24 March 2019

News Flash

भविष्य : दि. १० ते १६ ऑगस्ट २०१८

एकाच वेळेला करिअर आणि घर या दोन्हींकडे लक्ष द्यावे लागेल.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष एकाच वेळेला करिअर आणि घर या दोन्हींकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे थोडीही विश्रांती मिळणार नाही. व्यापार-उद्योगात एखादे काम मार्गी लावण्याकरिता चांगली गती येईल. प्रत्यक्ष प्राप्ती  वाढण्याची खात्री वाटू लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांनी त्यांचे प्रयत्न वाढवावेत. घरामध्ये जे काम विनाकारण अडकून पडले होते त्या कामामध्ये सर्वानुमते एखादा निर्णय होईल.

वृषभ प्रयत्नांना तुम्ही जास्त महत्त्व देता, पण या आठवडय़ात नशिबाचे म्हणणे तुम्हाला मान्य करावे लागेल. व्यापार-उद्योगातील महत्त्वाची कामे सप्ताहाच्या मध्यापर्यंत उरका. अपेक्षित पसे हाती पडतील. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची कामे  वेळेत उरकाल. बेकार व्यक्तींनी वेळ न दवडता मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्यावा. घरामध्ये एखाद्या मोठय़ा व्यक्तीचे विचार ऐकून तुम्ही प्रभावित व्हाल. तुमच्यातील धार्मिक वृत्ती जागृत हार्हल.

मिथुन ‘स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ या म्हणीची आठवण करून देणारा हा आठवडा आहे. व्यापार-उद्योगात एखादे काम मार्गी लावण्यासाठी मध्यस्थांचा वापर कराल. नोकरीमध्ये विशिष्ट कामगिरीकरीता वरिष्ठ तुमची निवड करतील. या कामात अनेक कटकटी असतील, पण तुम्ही ते आव्हान म्हणून स्वीकाराल. घरामध्ये डागडुजी, सजावट वगरे गोष्टींचे बेत केले जातील. तुमच्यातील प्रावीण्याला वाव मिळेल.

कर्क व्यवहार आणि परोपकार या दोन्हीचा या आठवडय़ात समन्वय साधाल. त्यामुळे सभोवतालच्या व्यक्तींना तुमचे कौतुक वाटेल. व्यापार-उद्योगात काही करारमदार किंवा भेटीगाठींसाठी मुहूर्त लाभेल. जोडधंदा असणाऱ्यांना आठवडा चांगला जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाची पशाच्या किंवा इतर स्वरूपात पावती मिळेल. घरामध्ये एखादा निर्णय लांबला असेल तर त्यामध्ये तुमची मध्यस्थी उपयोगी पडेल.

सिंह जे काम विनाकारण लांबलेले होते ते संपविण्याचा तुम्ही आता निश्चय कराल. त्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात एखादी मोठी योजना तुमचे लक्ष आकर्षति करेल. नोकरीमध्ये एखाद्या विशिष्ट कामगिरीकरीता वरिष्ठ तुम्हाला जादा अधिकार देतील. त्यामुळे जरी कष्ट वाढले तरी तुमचा भाव वधारेल. घरामध्ये एखादे कार्य ठरत नसेल तर त्यावर तोडगा काढला जाईल.

कन्या आठवडय़ाच्या सुरुवातीला तुम्ही थोडेसे निराश दिसाल. पण नंतर े तुमच्यातील आशावाद जागृत होईल. व्यापार-उद्योगात तुमची अंत:स्फूर्ती तुम्हाला साथ देईल. तुमचे अंदाज-आडाखे बरोबर ठरल्यामुळे अनपेक्षित लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी आठवडय़ाचा पूर्वार्ध थोडासा धावपळीत जार्हल. एखादी विशेष सवलत मिळेल. घरामध्ये तुमचा सल्ला सर्वजण धुडकावून लावतील, पण नंतर तो बरोबर होता असे त्यांना मान्य करावे लागेल.

