18 February 2019

News Flash

भविष्य : दि. १२ ते १८ ऑक्टोबर २०१८

उत्साह वाढविणारे ग्रहमान आहे. कोणत्याही कामात स्वाभाविक नेतृत्व करण्याची तुमची तयारी असते.

(संग्रहित छायाचित्र)

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मेष

उत्साह वाढविणारे ग्रहमान आहे. कोणत्याही कामात स्वाभाविक नेतृत्व करण्याची तुमची तयारी असते. त्याला योग्य संधी मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी व उत्साही दिसाल. व्यापारउद्योगात ज्या नवीन प्रोजेक्टविषयी तुम्ही विचार करत होता त्याची सुरुवात होईल. नोकरीच्या ठिकाणी कौशल्य असलेले काम करायला मिळेल. तुम्ही ते काम आनंदाने स्वीकारा. घरामध्ये प्रियजनांचा मेळावा साजरा होईल. त्यामध्ये तुम्ही हिरिरीने भाग घ्याल.

सिंह

ग्रहमान तुमचा उत्साह वाढविणारे आहे. जी पूर्ण गोष्ट तुमच्या मनामध्ये बराच काळ तरळत होती ती पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. विचार करणार नाही. व्यापारउद्योगात अनपेक्षितरीत्या एखादे चांगले काम मिळून जाईल. ते पूर्ण करण्याकरिता तुम्ही प्रचंड मेहनत घ्याल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या युक्तीचा अवलंब करून महत्त्वाची कामे आटोक्यात आणाल. घरामध्ये प्रिय व्यक्तीकरता बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

धनू

जी गोष्ट आपल्याकडे नाही त्याचा विचार करत बसू नका. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात एखाद्या उत्साहवर्धक घटनेने होईल. तुमचे मनोधर्य वाढेल. पूर्वी केलेल्या कामाचे पसे हातात पडल्यामुळे निराशा कमी होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी गोड बोला आणि तुमचा मतलब साध्य करा. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या आगमनाने वातावरणात तात्पुरता चांगला बदल घडेल. तुमच्या मित्राशी अचानक गाठभेट होईल.

वृषभ

निराशा कमी करणारे ग्रहमान सुरू झाले आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी प्रकृती आणि मन:स्वास्थ्य या दोन्हींकडे लक्ष ठेवा. व्यापारउद्योगात भागीदारी किंवा नवीन मत्रीकराराचे प्रस्ताव पुढे येतील. आíथक कमाई वाढेल. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. घरामध्ये बऱ्याच दिवसांनंतर दिलासा देणारी एखादी बातमी कळेल किंवा घटना घडेल. घरामधल्या सदस्यांची हौसमौज करताना खर्चाचे भान राहणार नाही.

कन्या

जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे त्याकरिता तुम्हाला थोडासा त्याग करावा लागेल. व्यापारउद्योगात जे पसे हातात पडलेले आहेत त्यातून थोडीशी रक्कम नवीन प्रोजेक्टकरिता गुंतवाविशी वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या अपेक्षांना पुरे पडतापडता नाकीनऊ येतील. तरीपण तुम्ही तुमच्या कर्तव्यात तत्पर राहा. घरामध्ये लहानसहान कारणावरून भांडय़ाला भांडे लागणे शक्य. नवीन जागा घेताना घाई गडबड करू नका

मकर

ग्रहमान तुमच्या कष्टाळू स्वभावाला न्याय देणारे आहे. प्रयत्न आणि नशीब यांचा योग्य समन्वय झाल्यामुळे तुम्ही एखादी विश्वासजनक कामगिरी कराल. व्यापारउद्योगात एखाद्या नवीन प्रोजेक्टचा शुभमुहूर्त होईल. दुकानदारांना भरपूर काम मिळाल्याने त्यांचा खिसा गरम राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एखादी विशेष सवलत देऊन तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. घरामध्ये आवडत्या वस्तूची खरेदी करतील.

मिथुन

ग्रहमान बदललेले आहे. माझे तेच खरे असा अट्टहास न धरता बदलत्या परिस्थितीनुसार वागण्यासाठी तुमचा पवित्रा लवचीक ठेवा. व्यापारउद्योगात  खेळत्या भांडवलाची चणचण असेल. तात्पुरते कर्ज काढावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हातून पूर्वी झालेली चूक वरिष्ठांच्या लक्षात येईल.  घरामध्ये वातावरण आनंदी असेल. पण ऋण काढून सण साजरा करू नका. आजारी व्यक्तींनी आणि वृद्धांनी स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे.

तूळ

बरेच ग्रह अनुकूल असल्यामुळे तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. पण त्यामुळे तुमच्या मनामध्ये अभिलाषा जास्त वाढेल. व्यापारउद्योगात गिऱ्हाईकांची मागणी पूर्ण करण्यात तुम्ही स्वत:ला धन्य मानाल. एखाद्या नवीन प्रोजेक्टचा ‘श्री गणेशा’ होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी पूर्वी दिलेल्या आश्वासनाची खात्री वाटू लागेल. काही जणांना अपेक्षित जागी बदली मिळू शकेल. घरामध्ये एखादी महागडी खरेदी होईल.

कुंभ

ग्रहमान सुधारल्यामुळे आता तुमच्या मनोकामना वाढायला सुरुवात होईल. व्यापारउद्योगात जुन्या गिऱ्हाईकांबरोबर काही नवीन गिऱ्हाईक तुमच्याकडे चालून येईल. त्यांच्याकडून तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक तुम्हाला ऐकायला मिळेल. आठवडय़ाची सुरुवात लाभदायक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी सध्या तुम्हाला तुमच्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य मिळेल. घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल.

कर्क

ग्रहमान असे सुचविते की, तुमच्या घरामध्ये आणि नोकरी व्यवसायाच्या जागी तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. त्या सर्व पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. व्यापारउद्योगात एखादे अनपेक्षित पसे मिळून देणारे काम मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागेल. घरामध्ये छोटेमोठे फेरफार करण्याकरिता काही वस्तूंची खरेदी होईल. नातेवाईक, मित्रमंडळींसह मेजवानीचा आनंद घ्याल.

वृश्चिक

या आठवडय़ामध्ये पशाची तंगी असूनही शिलकीतल्या रकमेतून पसे खर्च कराल. व्यापारउद्योगात भरपूर पसे मिळतील, पण तुमच्या अपेक्षा उंचावल्यामुळे जे पसे मिळालेले आहेत. ते तुम्हाला कमीच वाटतील. गिऱ्हाईकांकडून तुम्हाला चांगली दाद मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून काही चांगले आश्वासन मिळाल्यामुळे तुमची निराशा कमी होईल. नेहमीपेक्षा जास्त काम करावेसे वाटेल. घरामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण असेल.

मीन

महत्त्वाची कामे आठवडय़ाच्या सुरुवातीला हातात घ्या. त्यामध्ये आळस झाला तर हातात आलेली संधी हुकण्याची शक्यता आहे. गरज पडली तर मध्यस्थांचा वापर करा. व्यापार-उद्योगामध्ये गिऱ्हाईकांची ये-जा चांगली राहील. रोखीचे व्यवहार जरी कमी झाले तरी काम चांगले झाले यामुळे तुम्हाला बरे वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठ नवीन कामासंबंधी संकेत देतील.

response.lokprabha@expressindia.com

First Published on October 12, 2018 1:04 am

Web Title: astrology 12th september to 18th october 2018