ त्याने खुलासा केला. तेही बरोबरच होतं. सरप्राइज हे सरप्राइजच  हवं. ते तिलाही पटलं.

‘‘माझं गुणी बाळ ते.’’ आईने पटापट पाच-सात पाप्याच घेतल्या.

‘‘चला वीर, जेवायला.’’ म्हणत आईने त्याला टेबलाशी आणला.

नंतर दिवसभर बाबांसह कितीतरी जणांना त्याच्या आईने तो  गिफ्टचा किस्सा कौतुकाने सांगितला. सिद्धार्थने ते सर्व ऐकलं आणि तोही सुखावलाच. त्याने ठरवलं होतं  की असंच बर्थ डे प्रेझेंट पुढच्या वर्षी बाबांनाही द्यायचं. मजा येईल. पण आपलं हे गुपित त्याने कुण्णाला सांगितलं नाही. सध्या तरी!

वृंदा दिवाण