News Flash

दि. १ ते ७ सप्टेंबर २०१७

चालू असलेल्या नोकरीत वरिष्ठांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील.

राशिचक्र

मेष : तुमची रास ही चर रास आहे. व्यापार-उद्योगात ज्या कामाला गती येत नव्हती त्या कामाला वेग देण्यासाठी ‘धक्का स्टार्ट’ या तंत्राचा वापर कराल. चालू असलेल्या नोकरीत वरिष्ठांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील. घरामधल्या व्यक्तींना तुम्ही जो सल्ला द्याल तो त्यांना लगेच पटणार नाही. जुनी वडिलोपार्जति प्रॉपर्टी किंवा स्थावर जंगम असेल तर त्यासंबंधीचे प्रश्न डोके वर काढतील. नातेवाइकांच्या फार जवळ जाऊ नका.

वृषभ : ग्रहमान तुम्हाला स्वस्थ आणि शांत बसू देणार नाही. मनाच्या कोपऱ्यामध्ये थोडासा आराम करण्याची भावना निर्माण होईल, पण एखादे तातडीचे काम निघाल्यामुळे तुम्ही त्यावरती लक्ष केंद्रित कराल. व्यापार-उद्योगात जमा-खर्चाची ताळेबंदी करताना काही चुका लक्षात येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या अपेक्षा जरी खूप असल्या तरी तुम्हाला मात्र तुमच्याच पद्धतीने काम करावेसे वाटेल. घरामध्ये महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल. या कामात कोणाचीच मदत होणार नाही.

मिथुन : ग्रहमान तुम्हाला स्फूर्तिदायक ठरेल. महत्त्वाचे ग्रह प्रसन्न असल्यामुळे कोणत्याही कारणाकरिता तुम्ही आता अडून राहणार नाही. व्यापार-उद्योगात नवीन प्रोजेक्टमधले तांत्रिक अडथळे दूर होतील. पशाची बाजू सुधारल्यामुळे मोठे निर्णय घेण्याचे धारिष्टय़ तुमच्यात निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामात वरिष्ठांना तुमची मदत उपयोगी पडेल. घरामध्ये अर्धवट राहिलेल्या कामांना गती येईल. वडिलोपार्जति प्रॉपर्टी आणि नतिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्यावे लागेल.

कर्क : ग्रहमान तुमच्या नेतृत्वगुणांना भरपूर वाव देणारे आहे. ज्या कामामध्ये तुम्ही हात घालाल ते काम वेळेत आणि तुमच्या मनाप्रमाणे पार पाडाल.  व्यापार-उद्योगात अपेक्षित येणी काही कारणाने लांबली असतील तर ती हातात पडण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतील एखाद्या सामूहिक कामात तुम्ही भाग घ्याल. नोकरीच्या ठिकाणी अवघड काम संपविण्याकरिता वरिष्ठांची तुमच्यावर भिस्त राहील. प्रत्येक काम ठरल्याप्रमाणे पार पाडाल. घरामध्ये तारीफ करतील, पण त्यामुळे तुमचे कष्ट वाढतील.

सिंह : ग्रह तुम्हाला अनुकूल असल्यामुळे कठीण कामातही तुम्ही प्रयत्नाने यशश्री खेचून आणाल. व्यापार-उद्योगात बाजारपेठेमध्ये चांगले काम केल्यामुळे तुमचा भाव वधारेल. नोकरीमध्ये तुमच्या कर्तृत्वाला भरपूर वाव असल्यामुळे तुम्ही इतरांना न जमलेले काम करून दाखवाल. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्तींकडून तुम्हाला तुमची स्तुती ऐकायला मिळेल. तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले पसे मिळतील.

कन्या : ग्रहमान तुमचे कष्ट वाढविणारे आहे, पण त्यातून तुमचा फायदा होणार असल्याने तुमची त्याविषयी तक्रार नसेल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात धावपळीत जाईल. काही लांबलेली बोलणी पूर्ण करायची असतील तर त्याचा विचार करा. नोकरीमध्ये तुमच्या शब्दाचा मान राखण्याकरिता तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागेल. त्याच्या बदल्यात वरिष्ठांकडून आश्वासन घ्याल. घरामध्ये आनंदी व उत्साही वातावरण असेल. घरामध्ये मुलांच्या स्वास्थ्याविषयी, प्रगतीविषयी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.

