18 October 2019

News Flash

राशिभविष्य : दि. १० ते १६ मे २०१९

मंगळ-शुक्राच्या लाभयोगामुळे हौशीने सगळ्या कार्यक्रमात भाग घ्याल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष मंगळ-शुक्राच्या लाभयोगामुळे हौशीने सगळ्या कार्यक्रमात भाग घ्याल. गायन, वादन इ. कलांची जोपासना कराल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश मिळाले नाही तरी खचून न जाता नव्या वाटा शोधाल. मित्र, आप्तमंडळींच्या भेटीगाठी होतील. सहकारी वर्गाच्या फायद्यासाठी आपल्या ओळखीचा लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आरोग्य चांगले राहील.

वृषभ गुरू-रवीच्या षडाष्टक योगामुळे मानापमानाचे वेगवेगळे प्रसंग समोर येतील. दुसऱ्याच्या कृतीचा आपण स्वत:ला किती त्रास करून घ्यावा हे आपले आपणच ठरवावे. नोकरी-व्यवसायात न पटणाऱ्या गोष्टी कराव्याच लागतील. सहकारी वर्ग आपली अडचण समजून घेईल. कौटुंबिक सदस्यांच्या समस्या सध्यातरी आपण सोडवायला जाणे योग्य नाही. अन्यथा गैरसमज वाढतील. जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. मूत्रविकार सतावतील.

मिथुन बुध-शनीच्या नवपंचम योगामुळे बुद्धी आणि चिकाटीचा संगम होईल. स्वकर्तबगारीने स्वत:ला सिद्ध कराल. नोकरी-व्यवसायात आपली स्वतंत्र छाप उमटवाल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. सहकारी वर्गाला या ना त्या प्रकारे मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराच्या समस्यांवर विचार करून त्याला सुयोग्य मार्ग सुचवाल. कौटुंबिक सदस्यांमध्ये तात्त्विक वाद निर्माण होतील. एकेकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्याल. अस्थिर मनाला शिस्त लावा.

कर्क चंद्र-शुक्राच्या केंद्रयोगामुळे परिस्थिती अनुकूल राहील. प्रयत्नांना यश मिळेल. नव्या कल्पना अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या नाराजीकडे सकारात्मकतेने पाहाल. आवश्यक बदल स्वत:मध्ये करण्याचा प्रयत्न कराल. सहकारी वर्गाची साथ चांगली मिळेल. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात अधिकच व्यस्त असेल. त्याला त्याचा वेळ द्या. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. पित्ताशयाचे आरोग्य सांभाळा. त्रास असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सिंह रवी-शनीच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेले कार्य चिकाटीने पूर्ण कराल. उशिरा का होईना, पण कष्टाचे फळ मिळेल. नोकरी-व्यवसायात निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणात आपली मते ठामपणे मांडाल. सहकारी वर्गाला आपली बाजू पटणार नाही. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. मुलाबाळांच्या अडीअडचणी चर्चेने सोडवाल. पित्त-विकारांपासून स्वत:चे संरक्षण करा. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा.

कन्या बुध-गुरूच्या षडाष्टक योगामुळे लक्षात ठेवण्याच्या गोष्टीबाबत विशेष काळजी घ्या. लिखित स्वरूपाच्या नोंदी करून ठेवा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा शब्द तंतोतंत पाळा. सहकारी वर्गाला विश्वासात घ्या. जोडीदाराची वैचारिक व भावनिक साथ चांगली मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. आवडीचे छंद जोपासाल. प्रदूषित पाण्यापासून सावधान. हाडांची दुखणी अंगावर काढू नका.

तूळ शुक्र-मंगळाच्या लाभयोगामुळे स्वत:ची आवडनिवड जपाल. आपल्या कलात्मक दृष्टीला वाव द्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळवाल. जे क्षेत्र आपले नाही त्यातील जबाबदारी अंगावर घेऊ नका. जोडीदाराच्या सगळ्याच मतांशी आपण सहमत नसाल. परंतु न पटणाऱ्या मुद्दय़ांवर सध्या तरी वाद टाळा. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. घरातील सदस्याचा आपल्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रवी-गुरूच्या षडाष्टक योगामुळे गोष्टी मनाजोगत्या न घडल्यामुळे रागाचा पारा चढण्याची शक्यता आहे. अशा वेळी शब्द जपून वापरणे आवश्यक. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे वर्चस्व सहन करावे लागेल. मान्य नसूनही काही गोष्टींसाठी संमती दर्शवावी लागेल. सहकारी वर्गाकडून वेळेत काम पूर्ण करून घ्यावे लागेल. जोडीदार त्याच्या क्षेत्रातील कार्य पूर्ण करण्याच्या मागे असेल. एकमेकांना समजून घेणे आवश्यक. प्राणायामाने मन आणि डोकं शांत ठेवा.

धनू राशी स्वामी गुरू आणि भाग्येश रवीच्या षडाष्टक योगामुळे मानापमानाच्या भावनांना खतपाणी मिळेल. परंतु या गोष्टी हेतुपूर्वक टाळल्यात तरच पुढे जाऊ शकाल. नोकरी-व्यवसायात सर्वाच्या हिताचा विचार करून पुढे जाणे योग्य. सहकारी वर्ग मनात असूनही हवी तशी साथ देऊ शकणार नाही. जोडीदाराचे अतिस्पष्ट बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे लागेल. प्रतिक्रिया व्यक्त करू नये. कौटुंबिक वातावरण धावपळीचे राहील. विचारप्रू्वक निर्णय घ्या.

मकर शनी-बुधाच्या नवपंचम योगामुळे मेहनतीला व्यावहारिकतेची साथ मिळेल. ओळखीतून लाभ होतील. नोकरी-व्यवसायात समयसूचकता बाळगून मागे राहिलेले मुद्दे नव्याने मांडाल. सहकारी वर्गालाही यातून फायदा होईल. जोडीदाराला समजून घ्याल. एकमेकांना चांगली साथ द्याल. कौटुंबिक वातावरण आप्तेष्टांच्या समस्यांमुळे तणावपूर्ण राहील. परंतु स्वत: जबाबदारी घेऊन त्याचे निराकरण कराल. श्वसनसंस्थेसंबंधित त्रासांकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ शुक्र-मंगळाच्या लाभयोगामुळे सुप्तगुणांना वाव मिळेल. तसेच नेपच्यूनच्या शुभयोगामुळे अंत:स्फूर्ती, काव्य, लेखन यातही आनंद मिळवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या म्हणण्याप्रमाणे कामे पूर्ण कराल. परंतु त्याचे फळ विलंबाने पदरी पडेल. सहकारी वर्गाकडून मदतीची फारशी अपेक्षा ठेवू नका. जोडीदाराचे म्हणणे नीमूटपणे मान्य करा. त्याला विरोध करण्याची ही वेळ नव्हे. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. लहान-मोठे प्रवास योग आहेत.

मीन गुरू-बुधाच्या षडाष्टक योगामुळे वैचारिक अस्थिरता जाणवेल. निर्णय घेताना अडचणी येतील. सारासार विचार करून एकेका प्रश्नाचे उत्तर शोधाल. बोलाल तसे करून दाखवा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात जिवाची घालमेल करू नका. त्यापेक्षा आपल्या कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा. सहकारी वर्ग चांगली साथ देईल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील.

First Published on May 10, 2019 1:01 am

Web Title: astrology 10 to 16 may 2019