18 January 2019

News Flash

दि. १२ ते १८ जानेवारी २०१८

व्यापार-उद्योगात प्रगतीचे नवीन पर्याय उपलब्ध होतील.

मेष ‘कठीण समय येता कोण कामास येतो’ या म्हणीची तुम्हाला आठवण येणार आहे. व्यापार-उद्योगात प्रगतीचे नवीन पर्याय उपलब्ध होतील. त्याचा फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला धाडस करावे लागेल. नोकरीमध्ये एखादे काम तुमच्या हातून चांगल्या रीतीने पार पडल्याने वरिष्ठ नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्याचा थोडासा तणाव जाणवेल. घरामध्ये एखाद्या प्रश्नावरून इतारांशी वादविवाद आणि गरसमज होतील.

वृषभ जरी एखादे काम अवघड असले तरी तुम्ही ते केवळ प्रयत्नांच्या जोरावर साध्य कराल. तुमचे अंतरमन जागृत राहिल्यामुळे एखादा प्रश्न निर्माण होण्याआधीच तुम्ही त्यावर मार्ग शोधून काढाल. नोकरीच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामे हाताळण्याचा अनुभव मिळेल. त्याचा लगेच नाही पण कुठे तरी चांगला उपयोग होईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामधील व्यक्ती तुमचा एखादा प्रश्न समजून घेऊन त्यावर मार्ग शोधून काढतील.

मिथुन मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. व्यापार-उद्योगात एखादे काम मध्यस्थांवर सोपवले असेल तर त्याकडे अधूनमधून लक्ष ठेवा. स्पर्धकांच्या तयारीचा अंदाज घेतल्याशिवाय कोणतेही बेत करू नयेत. नोकरीच्या ठिकाणी गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या, पण तुमचे मत व्यक्त करू नका. घरामध्ये कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागेल.

कर्क ग्रहमान असे दाखविते की, जी कामे पूर्वी तुम्ही टाळलेली होती ती आता स्वतहून हातात घ्याल. व्यापार-उद्योगात सरकारी आणि कोर्ट कामांना चांगली गती येईल. काही नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचे विचार आणि कल्पना वरिष्ठांना पटल्यामुळे तुम्हाला हायसे वाटेल. घरामध्ये मात्र आपल्या भावनांना काहीच किंमत नाही असा विचार तुम्हाला अस्वस्थ करील. प्रकृतीकडे लक्ष देणे भाग पडेल.

सिंह आठवडय़ााची सुरुवात खूप सहज आणि सोपी वाटेल. पण जसजसे तुम्ही कामाला लागाल, तसतसा कामाचा व्याप वाढत जाईल. व्यापार-उद्योगात योग्य कामाकरिता योग्य व्यक्तीची निवड करा. आíथक व्यवहार मात्र स्वत जातीने हाताळा. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामाचा पूर्वी आळस केला होता ते काम आठवडय़ाच्या मध्यापर्यंत पूर्ण करावे लागेल. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नामध्ये लक्ष घालावे लागेल.

कन्या ग्रहमान तुमच्या कर्तृत्वाला वाव देणारे आहे. आधी कृती आणि मग विचार अशी तुमची कामाची पद्धत असेल. व्यापार-उद्योगात एखाद्या नवीन योजनेचा प्रारंभ होईल. त्यानिमित्ताने चार नवीन ओळखी होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. एखादे काम छोटय़ा प्रवासानंतर होईल. घरामध्ये तुमचा शब्द खरा करण्याकरिता तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल.

तूळ जे यश तुम्हाला मिळत आहे त्यावर तुमचे समाधान नसेल, त्यामुळे जास्तीत जास्त धडपड करीत राहाल. कामानिमित्त छोटा प्रवास करावा लागेल. त्यातून नवीन व्यक्तींशी ओळखी होतील. पशाची आवक सुधारण्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरीच्या ठिकाणी स्वत: काम न करता उंटावरून शेळ्या हाकाल. त्याचा हाताखालच्या व्यक्तींना राग येईल. घरामधील व्यक्तींच्या गरजा भागवाव्या लागतील.

वृश्चिक गेल्या एक-दीड महिन्यापासून एखाद्या कामाला विलंब होत असेल तर ते काम आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. व्यापारीवर्गाला आठवडय़ाची सुरुवात लाभदायक ठरेल. पूर्वी केलेल्या कामाचे पसे मिळाल्यामुळे बरे वाटेल. नोकरदारवर्गाला समाधान देणारा सप्ताह आहे. त्यांच्या कौशल्याची संस्थेला गरज असल्यामुळे त्यांची बडदास्त ठेवली जाईल. घरामधला एखादा कार्यक्रम लांबला असेल तर तो निश्चित होईल.

धनू थोडासा सकारात्मक विचार केलात तर या आठवडय़ात तुम्ही बरेच काही करू शकाल. व्यापारीवर्गाला प्रोत्साहन देणाऱ्या घटना घडतील.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ त्यांचा मतलबाकरिता तुम्हाला काही सवलती देतील, पण त्याच्या बदल्यात तुमच्याकडून भरपूर काम करून घेतील. घरामध्ये पूर्वी ठरलेला एखादा कार्यक्रम निश्चित होईल. त्यानिमित्ताने लांबच्या नातेवाइकांशी गाठभेट होईल. शक्यतो नातेवाइकांना टाकून बोलू नका.

मकर जेव्हा तुम्ही शांत बसलेले असता तेव्हा तुमच्या मनामध्ये पशासंबंधी विचार चालू असतात. या आठवडय़ात तुम्ही केलेले उत्तम नियोजन सर्व आघाडय़ांवर उपयोगी पडेल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात थोडीशी खर्चीक होईल. पण नंतर जे काम होईल त्यामुळे त्याची कसर भरून निघेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामात काही बदल झाले असतील तर ते तुमच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल.

कुंभ बौद्धिक रास असल्याने तुमच्या राशीला उत्तम कल्पनाशक्ती लाभलेली आहे. पण व्यवहार ज्ञानामध्ये तुम्ही थोडेसे कमी पडता. या आठवडय़ात तुम्ही जर स्वार्थी बनलात तर तुमचाच फायदा होईल. व्यापार-उद्योगात छोटे-मोठे बदल करून कामामध्ये सुटसुटीतपणा आणाल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये बदली होण्याची शक्यता आहे. घरामध्ये पूर्वी ठरलेला सोहळा पार पडेल.

मीन नुसताच विचार करीत बसण्यापेक्षा काही तरी कृती करण्यावर आता तुमचा भर राहील. व्यापार-उद्योगात अपेक्षित पसे सप्ताहाच्या मध्यामध्ये मिळतील. नोकरदार व्यक्तींना विशिष्ट कामगिरीनिमित्त थोडय़ा अवधीकरिता परदेशी जाता येईल. त्यामुळे त्यांचे मनोधर्य वाढेल. घरामध्ये एखाद्या मुद्दय़ावरती मतभेद झाले असतील तर त्यामध्ये समेट घडेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on January 12, 2018 1:01 am

Web Title: astrology 12th to 18th january 2018