डोकॅलिटी

अजयने ससा, मांजर आणि कुत्रा हे तीन प्राणी पाळले आहेत. अजयकडे असलेल्या जुन्या काटय़ावर त्यांची वजने खालील प्रकारे भरतात.

अजयने ससा, मांजर आणि कुत्रा हे तीन प्राणी पाळले आहेत. अजयकडे असलेल्या जुन्या काटय़ावर त्यांची वजने खालील प्रकारे भरतात.
bal03या जुन्या काटय़ावर कुठलेही वजन ठेवलेले नसताना तो शून्यावर राहत नाही. (तो शून्यावर आणण्याची        यंत्रणा बिघडलेली आहे.) तर त्याच्या नव्या वजनकाटय़ावर ससा, मांजर, कुत्रा यांचे एकूण वजन ३९ किलो भरते. हा काटा व्यवस्थित असला तरी, गंमत म्हणजे या काटय़ावर ३० किलोच्या खालची वजनेच करता येत नाहीत. यावरून प्रत्येक प्राण्याचे खरे वजन किती आहे हे तुम्हाला काढायचे आहे.

कसे सोडवाल?
 जुन्या काटय़ावरील शून्य योग्य जागी नसल्यामुळे प्रत्येक वजनात  एवढी चूक (तफावत) आहे असे मानू. म्हणजेच या काटय़ावर दोघादोघांची केलेली खरी वजने अनुक्रमे (१३+), (२४+) आणि (२९+) आहेत. यांना आपण राशी १, राशी २, राशी ३ अशी नावे देऊ.
जुन्या काटय़ावरील ससा, मांजर आणि कुत्रा यांचे एकूण वजन = ( राशी १ + राशी २ + राशी ३) भागिले २ हे bal04नवीन काटय़ावरील वजनाएवढे म्हणजे ३९ किलो असेल. (१३+२४+ ३७) / २ = ३९
यावरून  ची किंमत ४ मिळेल. (जुन्या काटय़ावरील वजनात ४ मिळवले असता खरे वजन मिळते.)
म्हणजेच ससा आणि मांजर = १३+४, ससा आणि कुत्रा = २४+४ तसेच मांजर आणि कुत्रा = २९+४ अशी खरी वजने आहेत.
ही तीन समीकरणे वापरून तुम्हाला तिन्ही प्राण्यांची वजने काढता येतील.

bal02bal01पार्थ चितळे,  युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Use mind