डोकॅलिटी :

डोकॅलिटी :  गणरायाच्या पूजेत अथर्वशीर्षांला एक वेगळे स्थान आहे. घराघरांत आरतीबरोबरच अथर्वशीर्ष म्हणण्याचा प्रघात आहे. श्री गणपतीची महती सांगणाऱ्या अथर्वशीर्षांची आवर्तने भक्त मोठय़ा श्रद्धेने करतात. याच्या पठणाने मन प्रसन्न होते. आजच्या कोडय़ात अथर्वशीर्षांतील काही शब्द तुम्हाला ‘अ’ गटात दिलेले आहेत. त्याचे अर्थ ‘ब’ गटात दिलेले आहेत. त्यांच्या योग्य जोडय़ा तुम्हाला लावायच्या आहेत. चला तर! ‘गणपती […]

डोकॅलिटी : 
bal099गणरायाच्या पूजेत अथर्वशीर्षांला एक वेगळे स्थान आहे. घराघरांत आरतीबरोबरच अथर्वशीर्ष म्हणण्याचा प्रघात आहे. श्री गणपतीची महती सांगणाऱ्या अथर्वशीर्षांची आवर्तने भक्त मोठय़ा श्रद्धेने करतात. याच्या पठणाने मन प्रसन्न होते. आजच्या कोडय़ात अथर्वशीर्षांतील काही शब्द तुम्हाला ‘अ’ गटात दिलेले आहेत. त्याचे अर्थ ‘ब’ गटात दिलेले आहेत. त्यांच्या योग्य जोडय़ा तुम्हाला लावायच्या आहेत. चला तर! ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणून करू या सुरुवात. n
उत्तरे :
१) प्रात:- पहाट, सकाळ २) व्रात- समूह ३) त्रय- तीन ४) अनल- अग्नि ५) अच्युत- न ढळणारा, परमेश्वर ६) रद- दात ७) शूर्प- सूप ८) हर्ता- संकट निवारणारा ९) पूषा- सूर्य १०) ताक्ष्र्य- गरुड ११) वाग्मी- वक्ता १२) अनिल- वायु १३) धर्ता- धारण करणारा १४) आप- पाणी

ज्योत्स्ना सुतवणी -jyotsna.sutavani@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Use your mind to answer the question