01vijay1मेष या आठवडय़ात हातातल्या पशाचा विचारपूर्वक वापर करण्याची गरज आहे, नाहीतर कधी हातातून निसटतील ते समजणार नाही. व्यापारी वर्गाला जुन्या हितसंबंधातून व्यवसायाचे नवीन दालन खुले होईल. नोकरीतल्या कामाच्या निमित्ताने लांबच्या प्रवासाचे योग संभवतात. तिथल्या कामासंबंधी नीट माहिती करून घ्या. घरामध्ये एखादी नतिक जबाबदारी तुम्हाला हाताळावी लागेल.

वृषभ ज्या संधीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती संधी नजरेच्या टप्प्यात येईल. व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने आठवडय़ाची सुरुवात जरी थोडीशी कंटाळवाणी आणि कष्टदायक झाली तरी नंतर तुम्हाला तुमचे उद्दिष्ट पार पाडता येईल. उलाढाल वाढविण्याकरिता एखादी नवीन युक्ती अमलात आणाल. नोकरीच्या ठिकाणी स्वत:बरोबर सहकाऱ्यांचेही काम करावे लागेल. घरामध्ये ‘जिथे कमी तिथे आम्ही’ अशी तुमची स्थिती असेल. तरीही तुम्ही सर्व गोष्टी सफाईने हाताळाल. त्याचे कौतुक होईल.

मिथुन सभोवतालच्या व्यक्तींना कोडे पडेल की नेमके तुम्ही कसे आहात. अखेर तुम्ही आधुनिकतेला झुकते माप द्याल. व्यापार-उद्योगात एखादी नवीन कार्यपद्धती अमलात आणावी लागेल. ही बाब  खर्चीक असेल, पण तुमचा नाईलाज होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यामधल्या खास कौशल्याचा त्यांच्या स्वार्थाकरिता आणि संस्थेच्या फायद्याकरिता उपयोग करून घेतील. बेकार व्यक्तींना नवीन नोकरी मिळविण्यासाठी जागरूक राहणे आवश्यक आहे.

कर्क एखाद्या वेळेला कोणी तरी आपल्याला मदत करावी असे तुम्हाला वाटते. या आठवडय़ात तुमची जरी अशी अपेक्षा असली तरी ‘स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ याची आठवण येईल. व्यापार-उद्योगात चांगले पसे मिळवून देणारी एखादी संधी दृष्टिक्षेपात येईल.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ गोड बोलून तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. अनुपस्थित सहकाऱ्याचे काम करावे लागेल. घरामध्ये जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील.

सिंह ग्रह तुमच्यावर प्रसन्न असल्याने ‘मी म्हणेल ती पूर्व दिशा’ अशी तुमची स्थिती असेल. कोणत्याही अडथळ्यांची पर्वा न करता घेतलेले काम पूर्ण करून दाखवाल. पसे हातात पडल्यामुळे तुमचा खिसा गरम राहील. तुमचा उत्साह बळावेल. नोकरीमध्ये जे काम तुमच्या हातात आहे ते अवघड असल्यामुळे वरिष्ठ तुम्हाला आíथक किंवा इतर सवलत द्यायला तयार होतील. घरामधल्या प्रत्येक कामात तुम्ही मोठेपणाने मिरवाल.

कन्या ग्रहमान तुम्हाला उत्साही बनविणारे आहे. मरगळ आलेल्या कामाला गती देण्यासाठी शक्ती आणि युक्तीचा वापर कराल. व्यापार-उद्योगात सरकारी काम किंवा कोर्ट व्यवहारात काही अडथळे आले असतील तर ते सोडविण्याचा प्रयत्न करा. त्याकरिता मध्यस्थांचा वापर करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे काम तुमच्यावर सोपवून वरिष्ठ जणू काही तुमची परीक्षाच बघतील. त्यातून तुम्ही सहीसलामतपणे बाहेर पडाल. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या अडचणीमध्ये तुम्ही लक्ष घालाल. त्या व्यक्तीला हायसे वाटेल.

