21 February 2019

News Flash

भविष्य : दि. १३ ते १९ जुलै २०१८

ज्या व्यक्तींना तुम्ही आपले मानता त्यांच्यासाठी काहीही करायची तयारी असते.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष ज्या व्यक्तींना तुम्ही आपले मानता त्यांच्यासाठी काहीही करायची तयारी असते. या आठवडय़ामध्ये तुमच्या या स्वभावातील कंगोरे विशेष रूपाने जागृत होतील. व्यापार-उद्योगात नवीन कामे हातात घेण्यापेक्षा ती लांबवण्याकडे तुमचा कल राहील. नोकरीमध्ये कामात शॉर्टकट मिळविण्याकरिता एखाद्या युक्तीचा वापर कराल. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्तींची हजेरी लागेल. त्यांच्याबरोबर करमणुकीचा एखादा कार्यक्रम ठरेल.

वृषभ ज्या कामामध्ये विनाकारण दिरंगाई झालेली होती त्या कामाला गती देण्यासाठी तुम्ही आता सतर्क बनाल. व्यापार-उद्योगात जुन्या ओळखींमुळे एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या भीतीने काही गोष्टी तातडीने करणे भाग पडेल. बेकार व्यक्तींना नवीन नोकरी स्वीकारताना त्यांच्या तत्त्वांशी तडजोड करावी लागेल. घरामध्ये अत्यावश्यक कारणांकरिता पसे खर्च होतील.

मिथुन आठवडय़ाची सुरुवात वेगळ्या वातावरणात झाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. व्यापार-उद्योगात  जाहिरात आणि प्रसिद्धीचा वापर करून मालाची विक्री वाढविण्याचा प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा मनस्वी कंटाळा येईल.  बेकार व्यक्तींना काम मिळवताना त्यांच्या तत्त्वांशी तडजोड करावी लागेल. घरामध्ये लांबच्या नातेवाईकांना भेटण्याचा योग येईल. आठवडय़ाच्या शेवटी प्रिय व्यक्तीशी गाठीभेटीचा योग चालून येईल.

कर्क पशाच्या मागे धावणारी तुमची रास नाही. पण या आठवडय़ामध्ये तुम्ही त्याच कामाला प्राधान्य द्याल. व्यापार-उद्योगात कोणतेही काम बाकी ठेवायचे नाही या उद्देशाने कामाचे नियोजन कराल. नोकरीच्या ठिकाणी ज्या चांगल्या संधीची तुम्ही वाट पाहात होतात ती संधी नजरेच्या टप्प्यात येईल. काही जणांची परदेशी जाण्यासाठी निवड होईल. घरामध्ये एखाद्या आवडत्या व्यक्तीला आवश्यक ती मदत कराल.

सिंह तुम्हाला कामाचा प्रचंड उत्साह असेल. सगळया डगरींवर हात ठेवावासा वाटेल. परंतु फक्त महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. व्यापार-उद्योगात मनस्वी वागण्याचा मोह अनावर होईल. नोकरीच्या ठिकाणी एखादे महत्त्वाचे काम आटोक्यात येईल. तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. पण वरिष्ठ तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. घरामध्ये आवडत्या व्यक्तीचे अचानक आगमन होईल. लांबच्या भावंडांशी भेटीगाठीचा योग येईल.

कन्या आíथकदृष्टय़ा हा आठवडा महत्त्वाचा जाईल.  व्यापार-उद्योगात बाजारपेठेतले नाव टिकून ठेवण्याकरिता काही गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला प्रतिष्ठा पाहिजे असेल, पण त्याकरिता पसे खर्च करण्याची तुमची तयारी नसेल. त्यामुळे तुम्हाला तोटा सहन करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामातून तुमचा फायदा आहे अशा कामांना तुम्ही महत्त्व द्याल. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपुलकीच्या व्यक्ती एकत्र जमा होतील.

तूळ ‘सबसे बडा रुपय्या’ हे मानणारी तुमची रास नाही. या आठवडय़ामध्ये जी कामे पशामुळे अडून राहिली होती ती कामे मार्गी लागतील. व्यापार-उद्योगात बाजारपेठेतील प्रतिष्ठा उंचावण्याकरिता आवश्यक असणारे भांडवल बँक किंवा इतर मार्गाने उपलब्ध होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी बढतीचे, पदोन्नतीचे दिलेले आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरामध्ये आपला शब्द खरा करून दाखविण्याकरिता तुम्ही पसे आणि वेळ खर्च कराल.

वृश्चिक काम कितीही कठीण असो, पण ते पूर्ण करण्याची या आठवडय़ात तुम्हाला खात्री वाटेल. व्यापार-उद्योगात आíथक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे महत्त्व वरिष्ठांना समजेल. बेकार व्यक्तींना नवीन जॉबची ऑफर मिळेल. घरामधल्या व्यक्तींना एखाद्या प्रश्नामध्ये तुमची मते सुरुवातीला पटणार नाहीत. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील.

धनू तुमच्या राशीमध्ये जीवनशक्ती भरपूर आहे. पण या आठवडय़ात तब्येतीचा अंदाज घेतल्याशिवाय तुमचे कार्यक्रम ठरवू नका. व्यापार-उद्योगात गेल्या आठवडय़ामध्ये जी कामे लांबली होती त्यावर लक्ष केंद्रित करा. आठवडय़ाच्या मध्यामध्ये एखाद्या मोठय़ा व्यक्तीशी परिचय होईल.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना एखाद्या जुन्या कामाची आठवण येईल. घरामध्ये सगळ्यांना समाधानी ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

मकर गुरू मार्गी झाल्यामुळे तुमच्या मनाला एक प्रकारची उभारी आली आहे. जे काम गेले दोन-तीन आठवडे रखडले होते त्या कामाला गती देण्यासाठी आता तुम्ही सक्रिय व्हाल. व्यापार-उद्योगात केलेले काम कधी वाया जात नाही असा अनुभव येईल. कारखानदारांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारून पुढे जावे लागेल. आठवडय़ाचा शेवट लाभदायक ठरेल. नोकरदार व्यक्तींना खूप काम करावे लागेल. घरामध्ये एखादा समारंभ निश्चित होईल.

कुंभ आठवडय़ाच्या सुरुवातीला तुम्ही अनेक बेत ठरवाल. ते पार करण्याची तयारी ठेवा. व्यापार-उद्योगात  एखादी भागीदारी किंवा मत्री करार करून उत्पन्नाचे प्रमाण वाढवावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या नवीन कामाला सुरुवात होईल. एक म्हणजे हे तुमच्या दृष्टीने मोठे आव्हान असेल. तरीपण तुम्ही ते निश्चयाने हातात घ्याल. घरामध्ये काही वादविवाद झाले असतील तर त्यावर सामोपचाराने मार्ग निघेल.

मीन ग्रहमान संमिश्र आहे. ज्या गोष्टीतून तुमचा फायदा आहे, त्या गोष्टी तुम्हाला करायला मिळणार नाही.  संपूर्ण आठवडा खूप दगदग, धावपळ करण्यात जाईल. व्यापार-उद्योगात देणी द्यावी लागतील. नोकरीच्या ठिकाणी नवीन काहीतरी शिकायला मिळेल. घरामध्ये सर्वजण मतलबापुरते तुमच्याशी गोड बोलतील, पण त्यांचे काम संपल्यानंतर तुम्हाला विसरतील.

First Published on July 13, 2018 1:01 am

Web Title: astrology 13th to 19th july 2018