मेष ज्या कामामध्ये एकेकाळी इतरांकडून नकारघंटा ऐकायला मिळाली होती त्या कामात आता त्यांच्याकडून सहकार्य देण्याची तयारी दर्शविली जाईल. व्यवसाय-धंद्यात नवीन वर्षांकरिता जे बेत तुम्ही आखून ठेवले होते ते कृतीत आणणे शक्य होईल. नोकरीमध्ये एखादे काम पूर्वी तुमच्या हातून अर्धवट राहिले असेल तर ते काम आता तुम्ही निश्चयाच्या बळावर हाती घ्याल.  घरगुती खर्च वाढतील. पण त्याची तरतूद होईल.

वृषभ या आठवडय़ात तुम्हाला एखादे अवघड काम हातात घ्यावेसे वाटेल. ते पूर्ण करण्याकरता काहीही करण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात एखादा कमाई करून देणारा प्रोजेक्ट हाती घ्यावासा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी जी संधी पूर्वी तुमच्या हातून निसटली होती ती मिळविण्याकरता तुम्ही धडपड कराल. त्यातून तुम्हाला आíथक फायदा होईल. परंतु कामामध्ये तांत्रिक अडथळे बरेच असतील. घरामध्ये लहान-मोठे प्रश्न सोडवताना तुम्हाला तुमची अक्कलहुशारी वापरावी लागेल. त्याचे इतर लोक कौतुक करतील.

मिथुन ज्या कामांना गती येत नव्हती ती कामे मार्गी लावण्यासाठी तुम्हाला आता ‘धक्का स्टार्ट’ या पद्धतीने काम करणे भाग पडेल. व्यापार-उद्योगात सरकारी नियमामुळे जी कामे थांबून राहिलेली असतील त्यांना हळूहळू वेग मिळायला सुरुवात होईल. छोटय़ा-मोठय़ा कामानिमित्त प्रवास करण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना एखादे किचकट आणि कंटाळवाणे काम संपल्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकता येईल. घरामध्ये महत्त्वाच्या कामात तुमचा पुढाकार राहील.

कर्क सध्याचे ग्रहमान तुम्हाला अनुकूल असल्याने तुमच्या उद्योगप्रिय स्वभावाला भरपूर वाव असणार आहे. त्या नादात तुम्ही स्वत:वरचा व्याप वाढवत जाल. व्यवसाय-उद्योगामध्ये जे काम तुम्ही हातात घेतलेले असेल ते पूर्ण करण्याकरिता रात्रीचा दिवस करावा लागेल. कामगारांकडून काम करून घेण्यासाठी त्यांना एखादे आमिष दाखवावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता उत्तम राहील. तुमच्यावरील कामाचा दबाव वाढवत जातील. घरामध्ये सगळ्यांना सांभाळावे लागेल.

सिंह ज्या कामामध्ये तुम्हाला पूर्वी आळस आला होता त्याला गती देण्यासाठी धक्का स्टार्ट या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. व्यापार-उद्योगात सरकारी नियम किवा प्रतिस्पध्र्यामुळे एखादे काम अडून राहिले असेल तर त्यावर युक्ती शोधून काढाल.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमची अडचण लक्षात घेऊन एखाद्या सहकाऱ्याची मदत देण्याचे आश्वासन देतील. घरामध्ये एखाद्या सदस्यामुळे तणाव निर्माण झाला असेल तर थोडासा कमी होईल.

कन्या ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत. त्यामुळे मन:स्थिती उत्साहवर्धक असेल. हातात घेतलेले काम बुद्धीच्या जोरावर पूर्ण करून दाखवाल. व्यापार-उद्योगात एखाद्या मोठय़ा व्यक्तींशी ओळख झाल्यामुळे अवघड काम सोपे होईल. सरकारी कामे आणि कोर्ट व्यवहार यांना गती मिळेल. नोकरीमध्ये इतरांनी जे काम अर्धवट सोडले होते, ते वरिष्ठ तुम्हाला पूर्ण करायला सांगतील. बदल्यात एखादी विशेष सवलत देतील. ज्यांना बदली हवी असेल त्यांनी लगेच प्रयत्न करावेत. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही.