तूळ अगदी साधे आणि सोपे वाटलेले काम अवघड झाल्याने बरीच शक्ती आणि पसे खर्च होतील. व्यापार-उद्योगात नवीन कामात लक्ष घालण्यापूर्वी हातामध्ये असलेली कामे वेळेत पूर्ण करा. नोकरीच्या ठिकाणी आपण बरे आणि आपले काम बरे असा दृष्टिकोन ठेवणे चांगले. केलेले काम पुन्हा तपासून बघा. घरामध्ये ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे अशा व्यक्ती तुमच्या पुढे पुढे करतील. त्यांना खूश ठेवण्यासाठी तुम्हाला हात सल सोडावा लागेल. शुभकार्यात मानापानाचे प्रसंग येतील.

वृश्चिक ग्रहमान तुमचा उत्साह वाढविणारे आहे. ज्या गोष्टींची तुम्हाला स्वाभाविक आवड आहे, त्या करायला मिळाल्यामुळे तुम्ही आनंदात असाल. व्यापार-उद्योगात सरकारी कामे किंवा कोर्ट व्यवहार लांबलेले असतील तर त्यामध्ये आता गती येईल. जनसंपर्क, जुन्या ओळखी यांचा  चांगला उपयोग करून घ्याल. नोकरीमध्ये एखादे कंटाळवाणे काम लांबल्यामुळे किंवा रद्द झाल्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकाल. घरामध्ये तुमचा सल्ला  आता पटल्यामुळे सगळ्यांना बरे वाटेल.

धनू कष्ट करायला तुम्ही कधीच मागे-पुढे बघत नाही. पण तेच काम पुन्हा पुन्हा करायला लागले की तुमची चिडचिड होते. या आठवडय़ामध्ये जरी असा अनुभव आला तरी मन शांत ठेवा. पशाच्या कामाला प्राधान्य द्याल. गिऱ्हाईकांना एखादी सवलत देताना स्वत:चे नुकसान करून घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न पडता आपण बरे आणि आपले काम बरे असा दृष्टिकोन ठेवा. मित्रमंडळींसमवेत एखादी छोटीशी सहल काढाल.

मकर ग्रहमान तुमची मन:स्थिती द्विधा बनविणारे आहे. तुम्हाला कामापासून लांब राहता येणार नाही. पण घरगुती कार्यक्रमामुळे तुमचे लक्ष विचलित होईल. अशा वेळेला कामाच्या वेळी काम आणि इतर वेळेला मौजमजा असे धोरण तुम्ही ठेवाल. व्यापार-उद्योगातील काम समाधानकारक असेल. नोकरीच्या ठिकाणी जो काम करतो त्याच्याच वाटय़ाला काम येते असा अनुभव येईल. तुम्ही फक्त आवश्यक तेवढी कामे कराल. घरामध्ये एखादा कार्यक्रम ठरल्यामुळे त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.

कुंभ आपल्याच नादात राहणारी तुमची रास आहे. तुमच्या ठरलेल्या कार्यक्रमात काहीही बदल झाला तरी तुम्हाला तो चालत नाही. या आठवडय़ामध्ये कुटुंबाकरिता तुम्हाला थोडासा वेळ राखून ठेवावा लागेल. व्यापार-उद्योगात नेहमीच्या कामापेक्षा काही तरी वेगळे करावे लागेल. एखादे नवीन तंत्रज्ञान उत्पादन वाढविण्याकरिता वापरात आणाल. नोकरीच्या ठिकाणी बदली हवी असेल तर ताबडतोब प्रयत्न करा. घरामध्ये आवराआवर किंवा सजावट करण्याचे बेत आखाल.

मीन बहुढंगी असे तुमच्या राशीचे वर्णन केले जाते. ज्या ठिकाणी तुम्ही जाता तेथील वातावरण खुलवून टाकाल. या सप्ताहात घरात आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी याचा प्रत्यय येईल. व्यवसाय-उद्योगात तुम्ही केलेले काम गिऱ्हाईकांना आवडेल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. काहींना परदेशी जाण्याची संधी मिळेल. घरामध्ये करमणुकीचे किंवा तशाच प्रकारचे कार्यक्रम ठरतील. त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा असेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com