तूळ व्यवहार आणि परोपकार या दोन्ही डगरीवरती तुम्ही यशस्वी व्हाल. करिअरच्या वेळेला तुमचे लक्ष फक्त पशाकडे असेल. पण इतर वेळेला मात्र तुम्ही गरजू व्यक्तींना मदत करायला तयार व्हाल. व्यापार-उद्योगात एखादी भव्यदिव्य कल्पना तुमच्या मनात तरळत असल्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही सर्व नियोजन कराल. पशाची आवक वाढेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी विशेष सवलत मिळेल. घरामध्ये इतरांना तुम्ही शिस्तीचे धडे शिकवाल.

वृश्चिक प्रत्येक माणसाला आंतरमन लाभलेले असते. त्यामध्ये जे संकेत मिळतात ते कधी कधी बरोबर ठरतात. या आठवडय़ात असा सुखद अनुभव येईल. व्यापार-उद्योगात एखादा मोठा हात मारावा असे तुम्हाला वाटेल. कामाचा विस्तार करण्याकरिता नवीन व्यक्तींशी संपर्क होईल. पूर्वी पगारवाढीचे किंवा पदोन्नतीचे आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण होईल. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्तीची गाठभेट होईल.

धनू ज्या प्रश्नांनी गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी कोडय़ात टाकले होते, त्यावर आता काहीतरी मार्ग निघेल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाच्या मध्यानंतर अपेक्षित पसे हाती पडतील. ज्यांनी जोडधंदा सुरू केला आहे त्यांना त्यातून चार पसे मिळाल्यामुळे बरे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची एखादी अडचण वरिष्ठांसमोर मांडलीत तर ते त्यातून मार्ग काढतील. घरामध्ये ज्यांनी तुम्हाला विरोध केला होता त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळेल.

मकर ग्रहमान उत्साह वाढविणारे आहे. त्यामुळे भरपूर काम करून भरपूर पेसे मिळवावेसे वाटतील. व्यापार-उद्योगात प्रतिष्ठित व्यक्तीची साथ मिळाल्यामुळे किचकट कामे मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी जे काम पूर्वी वाया गेले असे वाटत होते त्याचा उपयोग होईल. संस्थेच्या कामानिमित्त एखाद्या नवीन व्यक्तीशी परिचय होईल. घरामध्ये तुम्ही तुमची कर्तव्ये व्यवस्थितपणे पार पाडू शकाल.

कुंभ ग्रहमान परिस्थितीमध्ये सुधारणा करणारे आहे. व्यापार-उद्योगात एखादे काम अडून राहिले असेल तर तुम्हाला मध्यस्थाची मदत मिळू शकेल. आíथक बाजू यथातथा राहील. नोकरीच्या ठिकाणी सगळी कामे एकटय़ाने करायला जाऊ नका. घरामध्ये एखाद्या मोठय़ा व्यक्तीची हजेरी लागेल. त्या व्यक्तीचे विचार ऐकल्यानंतर तुम्ही प्रभावित व्हाल. जुन्या मित्रांशी किंवा सहकाऱ्यांशी भेट झाल्याने तुमची करमणूक होईल.

मीन जी कामे योग्य व्यक्तीच्या संपर्काअभावी थांबून राहिली होती त्यांना गती मिळेल. प्रकृतीच्या तक्रारींकडे लक्ष द्या. व्यापार-उद्योगात संपूर्ण आठवडा धावपळीत जाईल. नोकरीच्या ठिकाणी न आवडणारे काम वरिष्ठ तुमच्या गळ्यात मारतील. घरातील व्यक्ती तुमच्याशी विचित्र वागतील. आपले नेमके काय चुकले हे तुम्हाला समजणार नाही.

First Published on August 10, 2018 1:01 am

Web Title: astrology 10th to 6th august 2018