21 October 2020

News Flash

सत्तरीनंतरचा मस्त, मजेत प्रवास

काळ हा सरतच असतो, निसर्गही आपलं काम चोखपणे करतो. वयाची सत्तरी व ऐंशी उलटली.

आमचा सत्तरीनंतरचा प्रवास मस्त, मजेत, आनंदात आम्ही घालवतोय.

काळ हा सरतच असतो, निसर्गही आपलं काम चोखपणे करतो. वयाची सत्तरी व ऐंशी उलटली. मुलांची शिक्षणं, नोकरी, लग्नकार्ये झाली. परत आम्हा दोघांचंच जीवन सुरू झालं, जिथून संसाराला सुरुवात केली. आता हाताशी भरपूर वेळ आहे. आणि या वेळात काय करायचं ते आम्हाला कळलं आहे.

* नातवंडे लहान होती तेव्हा त्यांना बालवाडीतून, शाळेतून आणणे आणि त्यांचे आईवडील नोकरीवरून घरी येईपर्यंत त्यांना पाहणे, त्यांच्याशी खेळणे वगैरेत छान वेळ गेल्यामुळे जवळीक निर्माण झाली. आता ती मोठी आहेत. * आम्ही नोकरी करताना संगणक वापरल्यामुळे नवीन तंत्रज्ञान शिकण्यास सोपे पडले. नातू निखिल याने मला वाढदिवसाला आयफोन दिला त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप हेही तंत्र समजले. फेसबुकवर मी कविता लिहून ठेवण्याचा छंद जोपासला. माझ्या फेसबुक पोस्टवर ३००हून अधिक कविता आहेत.  * सोशल मीडियामुळे दूर असलेले नातलग, मावस-चुलत-आते-मामे भावंडे परत भेटली. लहानपणच्या आठवणींना रंगत आली. * शिवण, विणकाम, क्रोशेकाम वगैरे कलाकौशल्य शिकल्याने आपला आपला वेळ शांतपणे घालवण्याची सवय लागली. जमेल तेव्हा संधी मिळताच प्रवासही भरपूर केला. पाचही खंडांतून फिरण्याचा योग आला.

माझे पती येथील एका राजकीय पक्षात सक्रिय भाग घेतात. संगीतात शून्य असूनही दोन वर्षे ते व्हायोलिनच्या क्लासला जात होते व रोज नियमित त्याचा सरावही करतात. त्यांना चित्रकलेची आवड व ती कला अवगत आहे. त्यांनी ६०० हून अधिक स्केचेस काढली आहेत. आम्ही दोघंही तरुण मंडळींशी भरपूर गप्पा करतो. त्यामुळे नवनवीन विचारसरणी समजते. याबरोबरच दूरचित्रवाणी, वाचन, बागकाम, संगणक, रोजचे २/३ किलोमीटरच चालणे.. तर असा हा आमचा सत्तरीनंतरचा प्रवास मस्त, मजेत, आनंदात आम्ही घालवतोय.

– शुभदा हेमंत गोखले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2018 1:01 am

Web Title: couple living happily life at the age of 70
Next Stories
1 वृद्धत्वाचा आनंदोत्सव
2 अपंगांच्या चेहऱ्यावरील आनंद
3 दोस्ती समाजसेवेशी
Just Now!
X