तूळ : या आठवडय़ात तुम्हाला पसा आणि ओळखी या दोन्ही गोष्टींचा उपयोग होईल. व्यापार-उद्योगात पूर्ण झालेल्या कामाची वसुली झाल्यामुळे तुमच्या खिशाला ऊब येईल. काही लांबविलेले प्रोजेक्ट छोटे-मोठे बदल करून पुन्हा हातात घ्याल. नोकरीच्या ठिकाणी ज्यांना तुम्ही पूर्वी मदत केली होती त्यांच्याकडून परतफेड झाल्यामुळे एक प्रकारचा दिलासा लाभेल. बेकार व्यक्तींना छोटे-मोठे काम मिळेल. ते त्यांनी सोडू नये. घरामध्ये तुमच्या स्वभावाला चांगले पूरक वातावरण लाभेल.

वृश्चिक : जीवनामध्ये प्रगती करायची म्हटली की बदल हे आलेच. या आठवडय़ात खूप काम करावेसे वाटेल. त्यासाठी तुमच्या कार्यपद्धतीमध्ये लहान-मोठे फेरफार कराल. आíथकदृष्टय़ा काही चांगल्या कमाईचे तुम्हाला संकेत मिळतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मानाचे स्थान दिले जाईल. त्यामुळे कामाचा व्याप खूप वाढणार आहे. काही जणांना परदेशी पाठवण्याचे संकेत मिळतील. घरामध्ये तुमच्या पद्धतीने सर्व काही करून घ्याल. राहू तुमचा ताणतणाव कमी करेल.

धनू : कितीही अडचणी असल्या तरी तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल. या गोष्टीचा तुम्हाला सर्व स्तरांवर उपयोग होईल. व्यापार-उद्योगात ज्यांनी पूर्वी तुम्हाला सहकार्य द्यायचे मान्य केले होते त्यांच्याकडून ते मिळाल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. काही जणांना परदेश प्रवास घडेल. नोकरदार व्यक्तींना ग्रहमान चांगले आहे. घरामध्ये एखादे चांगले कार्य ठरल्यामुळे सगळ्यांचा मूड मौजमजेचा असेल. प्रकृतीकडे लक्ष द्या.

मकर : ग्रहमान तुम्हाला पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण करून देणारे आहे. जे काम तुम्ही आज करणार आहात त्याचा नजीकच्या भविष्यात निश्चित उपयोग होईल. त्यात आळस करू नका. व्यापार-उद्योगामध्ये पशाची थोडीशी चणचण असेल. जुनी देणी द्यावी लागतील. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुमचे नाही ते काम करावे लागेल. तुमची चिडचिड होईल. घरामध्ये काही कारणाने वडय़ाचे तेल वांग्यावर निघेल. शक्यतो कोणत्याही वादात पडू नका. तुमच्या सभोवतालचे वर्तुळ बदलण्याची शक्यता आहे.

कुंभ : ग्रह तुम्हाला साथ देणारे आहेत. कोणतेही काम सहजगत्या होणार नाही. पण तुम्ही ते निश्चयाच्या जोरावर पार पाडाल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाच्या सुरुवातीला जुनी देणी द्यावी लागतील. तुम्हाला थोडीशी चिंता वाटेल. पण नंतर कमाई चांगली झाल्यामुळे त्याची कसर भरून निघेल. नोकरदार व्यक्तींना वेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याचा फायदा त्यांना नजीकच्या भविष्यात होईल. घरामध्ये जुने प्रश्न डोके वर काढतील. प्रकृतीकडे लक्ष ठेवा.

मीन : प्रकृती आणि मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रकृतीकडे तुम्ही लक्ष दिलेत तर तुमच्या हातून चांगले काम होईल. व्यापार-उद्योगात पसे मिळतील आणि खर्च होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एखादे अवघड काम तुमच्यावर सोपवतील. ते पूर्ण करण्याकरिता तुम्ही बरेच कष्ट घ्याल. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा कारणावरून वादविवाद होतील. तुम्ही दिलेला सल्ला सर्वाना मान्य होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 1:01 am

Web Title: astrology 1 to 7 september 2017
Next Stories
1 दि. २५ ते ३१ ऑगस्ट २०१७
2 भविष्य : दि. १८ ते २४ ऑगस्ट २०१७
3 दि. ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०१७
Just Now!
X