तूळ ग्रहमान तुम्हाला स्फूर्तिकारक ठरणार आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचा वापर करून उद्दिष्ट सफल कराल. व्यापारीवर्गाला आठवडय़ाची सुरुवात लाभदायक ठरेल. लहान-मोठे खर्च भागल्यामुळे मनावरचा ताणतणाव राहील. काही ठिकाणी तुम्ही नको इतकी काटकसर कराल. नोकरीत आपले काम इतरांपेक्षा चांगले असावे याकरिता प्रयत्नशील राहा. तुमची एखादी लहानसहान मागणी वरिष्ठ पूर्ण करतील. घरामध्ये तुमच्या शांत वृत्तीला, सल्ल्याला बुजुर्ग व्यक्ती मान देतील.

वृश्चिक तुम्हाला आवश्यक असणारे ग्रह अनुकूल असल्यामुळे मनावरचा ताणतणाव कमी होईल. खूप चढ चढून आल्यानंतर आपल्याला थोडीशी विश्रांती घ्यावीशी वाटते, तशी आता तुमची स्थिती असेल. व्यापार-उद्योगात भागीदारी किंवा मत्रीकराराचे प्रस्ताव पुढे येतील. त्यावर निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीच्या ठिकाणी अवघड कामात शॉर्टकट शोधण्यात तुम्ही सफल व्हाल. संस्थेच्या गरजेनुसार काम केल्याने वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

धनू घोडा ही तुमच्या राशीची खूण आहे. शारीरिक कष्टाला तुम्ही कधीच कमी पडत नाही. व्यापार-उद्योगामध्ये पूर्वी केलेल्या कामाचे पसे हातात पडल्यामुळे तुमच्या गरजा भागू शकतील. सरकारी कर किंवा कोर्ट कामांना प्राधान्य दिले जाईल. नोकरीमध्ये वरिष्ठांना जपून शब्द द्या. जे काम तुम्हाला नेमून दिले आहे, ते वेळच्या वेळी पार पाडण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये काही नतिक जबाबदाऱ्या तुम्हाला सांभाळाव्या लागतील.

मकर कोणत्याही कामाचा कंटाळा न करणारी तुमची रास आहे. अवघड कामातही तुम्ही हिमतीने मार्ग काढता. या आठवडय़ामध्ये तुम्हाला हे सगळे गुण उपयोगी पडतील. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात थोडीशी कंटाळवाणी आणि धावपळीची होईल. किचकट काम हातावेगळे केल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. नोकरीमध्ये जे काम इतरांना जमले नाही ते काम तुम्ही पूर्ण करून दाखवाल. त्यामध्ये कदाचित तुमचा स्वार्थही दडलेला असेल. घरामधल्या एखाद्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये तुमचा सिंहाचा वाटा असेल.

कुंभ ज्या कामाचा तुम्हाला कंटाळा आला होता ते काम हातात घ्यावेसे वाटेल. व्यापार-उद्योगात तुमची गरज भागेल एवढे पसे मिळतील. नोकरीच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता वाढेल. कंटाळवाणे काम संपल्यामुळे तुमच्या मनाला दिलासा लाभेल. बेकार व्यक्तींनी त्यांचे प्रयत्न वाढवावे. घरामध्ये तुमच्या सल्ल्याचा इतरांना उपयोग होईल. त्यामुळे तुम्ही भाव खाल. एखादा छान कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात तुमचा सिंहाचा वाटा असेल.

मीन प्रत्येक  व्यक्तीला वाटते की आपले काम शांतपणाने आणि सहजगत्या पार पडावे. पण या आठवडय़ात  महत्त्वाची कामे इतरांवर न सोपवता शक्यतो स्वत: पार पाडा. व्यापार-उद्योगात जोखमीचे काम तडीस नेण्यासाठी भागीदारांना खूश ठेवावे लागेल. पशाची आवक-जावक समसमान राहील. नोकरीमध्ये अतिउत्साह आवरा. सर्व कामे एकटय़ाने न करता ‘टीम वर्कला’ महत्त्व द्या. घरामधील वातावरण आनंदी व उत्साही ठेवाल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com